Top Post Ad

परवानग्या नसताना क्लस्टरचा मुहूर्त कसा ? - निरंजन डावखरे

ठाणे :गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात ठाण्यातील क्लस्टर योजनेचा मुहूर्त साधण्याचा दावा ठाणे पालिकेने केला होता. परंतु, तो फोल ठरल्यानंतर आता येत्या ६ फेब्रुवारी रोजी क्लस्टरचे भूमिपूजन निश्चित झाले आहे. मात्र, या क्लस्टरला शासनाची अद्याप मंजुरीच नसल्याने ही लगीनघाई कशासाठी असा सवाल भारतीय जनता पक्षाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष निरंजन डावखरे आणि आमदार संजय केळकर यांनी केला आहे.  ठाणे महापालिकेचे हे प्रस्ताव मंजुरी प्रक्रियेत असून जोपर्यंत शासनाच्या मंजुरीची प्रक्रिया पूर्ण होत नाही, तोपर्यंत प्रत्यक्षात कामाला सुरुवात करता येत नाही.  भूमिपूजनास दोन दिवस असताना पालिकेचे अधिकारी आता परवानगी मिळवण्याच्या कामाला लागले आहेत. अशी माहितीही डावखरे यांनी दिली. 
क्लस्टर भूमिपूजन आणि वास्तव याबाबत आज दिनांक ३ फेब्रुवारी रोजी ठाण्यातील भाजप कार्यालयात  पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी नगरसेवक संजय लेले आणि इतर पदाधिकारीही उपस्थित होते.  


क्लस्टर प्रकल्पाच्या यूआरपीला (अर्बन रिन्यूअल प्लॅन) मंजुरी मिळालेली नसून, अद्यापी आयओडी (इंटिमेशन ऑफ डिसअॅप्रूव्हल) देण्यात आलेली नाही. त्यामुळे ई-भूमिपूजन करण्यासाठी लगीनघाई का केली जात आहे, याकडे आमदार डावखरे यांनी लक्ष वेधले. त्याचबरोबर गावठाणे व कोळीवाडे वगळण्याबाबात पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबरोबर चर्चा करुन भूमिका जाहीर करावी, क्लस्टरबाबत सुस्पष्टता हवी. नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होता कामा नये, अशी भू्मिका मांडत आ. डावखरे यांनी  ठाणे महापालिकेच्या वेबसाईटवर क्लस्टरबाबत कोणतीही माहिती नसल्याकडे लक्ष वेधले.
 क्लस्टर योजना  कोळीवाडा, गावठाणात राबवू नये, गावठाणांचे सीमांकन करावे, गावठाणासाठी नवीन विकास योजना बनवावी. अशा मागण्या योजनेच्या सुरुवातीपासून प्रलंबीत आहेत. मात्र याकडे पालकमंत्री जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत. क्लस्टर योजनेची सुरुवात करण्यासाठी भाजप सरकारनेच पुढाकार घेतला. त्यावेळचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच या योजनेला मंजुरी दिली. मात्र शिवसेनेने सोयिस्कर रित्या पोस्टर, बॅनरबाजीकरून त्याचे श्रेय स्वत:कडे घेतले.  आजही मागील सरकारच्या अनेक योजनांना स्थगिती देण्यात आली असताना केवळ क्लस्टर योजनेला गती देण्याचे काम सरकार करीत आहे. हे करीत असताना क्लस्टर राबविण्यात येणारे अडथळे आणि परवानग्या इत्यादी गोष्टींकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. या सगळ्या समस्या पालकमंत्रींना माहिती आहेत. कारण मागील वेळेसही तेच पालकमंत्री होते आजही तेच आहेत. केवळ वरची पाटी बदलली आहे अशी खोचक टिका आमदार संजय केळकर यांनी केली.  क्लस्टरला  विरोध नाही. मात्र, सर्व प्रक्रिया ही नियमानुसार झाली पाहिजे, त्या योजनेचा एसआरए होऊ नये असे मतही केळकर यांनी व्यक्त केले. 
विधानसभा निवडणुकीमध्ये प्रचाराचा महत्त्वाचा मुद्दा ठरलेल्या या क्लस्टरचे आता विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्याचे निश्चित झाले आहे. महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर क्लस्टरच्या कामाला गती मिळाली असून निवडणुकीपूर्वी ठाणेकरांना दिलेले क्लस्टर योजनेचे आश्वासन यानिमित्ताने पूर्ण होत असल्याने या सोहळ्यासाठी शिवसेनेचे पदाधिकारीदेखील आतापासून कामाला लागले आहेत. मोठ्या प्रमाणात क्लस्टरचा भूमिपूजन सोहळा करण्याचा घाट घातला असला, तरी ठाणे महापालिकेने राज्याच्या नगरविकास खात्याकडे पाठवण्यात आलेल्या किसननगरसह इतर चार प्रस्ताव अद्याप मंजुरीच्या प्रक्रि येत असल्याचे नगरविकास खात्याने स्पष्ट केले आहे. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com