Trending

6/recent/ticker-posts

आमदार प्रणिती शिंदेंचा वंचितने केला निषेध

आमदार प्रणिती शिंदेंचा वंचितने केला निषेधठाणे
वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. बाळासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अपशब्द काढल्याबद्दल काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांचा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निषेध करण्यात आला. काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी तीन दिवसांपूर्वी वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. बाळासाहेब आंबेडकर यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केले आहे. ‘ वा रे मोदी तेरी चाल, वंचित-एमआयएम तेरे दलाल‘ तसेच, एनसीआर-सीएएविरोधात वंचितने एकही आंदोलन केले नाही. एसीएसटीविरोधात निर्णय होत नसताना वंचित शांत आहे. आता कुठे गेले रक्त?  असा सवाल उपस्थित केला होता.  त्या निषेधार्थ सोमवारी वंचित बहुजन आघाडीचे ठाणे जिल्हा समन्वयक राजभाऊ चव्हाण आणि जिल्हा महिला सचिव शंकुतला अवसरमोल यांच्या नेतृत्वाखाली  जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करुन प्रणिती शिंदे यांचा निषेध करण्यात आला. यावेळी, “ प्रणिती शिंदे यांनी जाहीर माफी मागावी; अन्यथा, हे आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा यावेळी राजभाऊ चव्हाण यांनी दिला. या आंदोलनात सुखदेव उबाळे, शहराध्यक्ष संजय मिरगुडे, महेंद्र अंभोरे, गोविंद पाठारे, वैभव जानराव, सुरेश कांबळे, जितेंद्र आडबले, प्रताप जाधव, मारुती गायकवाड, प्रल्हाद शिंदे, अमोल ढगे, प्रेमदास कांबळे, किशन पाईकराव, अमोल पाईकराव, अविनाश खंदारे, राजू चौरे, अरुण हाटकर, सोनाली हाटकर, किशोर कोल्हे, रेश्मा म्हस्के, रंजना म्हस्के, शंकुतला कांबळे, करुणा चौरे, कैलास रगडे, संदीप शेळके, गजानन टारपे, भीम गुप्ता, विनोद पठारे, बिंदू गुप्ता, मिरा मते आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या