Top Post Ad

ठाण्यात युरेका सायन्स फेअर 2020 चे आयोजन 

ठाण्यात युरेका सायन्स फेअर 2020 चे आयोजन 
विज्ञान प्रदर्शनातून उलगडली विज्ञानाची दुनिया 



ठाणे ; 
सेंद्रिय शेती , घरातील कचरा साफ करण्याचे यंत्र, बॉयोगॅस प्रकल्प , फुफ्फुसांची कार्यक्षमता मोजण्याचे यंत्र, असे अनेक प्रयोग असलेल्या विज्ञानाची दुनिया आज ठाणेकरांना अनुभवायला मिळाली. सावरकर नगर येथील आर जे ठाकूर विद्यालय, आर्च डेव्हलपमेंट फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने युरेका सायन्स फेअर २०२० चे आयोजन करण्यात आले. या विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन कोव्हेंस्ट्रोचे व्यवस्थापकीय संचालक आनंद श्रीनिवासन यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रदशनीमध्ये ठाणें, नवी मुंबईतील ११ शाळांनी सहभाग घेतला होता. तर २३० विज्ञान प्रकल्प विद्यार्थ्यांनी सादर केले. 
याबाबत बोलताना आनंद श्रीनिवासन म्हणाले की, विज्ञान जगतात भारताने उत्तुंग शिखर गाठलेले आहे. विद्यार्थी जीवनापासून विज्ञानाची ओळख विद्यार्थ्यांना व्हावी व यातून भविष्यात याच विद्यार्थ्यांनी भारताच्या विकासात हातभार लावावा” अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. विज्ञानाने केलेली प्रगती आणि यात तरुण आणि शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग हा देश पातळीवर दिवसेंदिवस वाढत आहे. या उद्देशाने सदर विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनात सेंद्रिय शेतीची आवश्यकता व ती करण्याची पद्धती या विज्ञान प्रकल्पाचे मान्यवरांनी कौतुक केले. यावेळी ठाणे नवी मुंबईतील अनेक शाळांमधील प्राध्यापक, मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, उपस्थित होते. दरम्यान तयार केलेल्या प्रयोगाबद्दल माहिती देत विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com