शिवापूर टोलबाबत जिल्हाधिकाऱ्यांचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला पत्र
शिवापूर पुणे : तब्बल नऊ वर्षे कामाची रखडपट्टी होऊनही अद्यापही अनेक कामे अपूर्ण असलेल्या आणि त्यामुळे वाहतुकीस धोकादायक झालेल्या पुणे-सातारा रस्त्यावरील रिलायन्स इक्रा कंपनीचा टोल नाका बंद करण्याबाबत निर्णय घेण्याचे पत्र जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या सरव्यवस्थापकांना दिले आहे. याच कारणांवरून प्राधिकरणाच्या पुणे महाव्यवस्थापकांनी यापूर्वीही हा टोल नाका बंद करण्याबाबत निर्णय घेण्याची शिफारस वरीष्ठ कार्यालयाकडे केली होती. मात्र, त्याबाबत निर्णय घेतला गेला नसल्याचे वास्तवही जिल्हाधिकायांच्या पत्रावरून स्पष्ट झाले आहे. मुंबई- बंगळुरु राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारचा भाग असलेल्या पुणे-सातारा रस्त्याच्या सहापदरीकरणाचे काम रिलायन्सला ऑक्टोबर २०१० मध्ये देण्यात आले होते. मूळच्या अडीच वर्षांच्या कामाला साडेसहा वर्षांची मुदतवाढ देण्यात आली. या कालावधीतही हे काम पूर्ण झाले नाही. रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे अपघात होतात. उड्डाणपूल, सेवा रस्त्यांची कामे अपूर्ण आहेत. या सर्वामुळे वाहनधारक, प्रवासी त्रस्त टोलबाबत जिल्हाधिकाऱ्यांचे असतानाही टोलवसुली मात्र चोखपणे सुरू आहे. रस्त्याच्या रखडलेल्या कामाबद्दल यापूर्वीही आंदोलने झाली. संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याचे भाष्य केले होते. त्यावर पुढे काहीही झाले नाही. . रस्त्याबाबत सर्वच प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी १५ डिसेंबर २०१९ रोजी लोकप्रतिनिधी, आंदोलक आणि अधिकायांची जिल्हाधिकायांशी बैठक झाली. त्यात आमदार भीमराव तापकीर, संग्राम थोपटे,खेड शिवापूर टोल हटाव कृती समितीचे माउली दारवटकर, टोलचे अभ्यासक संजय शिरोडकर यांची प्रमुख उपस्थिती होती. या बैठकीत ठरावीक कालावधीत रखडलेली कामे पूर्ण करण्याचे आश्वासन ठेकेदार आणि अधिकायांकडून देण्यात आले होते. त्याची पाहणी करण्यासाठी याच बैठकीत जिल्हाधिकायांनी समितीची प्राधिकरणाला पत्र स्थापना जाहीर केली होती. समितीने रस्त्याच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी करून जिल्हाधिकायांना नुकताच अहवाल सादर केला. त्याबाबतही जिल्हाधिकायांनी पत्रात उल्लेख केला आहे. ३१ डिसेंबपर्यंत प्रलंबित कामे पूर्ण करण्याबाबत प्राधिकरणाच्या प्रकल्प संचालकांनी दिलेली आश्वासने प्रत्यक्षात पूर्ण झाली नसल्याचे समितीच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. महामार्गाच्या मानांकनानुसार कामे झाली नसल्याने हा रस्ता अपघातास कारणीभूत ठरत असल्याचा अहवाल यापूर्वी सुरक्षा लेखापरीक्षकांनी दिला होता. त्यानंतर काही दिवसांनी प्राधिकरणाच्या पुणे महाव्यवस्थापकांनी धोकादायक रस्त्याच्या मुद्द्यावर खेड शिवापूरचा टोल नाका बंद करण्याची शिफारस प्राधिकरणाच्या मुंबई कार्यालयाकडे केली होती. ही बाब जिल्हाधिकायांच्या पत्रातून पुढे आली आहे. रस्त्याच्या कामाबाबत झालेली अनियमितता दिसून येत आहे. नागरिक तीव्र आंदोलनाच्या तयारीत असल्याने कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यामुळे याबाबत योग्य निर्णय घ्यावा, अशी सूचना जिल्हाधिकायांनी प्राधिकरणाला दिलेल्या पत्रात केली आहे.
0 टिप्पण्या