Trending

6/recent/ticker-posts

कोणी काहीही म्हणो हे सरकार पडणारी नाही याची शाश्वती -  मुख्यमंत्री 

कोणी काहीही म्हणो हे सरकार पडणारी नाही याची शाश्वती -  मुख्यमंत्री मुंबई
विधिमंडळाचे अर्थ संकल्पीय अधिवेशन सोमवारी सुरु झाले. अधिवेशनाला दांडी न मारता हजर राहावे, अशा सूचना महाविकास आघाडीच्या सर्व आमदारांना देण्यात आल्या आहेत. अधिवेशन काळात दररोज सभागृहात हजर राहण्याची सूचना वजा तंबी देण्यात आली आहे. महाविकास आघाडीच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षाच्या आमदारांना अधिवेशनाला दांडी न मारता हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. कोणी काहीही म्हणो हे सरकार पडणारी नाही याची शाश्वती मी देतो, असे सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजप नेते नारायण राणे यांनी टोला लगावला आहे. 
महाविकास आघडीच्या आमदारांच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे कौतुक केलं आहे. सोनिया गांधी चांगल्या विचारांच्या आहेत. सरकारला अडचण निर्माण होईल, असे कुणीही वक्तव्य करू नये, अशी तंबी मुख्यमंत्र्यांनी सर्व आमदारांना दिली आहे.  राज्याची आर्थिक स्थिती, अर्थसंकल्प, शेतकरी कर्जमाफी या मुद्द्यांवर अधिवेशनात चर्चा होईल. तर सीएएविरोधातील आंदोलनं, एल्गार प्रकरणाचा तपास, कोरेगाव-भीमा या मुद्यांवर सत्ताधारी तसेच विरोधक दोन्ही बाजूंकडील सदस्य आक्रमक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळेच हे अधिवेशन चांगलेच गाजणार आहे.
राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेनं एकत्र येऊन स्थापन केलेलं महाविकास आघाडी सरकार येत्या 11 दिवसांत कोसळले, असं भाकीत भाजपचे खासदार नारायण राणे यांनी वर्तवलं आहे. भिवंडी लोकसभेचे खासदार कपिल पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कपिल पाटील फाऊंडेशन यांच्या वतीने भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन तालुक्यातील अंजुर येथे करण्यात आले होते. उद्घाटन सोहळा माजी मुख्यमंत्री आणि खासदार नारायण राणे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी पत्रकारांशी बोलताना महाराष्ट्रातील सरकार अकरा दिवसांत कोसळेल, असं भाकीत नारायण राणे यांनी केले आहे.
अधिवेशन सुरू होण्यापूर्वी विरोधीपक्षाने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसून आंदोलन केले. शेतकऱ्यांना हेक्टरी 25 हजार रूपये मदत देण्याची भाजपाची मागणी आहे. भाजपाकडून विधानभवनाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी करण्यात आली. सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे, शेतकऱ्यांना फसवणाऱ्या सरकारचा धिक्कार असो अशा घोषणाबाजी यावेळी करण्यात आली.  यावेळी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सरकारने दिलेले एकही आश्वासन पुर्ण केले नाही. अवकाळी झालेल्या शेतकऱ्यांना मदत दिली नाही. कर्जमुक्ती करतो सांगितले पण कर्जमाफी केली नाही. महिलांवरचे अत्याचार देखील वाढले आहेत. त्याबाबत सरकारची संवेदनशीलता कुठेही दिसत नाही. आज त्यासंबंधी विषय आम्ही सभागृहात मांडणार आहोत. सरकारला मंत्र्यांसाठी 18 मजल्याची इमारत बांधायची की 36 ची बांधायचे त्यांनी ठरवावे, पण शेतकऱ्यांना दिलेला शब्द पाळावा असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.


Post a Comment

0 Comments