असाही व्हॅलेन्टाईन डे साजरा
ठाणे
व्हॅलेन्टाईन डे चं औचित्य साधून प्रेमाची आठवण आयुष्यभर रहावी याकरिता ठाण्यामध्ये सुमारे ३० हून अधिक जोडप्यांनी विवाहबध्द होण्याचा निर्णय घेतला. ठाण्यातील विवाह निबंधकांच्या कार्यालयात या जोडप्यांनी नोंदणी पध्दतीनं विवाह करून आयुष्यभर व्हॅलेन्टाईन डे स्मरणात रहावा यावर शिक्कामोर्तब केलं.
व्हॅलेन्टाईन डे ला आता पूर्वीसारखा विरोध होत नसल्यामुळं व्हॅलेन्टाईन डे ची पूर्वीची मजा गेली असल्याची चर्चा महाविद्यालयातून होत आहे. व्हॅलेन्टाईन डे आज कोणत्याही तणावाविना साजरा झाला. मात्र महाविद्यालयं आणि मॉल्स वगळता व्हॅलेन्टाईन डे चं वातावरण फारसं कुठे दिसलं नाही. आहे. आता व्हॅलेन्टाईन डे हा सामाजिक संकेतस्थळावरच जास्त जाणवतो.
व्हॅलेन्टाईन डे च्या दिवशी आपलं प्रेम कुणीही कुणाशी व्यक्त करू शकतो. असा ट्रेन्ड सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे केवळ युगुलांचा प्रेमदिवस नाही तर आई, वडील, मित्र वा अन्य कुणी असो तुम्ही तुमचे त्याच्यावर किती प्रेम आहे हे व्यक्त करू शकता. आता हा प्रेमदिन कृतज्ञता दिन ठरत आहे. मात्र हा प्रेम व्यक्त करणारा व्हॅलेन्टाईन डे बाबत फारसा उत्साह दिसला नाही.
व्हॅलेन्टाईन डे हा संत व्हॅलेन्टाईन यांचा बलिदान दिन म्हणून साजरा केला जातो. व्हॅलेन्टाईन यांनी प्रेमासाठी बलिदान दिलं. त्यांच्या काळातही प्रेमाला विरोध झाला होता. व्हॅलेन्टाईन प्रेमाच्या बाजूनं ठामपणे उभे राहिले आणि त्यांना आपला जीव गमवावा लागला. पाश्चात्य संस्कृतीतून आपल्याकडे आलेला हा दिवस. त्यामुळं जनमानसात व्हॅलेन्टाईन डे बाबत संमिश्र भावना दिसतात. मूळात व्हॅलेन्टाईन डे हा प्रेम या सच्च्या भावनेशी निगडीत आहे. प्रेम फक्त प्रियकर आणि प्रेयसीतच असतं असं नाही.
0 टिप्पण्या