विनयभंग केल्याचे सांगत १ कोटी ३० लाख रुपयांची खंडणी
पुणे -
पुण्यातील नामांकित दीपक प्रभाकर रासने (६९, रा. तपोवन सोसायटी, पर्वती, पुणे) यांचा मुलगा डॉ. साहिल याच्याविरुद्ध ऑक्टोबर २०१९ रोजी विनयभंगाची तक्रार विश्रामबाग पोलिस ठाण्यात दाखल आहे. या प्रकरणात मनोज अडसूळ याने “तुमच्या मुलावर बलात्कार, अॅट्रॉसिटी असे गंभीर गुन्हे दाखल होऊ शकतात, अशी भीती डॉक्टरला दाखवली. याप्रकरणी रिपाइं व इतर संघटनांचे कार्यकर्ते फिर्यादीच्या मुलाला अटक करा म्हणून मागे लागले होते. मुलास ३ ते १० वर्षांची शिक्षा होऊ शकते, असे अडसूळ याने डॉक्टरला धमकावले. हे प्रकरण मिटवण्यासाठी १ कोटी ३० लाख रुपयांची मागणी करण्यात आली. त्यानुसार डॉक्टरने धनादेशाद्वारे ५४ लाख आणि रोख २१ लाख रुपये घेतले. उर्वरित ५५ लाख रुपयांसाठी डॅाक्टरकडे तगादा लावत होता. अखेर डॉक्टरने पोलिसांत तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तक्रार दिल्यानंतर मनोज अडसूळ याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
0 टिप्पण्या