Trending

6/recent/ticker-posts

मुकनायक शताब्दी सोहळ्यात नामवंत पत्रकारांचा गौरव

मुकनायक शताब्दी सोहळ्यात नामवंत पत्रकारांचा गौरवनवी मुंबई : 
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूकनायक पाक्षिकाच्या शताब्दी निमित्त सत्त्याग्रह महाविद्यालया तर्फे नामवंत पत्रकारांना सत्याग्रही पत्रकार पुरस्काराने सोमवारी गौरवण्यात आले. भारतीय बौद्ध महासभेचे कार्य अध्यक्ष भिमराव आंबेडकर व राज्याचे माजी समाजकल्याण आयुक्त आर के गायकवाड यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला. या सोहोळ्याचे संयोजन सत्याग्रह महाविद्यालयाचे संस्थापक प्राचार्य प्राध्यापक डॉ जी के डोंगरगावकर यांनी केले होते. त्यात  विवेक गिरधारी संपादक पुढारी, दिवाकर शेजवळ माजी वृत्तसंपादक दैनिक सामना, रा. सो. नलावडे संस्थापक संपादक साप्ताहिक आम्रपाली, भिमराव गवळी महाराष्ट्र टाईम्स, जयवंत बामणे पुण्यनगरी, प्रणव प्रियदर्शी.. नवभारत टाईम्स, दिल्ली, संजय महाडिक साप्ताहिक कोकण दर्पण. गजानन चव्हाण दैनिक सकाळ या नामवंत पत्रकारांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाला  प्रसिद्ध समाजसेविका सुनंदा शेजवळकर आणि 4 K न्यूज चॅनलचे संचालक गौरव जहागीरदार हे ही उपस्थित होते .


Post a Comment

0 Comments