Top Post Ad

 चारशेहून अधिक अकस्मात मृत्यूची चौकशी

 चारशेहून अधिक अकस्मात मृत्यूची चौकशीठाणे :


ठाणे ,नवी मुंबई व मिरा – भाईंदर, यांच्या  तीन महानगरपालिका हद्दीत ऑगस्ट 2019 ते डिसेंबर 2019 या वर्षात झालेल्या 408 अकस्मात मृत्युंची उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयामार्फत चौकशी करण्यात येत  असुन ज्यांना कुणाला या संदर्भात काही म्हणणे मांडायचे असल्यास त्यांनी सात दिवसांत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे ते मांडावे. मनपा हद्दीत ,एकूण दोन उपविभागीय पोलीस अधिकारी ,व 6 (सहा ) सहाय्यक पोलीस आयुक्त आहेत.त्याच्याकडून 408 मयत व्यक्तीच्या प्रकरणांची अकस्मात मृत्यू म्हणून नोंद झाली आहे. जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे यांचे संकेतस्थळावर www.thane.nic.in उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय ठाणे 217 दुसरा मजला,जिल्हाधिकारी कार्यालय,ठाणे कोर्ट नाका ठाणे पश्चिम या ठिकाणी मयत इसमांच्या मृत्यूबाबत कारणाबाबत त्यांचे नातेवाईक,हितसंबंधित अथवा तक्रार,हरकत असल्यास याबाबतचे म्हणणे किंवा त्याबाबतचे पुरावे,साक्ष देणेची असल्यास संबधितांनी हा जाहिरनामा प्रसिध्द झाल्यापासुन सात दिवसांच्या आत उपविभागीय दंडाधिकारी ठाणे येथे मांडावे असेआवाहन उपविभागीय दंडाधिकारी  अविनाश शिंदे यांनी केले आहे. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com