Trending

6/recent/ticker-posts

 चिल्ड्रन फ्युचर इंडियाच्यावतीने प्लास्टिक कचरा निर्मूलन व गाव स्वच्छता मोहीम 

पेण: तालुका खारपाडा येथे चिल्ड्रन फ्युचर इंडिया आय बी एन एम पवार व ग्रुप ग्रामपंचायत दुष्मी खारपाडा यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामपंचायत हद्दीतील खारपाडा ठाकूर पाडा दुष्मी खैरासावडी वड माळवाडी गावाच्या वतीने प्लास्टिक कचरा निर्मूलन व गाव स्वच्छता मोहीम आयोजित करण्यात आली होती या कार्यमासाठीं नॉरे चेअरपर्सन हेगे सीईओ, कॉमिल हौल वाडे तसेच cfi संस्था पेण चेअरमन डॉ. किशोर देशमुख,  कै मोरेश्वर भगत सार्वजनिक वाचनालय खारपाडा अध्यक्ष दयानंद भगत आदी मान्यवर  प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. रश्मीबाई भगत ह्यां कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या.  कार्यक्रमाला पाहुण्यांचे स्वागत सरपंच उपसरपंच सदस्य यांनी केले.  
या वेळी  किशोर देशमुख ह्यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की आपल्या गावातील प्लॅटिक कचरा मुक्त करणेसाठी व गाव स्वच्छता ठेवणेसाठी  आय बी एन एम पवार ह्यांनी ग्रामपंचायत दुष्मी खारपाडा च्या मागणी नुसार खारपाडा गावात केंद्र चालू करण्यात आले आहे.हे केंद्र सौ दिपा दिलीप घरत ह्या चालवणार असून त्या केंद्रावर  जो प्लास्टिक कचरा घेऊन जातील त्या प्लॅस्टीकला प्रति किलो ३५ रुपये मिळणार आहेत. त्यामुळे ग्रामपंचायत हद्दीतील गावातील घाण कचरा मुक्त होईल.
पेण तालुक्यात हमरापूर नंतर खारपाडा येथे केंद्र उभारण्यात आले आहेत
 गावात प्लास्टिक कचरा गोळा करणेसाठी मोहीम रॅली काढण्यात आली होती. या  केंद्राचे उदघाटन पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले आहे.  प्लस्टिक खरेदी करणेसाठी केंद्र मंगळवार व शनिवार हे दोन वार हे केद्र सुरू ठेवण्यात येणार आहेत. ग्रामसेविका सौ स्मिता पाटील उपसरपंच सौ सुप्रिया पाटेकर सदस्य नितेश घरत  प्रशात घरत संजय घरत सौ मीनाक्षी घरत स्वेता देसले माजी सरपंच अरुण घरत ग्रा प माजी सदस्य सुनील पाटेकर  शाळेच्या मुख्याध्यापिका अरुणा पाटील अंगणवाडी सेविका करुणा ठाकूर कीर्ती देसले रजनी भोईर crp विजेता म्हात्रे  रोशन घरत विशाल देसले  कैलास रुठे प्रशात पाटील रमेश पाटील सौ लता घरत आरोग्य अधिकारी लता सिस्टर cfi सीमा बोरकर व ग्रामस्थ ह्यांनी मेहनत घेतली


Post a Comment

0 Comments