पालकमंत्री ना.एकनाथ शिंदे यांच्या हस्ते फुडवॅनचे उद्घाटन
ठाणे
ठाण्याचे पालकमंत्री मा.ना.एकनाथ शिंदे यांच्या हस्ते फुडवॅनचे उद्घाटन करण्यात आले आणि महत्वाकांक्षी आणि गरजू महिला सौ. राधा वाघमारे हिला फुडवॅनची चावी सुपूर्द करण्यात आली. डिझायर फाऊंडेशन तर्फे ठाण्यात प्रथमच महिलांना खर्या अर्थाने स्वावलंबी करण्यासाठी फुडवॅनचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. मा.ना.एकनाथजी शिंदे साहेबांनी या उपक्रमाचे कौतुक केले
जसं डिझायर फाऊंडेशन आणि राधिका राठी मॅडम यांनी जो फुडवॅन चा उपक्रम हाती घेतला आहे तसेच इतरांनीही पुढे येऊन या उपक्रमाला पाठबळ दिले पाहिजे आणि महिलांना खर्या अर्थाने स्वावलंबी केलं पाहिजे, असे आवाहन शिंदे यांनी यावेळी केले. डिझायर फाऊंडेशन च्या महाराष्ट्र सेक्रेटरी सौ प्रज्ञा ताई आणि street side treat च्या CEO सौ.राधिका राठी मॅडम यांच्या प्रयत्नांनी हा उपक्रम आमलात आला. यासाठी एस.चंद्रशेखर, अमित गिलरा, कु.किरन जैस्वार, सौ.सिंधू डिके, कु.संध्या सिंह यांचे मोलाचे सहकार्य लाभले. ज्या महिलांना आयुष्यात स्वतःच्या पायावर उभं राहून काही तरी करून दाखवायचं असेल आणि स्वावलंबी व्हायचे असेल त्यांनी प्रज्ञा ताई आणि किरन मॅडम यांच्याशी 8286777708/ 8108949927/ 9004320334 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
0 टिप्पण्या