औरंगाबाद : मुंबईला जाण्यासाठी औरंगाबादहून रात्री अडीच वाजता राज्यराणी एक्स्प्रेस सुटेल आणि सकाळी दहापर्यंत मुंबईला पोचेल. येत्या दहा जानेवारीपासून राज्यराणी एक्स्प्रेस धावणार आहे. मनमाड ते मुंबई धावण्या राज्यराणी एक्स्प्रेसचा विस्तार नांदेडपर्यंत करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. रेल्वे विस्ताराचा निर्णय रेल्वे मंत्री पियूष गोयल यांनी जाहीर केला होता. यानंतर नाशिक आणि मनमाडमध्ये विरोध करण्यात आला. हा विरोध कमी करण्यासाठी नांदेड ते मनमाडदरम्यान दोन डबे नाशिक आणि मनमाडच्या प्रवाशांसाठी आरक्षित ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. हा विरोध कमी झाल्यानंतर सहा जानेवारी रोजी रेल्वेने नांदेड - मुंबई एक्स्प्रेसचे वेळापत्रक जाहीर केले. नांदेड - मुंबई राज्यराणी एक्स्प्रेस ही रेल्वे १७ डब्यांची असेल. नांदेडहून ही रेल्वे औरंगाबादला रात्री दोन वाजून ४० मिनिटांनी पोचणार आहे. मुंबई ते नांदेडकडे येत असताना ही रेल्वे औरंगाबाद रेल्वे स्टेशनवर रात्री दोन वाजून दहा मिनिटांनी पोचणार आहे, अशी माहिती रेल्वे 8 विभागाकडून देण्यात आली आहे. नांदेड ते सीएसटीएम एक्स्प्रेस (क्रमांक १७६११) नांदेडहून रात्री दहा वाजता निघेल. पूर्णा येथे १०.३५ वाजता, परभणीला २३.१८ वाजता, मानवत रोडला २३.३९, सेलू २३.५५, परतूर येथे १२.३५, जालना १.२३, औरंगाबाद २.३५, लासूर ३.१४, रोटेगाव ४.०१, मनमाड - ५.२०, नाशिक रोड ६.१२, देवळाळी ६.२३, इगतपूरी ७.१५, कसारा ७.४८, कल्याण - ८.४८, ठाणे ९.१३ आणि सीएसटीएमला ही रेल्वे सकाळी १०.०७ वाजता पोचणार आहे. परतीचा प्रव परतीचा प्रवास... मुंबई सीएसटीएम ते नांदेड एक्स्प्रेस (क्रमांक १७६१२ ) मुंबईहून सायंकाळी सहा वाजून ५० मिनिटांनी निघणार आहे. कल्याण येथे १९.४३, कसारा २०.४८, इगतपुरी २१.१५, देवळाळी २१.५८, नाशिक रोड २२.०५, मनमाड २३.४५, रोटेगाव १२.५९, लासूर १.२४, औरंगाबाद २.१०, जालना ३.२३, परतूर ३.५९, सेलू ४.२९, परभणी ५.२५, पूर्णा ६.२० आणि नांदेडला सकाळी ७.२० वाजता रेल्वे पोचेल.
0 टिप्पण्या