राष्ट्रीय लोकन्यायालयामध्ये २,५६२ प्रकरणे निकाली
ठाणे
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, ठाणे यांच्या वतीने ८ फेब्रुवारी रोजी जिल्हा व सत्र न्यायालय, ठाणे येथे राष्ट्रीय लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात आले होते. सदर लोकन्यायालयामध्ये ठाणे जिल्ह्यातील एकूण प्रलंबित आणि दावा दाखलपूर्व मिळून ३०,३९७ प्रकरणे ठेवण्यात आली होती, त्यापैकी २,५६२ प्रकरणे निकाली काढण्यात यश आले.
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांनी निर्देशित केल्याप्रमाणे आणि जिल्हा प्रमुख आर.एन.जोशी व सत्र न्यायाधीश ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या लोकन्यायालयामध्ये मोटार अपघात दावा न्यायाधीकरणाकडील एकूण १५७ प्रकरणे समाविष्ट आहेत. तसेच या सर्व प्रकरणांमध्ये २०,३५,६०,०७५.७० रकमेबाबत हुकुमाने करण्यात आले, लोकन्यायालयाच्या यशस्वीतेसाठी जिल्ह्यातील न्यायीक अधिकारी आणि वकील संघटना, ठाणे तसेच तालुका संघटनाच्या विधीज्ञानी व न्यायालयीन कर्मचार्यांनी देखील परिश्रम घेतले.
0 टिप्पण्या