Trending

6/recent/ticker-posts

 डोंगराला लागलेली आग विझवून अंनिस कार्यकर्तानी दिला पर्यावरण रक्षणाचा संदेश

 डोंगराला लागलेली आग विझवून अंनिस कार्यकर्तानी दिला पर्यावरण रक्षणाचा संदेशठाणे 
अंधश्रद्धा निर्मूलन समिती मार्फत गोपीनाथ मुंडे मंडणगड कॉलेज येथे कार्यकर्ता प्रशिक्षण आयोजित केले होते. कार्यकर्ते मंडणगड येथून खेड कडे परती प्रवास करत असताना अंनिसचे राज्यप्रधान सचिव नंदकिशोर तळासिकर, राज्य सरचिटणीस सुरेखा भापकर, राज्य सरचिटणीस नितीन राऊत बुवाबाजी संघर्ष प्रमुख संदिप गोवळकर, महिल संघटक रेश्मा कांबळे यांना कुवे घाटात डोंगरांळा आग लागलेली दिसली ही आग पुर्ण जंगल नष्ट करणार,वन्य जीवन धोक्यात येणार  हे लशात येताच. क्षणाचा विलंब न लावता आग विझवण्याची सुरवात केली.रात्रीचे आठ वाजले काळोख असल्यामुळेआग विझवण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला.अथक परिश्रमानंतर आग आटोक्यात आणली.
अंनिसची भुमीका ही नेहमी पर्यावरण पुरक कार्यक्रम करत असते.होळी लहान करा पोळी दान करा.गणपती विसर्जन करताना निर्माल्य पाण्यात टाकू  नाका.असे अनेक उपक्रम अंनिस राबवत असते. अंनिसचे नंदकिशोर तळासिकर म्हणाले की,आम्ही जगातील सर्व आगी विझवू शकत नाही पण आम्ही आग लावणारे नाही तर आग विझवणारे आहोत.आम्ही समाज सुधारकारांचा वारसा पुढे घेऊन चाललो आहोत.पर्यावरण रक्षणाची जबाबदारी ही आपली सर्वांचीच आहे.हिच जबाबदारी आम्ही आज पार पाडली. अंनिसचे नितीन राऊत म्हणाले की,आज ना उदा उशिरा  का होईना आमचाच विजय होणार आहे.मी पर्यावरण प्रेमी आहे मला जेवढ शक्य होईल तेवढ मी पर्यावरण रक्षाणाचे काम करत असतो. अंनिसच्या या टिमचे सर्व स्थरातून कौतूक होत आहे.


Post a Comment

0 Comments