Trending

6/recent/ticker-posts

ठाण्यातील सहा क्लस्टर योजनांना राज्य सरकारची मंजुरी:

६ फेब्रुवारी २०२० रोजी ठाण्यातील पहिल्या क्लस्टर टप्प्याचा शुभारंभ 


 क्लस्टर योजनेची अंमलबजावणी नियमानुसारच : महापालिकेचा खुलासाठाणे- 
  शहरातील मोठ्या प्रमाणातील जुन्या धोकादायक इमारती,  अनधिकृत इमारती,  झोपडपट्टी यामुळे शहराची सुनियोजित आणि सुनियंत्रित पुनर्बांधणी करणे सार्वजनिक व्यापक जनहिताच्या दृष्टीने आवश्यक होते. हे लक्षात घेऊन महापालिकेने ‘समूह विकास योजना' या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांच्या सहा नागरी पुनरुथ्थान आराखड्यांचे प्रस्ताव राज्य शासनाकडे मंजुरीसाठी सादर केले होते. या सर्व आराखड्यांना राज्य शासनाने आज दिनांक  4  फेब्रुवारी रोजी मंजुरी देण्यात आली असल्याचे ठाणे महापालिकेच्या वतीने जाहिर करण्यात आले.   पहिल्या टप्प्यात किसननगर येथील प्रकल्पांचा ६ फेब्रुवारी २०२० रोजी शुभारंभ करण्यात येणार आहे.
  किसननगर, कोपरी, राबोडी,  हाजुरी,  टेकडी बंगला आणि लोकमान्य नगर या सहा यूआरपींना राज्य सरकारने मंजुरी दिली असून या योजनेची अंमलबजावणी नियमानुसारच होत असल्याचा खुलासा महापालिकेच्यावतीने करण्यात आला आहे. तथापि आवश्यक त्या मंजु-या प्राप्त नसतानाही क्लस्टर योजनेची अंमलबजावणी होत आहे म्हणणे संयुक्तीक नाही असाही खुलासा महापालिकेच्यावतीने केला आहे.   
          सद्यस्थितीत एकूण 44 परिसराच्या नागरी पुनरूत्थान आराखड्यांचे जवळपास 1508.93 हेक्टर इतक्या क्षेत्रावर नियोजन करण्यात आले आहे.  त्यापैकी कोपरी, हाजुरी, टेकडी बंगला, लोकमान्यनगर, किसननगर आणि राबोडी या परिसराची प्राधान्याने निवड करण्यात आली आहे. या योजनेमुळे ठाणेकरांना परवडणारी घरे उपलब्ध होणार आहेत. हा प्रकल्प टप्प्याटप्प्यामध्ये विकसित करण्यात येणार आहे.      समुह नागरी विकास योजनेतंर्गत शहरात आंतरराष्ट्रीय पातळीवरील अनेक सुविधा उपलब्ध केल्या जाणार आहेत. यामध्ये प्रशस्त क्रीडांगण, सांस्कृतिक केंद्र, सुरक्षा, महिलाबचत गटांसाठी स्वतंत्र जागा, तसेच कम्युनिटी सेंटर, सिटी सेंटर, टाऊन सेंटर अशा अनेक  आंतरराष्ट्रीय सुविधांचा समावेश  या योजनेत असणार आहे.
    


Post a Comment

0 Comments