Trending

6/recent/ticker-posts

देशभरातील एटीएममधून दोन हजाराची नोट बंद होणार

देशभरातील एटीएममधून दोन हजाराची नोट बंद होणारमुंबई
देशभरातील दोन लाख ४० हजार एटीएम मशीन्समधून दोन हजार रुपयाच्या नोटेचा रॅक हटवण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. त्यामुळे यापुढे ATM मधून १००, २०० आणि ५०० रुपयाच्याच नोटा निघतील. ATM मशीन मध्ये चार ट्रे असतात. त्यातल्या तिघांमध्ये ५०० आणि एकात १०० किंवा २०० रुपयाच्या नोटा ठेवल्या जातील अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. बिझनेस स्टँण्डर्डने दिलेल्या वृत्तानुसार ATM मशीनमध्ये बदलाची प्रक्रिया पुढच्या काही महिन्यात पूर्ण होईल. काही दिवसांपूर्वीच इंडियन या सरकारी बँकेने देशभरातील आपल्या ३ हजार एटीएम मशीन्समध्ये दोन हजाराची नोट भरण्याची प्रक्रिया बंद करण्याचे निर्देश दिले होते.
आठ नोव्हेंबर २०१६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीचा निर्णय जाहीर करताना ५०० आणि एक हजार रुपयाच्या नोटेवर बंदी घातली होती. त्यानंतर काही काळाने ५०० रुपयाची नवीन आणि दोन हजाराची नोट बाजारात आली. दोन हजाराच्या नोटेमुळे छोटे रक्कमांचे व्यवहार करताना अडचणी येतात असा अनेकांचा अनुभव आहे. तसेच दोन हजारची नोट काढल्यानंतर पुन्हा छोटया रक्कमेच्या नोटा काढण्यासाठी लोक बँकांच्या शाखांमध्ये येतात. त्यामुळे मोठी रांग लागते असा बँकेचा तर्क होता. एटीएममधून दोन हजारची नोट गेल्यामुळे सर्वसामान्यांवर त्याचा काहीही परिणाम होणार नाही. सरकार हळूहळू या नोटांना व्यवहारातून हटवण्याच्या तयारीत असल्याची सूत्रांची माहिती आहे.


 


Post a Comment

0 Comments