Trending

6/recent/ticker-posts

पाच दिवसाचा आठवडा : राज्य सरकारी संघटनेच्या वतीने उपजिल्हाधिकारी यांना पुष्पगुच्छ देऊन आभार

पाच दिवसाचा आठवडा : राज्य सरकारी संघटनेच्या वतीने उपजिल्हाधिकारी यांना पुष्पगुच्छ देऊन आभारठाणे :


मागील अनेक वर्षापासून केंद्राच्या धर्तीवर राज्यातही ५ दिवसाचा आठवडा सुरू करण्यात यावा, अशी मागणी सरकारी कर्मचाऱ्यांच्या विविध संघटनांकडून केली जात होती. अखेर ही मागणी पूर्ण झाली आहे. याबद्दल राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना  ठाणे जिल्हा वतीने निवासी उपजिल्हाधिकारी यांना पुष्पगुच्छ देवुन शासनाचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी संघटनेचे   भास्कर. गव्हाळे - सरचीटणीस   प्राची. चाचड- अध्यक्षा आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.
 २९ फेब्रुवारीपासून सरकारी कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा लागू होणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या आज 12 फेब्रुवारी रोजी झालेल्या बैठकीत हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला.केंद्राच्या धर्तीवर राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना ६ दिवसांच्या आठवड्याऐवजी ५ दिवसाचा आठवडा केल्यास त्याचा परिणाम सरकारी कामकाजावर होण्याची भीती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली होती. त्यामुळे त्यांनी या प्रस्तावास विरोध केला होता, असं सांगितलं जात आहे. सध्याच्या परिस्थितीत असलेला ६ दिवसांचा आठवडा पध्दत कायम ठेवण्याची भूमिका त्यांनी घेतल्याचे सांगितलं जातं.
पाच दिवसांचा आठवडा केल्यास सरकारी कार्यालयाच्या वेळांमध्ये वाढ करावी लागणार आहे. १० वाजता सुरू होणारी कार्यालये सकाळी ९ वाजता सुरू करावी लागणार असून, सायंकाळी ६ ते ७ वाजेपर्यंत कामकाजाची वेळ वाढवावी लागणार आहे. दिवसभरात ८ तासांपेक्षा जास्त काम करण्याची मानसिकता सध्याच्या घडीला सरकारी कर्मचाऱ्यांची नसताना, कार्यालयीन वेळ वाढवून कामकाजाचा निपटारा कसा होणार असा सवालही त्यांनी उपस्थित केला होता. या प्रस्तावाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विरोध होता. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पाच दिवसांचा आठवडा करण्यासाठी आग्रही होते, असं सूत्रांचं म्हणणं होतं. सर्वच सरकारी कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी यासंदर्भात त्यांच्याकडे निवेदनं दिली होती. पाच दिवसांचा आठवडा करण्याची मागणी या संघटनांनी केली होती. अखेर बुधवारी मंत्रिमंडळ बैठकीत यावर शिक्कामोर्तब झालं. सरकारी कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा लागू करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. 


Post a Comment

0 Comments