Top Post Ad

जव्हारचा पर्यटनस्थळ म्हणून विकास

मुंबई  :


 पालघर जिल्ह्यातील जव्हार हे थंड हवेचे ठिकाण, महाबळेश्वरसारखे विकसित करण्याचा विचार पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.  त्यासाठी पालघर परिसरात पर्यटनस्नेही वातावरण तसेच सोयी सुविधा उभारण्याला प्राधान्य देण्याचे आदेश त्यांनी दिले.  जव्हार येथे असलेला जुना राजवाडा नगरपरिषदेच्या ताब्यात आला असून पर्यटकांसाठी हॅाटेल म्हणून  विकसित करण्यासंदर्भात  प्राथमिक चर्चाही यावेळी झाली. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी यांनी मंत्रालयात झालेल्या एका बैठकीत त्या संदर्भात चर्चा केली. 
 तसेच धोकादायक इमारतींमधून मुख्यालयाचे कामकाज चालवणाऱ्या पालघर नगरपरिषदेला त्यासाठी अत्याधुनिक इमारत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून पालघर जिल्ह्यातील अन्य नगरपरिषदांच्या मुख्यालय इमारतींनाही नवी झळाळी मिळणार आहे. त्याच बरोबर या आस्थापनांच्या  घनकचरा व्यवस्थापन, पाणी योजना आणि रस्त्यांसाठींच्या योजना  मार्गी लागणार आहेत. पालघर जिल्ह्यातील नगरपरिषदांसमोर विकासकामांबाबत असलेल्या अडचणीं नगरविकासमंत्र्यांसमोर मांडण्याकरता एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी खासदार राजेंद्र गावित, आमदार रवींद्र फाटक, श्रीनिवास वनगा, जिल्ह्यातील बहुसंख्य नगरपरिषदांचे नगराध्यक्ष आणि त्यांचे मुख्याधिकारी तसेच जिल्ह्याचे लोकप्रतिनिधी या बैठकीसाठी उपस्थित होते. 
आदिवासीबहुल असलेल्या पालघर तालुक्याच्या विकासात निधीच्या अनुपलब्धता हा मुख्य अडसर असल्याचे गाऱ्हाणे या सगळ्या लोकप्रतिनिधींनी  नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मांडली. जलयोजना, घनकचरा व्यवस्थापन, गटारे, रस्ते आणि प्रशासकीय इमारतींची अवस्था असे मुद्दे यावेळी चर्चेस आले. शासकीय पदे रिक्त असल्याने प्रशासकीय अडचणी उभ्या रहात असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. या सार्‍या समस्यांची दखल घेत एकनाथ शिंदे यांनी अधिकाऱ्यांना  तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश दिले.
वाडा येथे होणाऱ्या फटाकेविक्रीच्या व्यवसायात ५०० कोटींची उलाढाल होते. दिवाळी दरम्यान होणाऱ्या या फटाकेविक्रीच्या व्यवसाया दरम्यान मोठी दुर्घटना होण्याची शक्यता असते.  इथे अग्निशमन दलाची विकसित सोय नसल्यामुळे गंभीर परिस्थिती उभी राहू शकते, त्यासाठी तेथे स्वतंत्र अग्निशमन दलाची व्यवस्था असावी अशी तेथील नगराध्यक्षांची मागणी होती. त्यासंदर्भात वाडा येथे अग्निशमन दल उभारणीच्या बाबत चाचपणी करण्याचे निर्देशही एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com