Trending

6/recent/ticker-posts

आज मुंबईत मूकनायक राष्ट्रीय सन्मान सोहळा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे 93 वर्षांचे सहकारी येणार!

 मुंबई, दि. 30 जानेवारी : `


भारतरत्न' डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दलितांच्या जागृतीसाठी चालवलेल्या `मूकनायक' या पहिल्या पाक्षिकाची शताब्दी शुक्रवारी 31 जानेवारी, 2020 रोजी महाराष्ट्रासहीत देशभरात साजरी होणार आहे. त्यानिमित्त मुंबई मराठी पत्रकार संघ आणि राजस्थानातील `प्रभात पोस्ट' या अग्रगण्य बहुजनवादी साप्ताहिकाच्या वतीने संध्याकाळी 4 वाजता पत्रकार संघात शताब्दी सोहळयाचे आयोजन करण्यात आले आहे.


या सोहळयाची घोेषणा मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष  . नरेंद्र विश्वनाथराव वाबळे आणि `प्रभात पोस्ट'चे संपादक राजकुमार मल्होत्रा यांनी काल एका पत्रकार परिषदेत केली. तर, या सोहळयात बहुजन चळवळीतील सुमारे 30 साहित्यिक, विचारवंत, पत्रकार, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यांना `मूकनायक राष्ट्रीय सन्मान 2020' या पुरस्काराने गौरवण्यात येईल, अशी घोषणा `प्रभात पोस्ट'चे संपादक राजकुमार मल्होत्रा यांनी यावेळी केली. मल्होत्रा यांच्यासोबतच माजी प्रधान संचालक (आयकर) के. सी. घुमरिया यांच्या संकल्पनेतून मूकनायक राष्ट्रीय सन्मान 2020 हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे.


`मूकनायक राष्ट्रीय सन्मान 2020' या पुरस्काराच्या मानकऱ्यांमध्ये ज. वि. पवार, प्रा. दामोदर मोरे, प्रा. लक्ष्मण गायकवाड, संभाजी भगत, हिराताई बनसोडे, उर्मिला पवार, प्रा. प्रज्ञा दया पवार, दिवाकर शेजवळ, सुनील खोब्रागडे, डॉ. सरोज आगलावे, चंद्रकांत सोनावणे, डॉ. प्रकाश राहुल, सुनील झोडे, सुशिल पगारे, किशोरीलाल मीणा यांचा महाराष्ट्रातून समावेश आहे.


तसेच अन्य राज्यांतून मूकनायक राष्ट्रीय सन्मान 2020 या पुरस्कारासाठी एच. एल. दुसाद (लखनौ), हरदान हर्ष (जयपूर), डॉ. लालसिंग (फरीदाबाद), वीरभद्र कार्कीढोली (सिक्कीम), अशोक भटनागर (जयपूर), प्रभाकर ढगे (गोवा), जयप्रकाश कर्दम (दिल्ली), डॉ. आमना मिर्झा (दिल्ली), पी. शिवकामी (तामिळनाडु), टी. कुट्टीमनी (कर्नाटक), महेश वर्मा (राज.) यांचा समावेश आहे. अशी माहिती मल्होत्रा यांनी दिली.


या समारंभात `दलित पँथर'चे संस्थापक नेते राजा ढाले, नामदेव ढसाळ यांना मरणोत्तर पुरस्कार देण्यात येणार असून तो त्यांच्या कुटुंबियांना प्रदान करण्यात येणार आहे.


डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे 93 वर्षांचे सहकारी येणार!


`मूकनायक' राष्ट्रीय सन्मान सोहळयाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे एक सहकारी आणि तत्कालीन पत्रकार के. सी. सुलेख, चंदिगड हे उपस्थित राहणार आहेत. ते आता 93 वर्षांचे आहेत, असे मल्होत्रा यांनी सांगितले.


सोहळयाचे प्रमुख अतिथी : सदर कार्यक्रमात अभिजीत मोरे, अमृता लोखंडे मोरे, सितार वादन व बासरी वादन सांस्कृतिक कार्यक्रम आयोजन करण्यात आला आहे. संभाजी भगत (लोकशाहीर), मूकनायक वर `डॉक्युमेंटरी फिल्म' प्रदर्शित करण्यात येईल.


प्रमुख पाहुणे : आनंदराज आंबेडकर, उद्घाटक : डॉ. रामेश्वर उरांव, कॅबिनेट मंत्री, झारखंड तथा माजी केंद्रीय मंत्री, भारत सरकार, मुख्य संयोजक : मा. के. सी. घुमरिया, मुख्य वक्ता : डॉ. भालचंद्र मुणगेकर, आमंत्रित विशेेष अतिथी : मा. छगन भुजबळ, खाद्य आणि नागरिक आपूर्ति मंत्री, मा. नितीनजी राऊत, ऊर्जा मंत्री, महाराष्ट्र,
मा. वर्षाताई गायकवाड, शिक्षण मंत्री, महाराष्ट्र.


Post a Comment

0 Comments