उत्तर प्रदेशच्या सोनभद्र जिल्ह्यात असलेली 'सोन पहाडी' डोंगरात 2943.25 टन सोने
सोनभद्र -
उत्तर प्रदेशच्या सोनभद्र जिल्ह्यात असलेली 'सोन पहाडी' (सोन डोंगर) खरोखर सोन्याचा निघाला आहे. जियोलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया आणि इतर तज्ञांनी या डोंगरात 2943.25 टन सोने दडल्याचा अधिकृत दुजोरा दिला आहे. सोबतच, या परिसरातील जमीनीमध्ये अतिरिक्त 646.15 किलो सोने असल्याचे समोर आले आहे. वरिष्ठ अधिकारी रोशन जेकब यांनी प्रमुख खनिज संपत्तीच्या लिलावाचे आदेश जारी केले आहेत. हे लिलाव ई-टेंडरिंगच्या माध्यमातून ऑनलाइन केले जाणार आहेत. लिलावापूर्वी खनिज संपत्ती असलेल्या स्थळांना जिओ टॅगिंगसाठी सात सदस्यीय टीम स्थापित करण्यात आली आहे. याचा अहवाल शनिवारी तयार केला जाणार आहे.
उल्लेखनीय बाब म्हणजे, भारत सरकारकडे सध्या राखिव (रिझर्व्ह) असलेल्या सोन्याचे प्रमाण 618 टन आहे. जियोलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या टीमने 15 वर्षांपूर्वी अभ्यास करून सोनभद्रच्या जमीनीखाली सोन्याचे भांडार असल्याचा दावा केला होता. 2005 करण्यात आलेल्या दाव्याची पुष्टी 2012 मध्ये झाली होती. तरीही या दिशेने अद्याप कामाला सुरुवात झाली नव्हती. आता राज्य सरकारने त्यावर लक्ष घालून सोन्याच्या साठ्यांचे ब्लॉक वाटप करण्याचे काम सुरू केले आहे. या ठिकाणी जवळपास 12 लाख कोटी रुपयांची खनिज संपत्ती असल्याचा अंदाज आहे.
सोनभद्रच्या सलैयाडीह परिसरामध्ये अॅडाल्युसाइट, पटवध परिसरात पोटॅश, भरहरी येथे लोह आयस्क आणि छपिया ब्लॉकमध्ये सिलीमॅनाइटचे भांडार सुद्धा सापडले आहेत. जिल्ह्यातील खनिज अधिकारी के.के. राय यांनी सांगितल्याप्रमाणे, येथे युरेनियमचे भांडार सुद्धा असण्याची दाट शक्यता आहे. त्याचा शोध घेण्यासाठी केंद्रीय आणि इतर टीम सध्या काम करत आहे. अशी माहिती दिव्य मराठी वेब टीम प्रकाशित केली आहे.
0 टिप्पण्या