Top Post Ad

' इंडिया ' च्या ईव्हीएम विरोधी ठरावाचं सर्वत्र स्वागत


  इंडिया आघाडीची 19 डिसेंबर रोजी बैठक संपन्न झाली या बैठकीत ईव्हीएम विरोधी स्पष्ट भूमिका घेण्यात आली. त्याबद्दल या आघाडीतील सर्व घटक पक्षांचे अभिनंदन केलं पाहिजे.देशातील सर्वात मोठा विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेस पक्षाने या आधी फेब्रुवारी महिन्यात रायपूर येथील अधिवेशनातही ईव्हीएम विरोधी ठराव केला होता.काँग्रेसच्या या सुधारीत आवृत्तीचं स्वागतच केलं पाहिजे.देशात ईव्हीएम आणणाऱ्या काँग्रेसचा ईव्हीएम हटाव म्हणेपर्यंतचा मधला प्रवास स्वतः काँग्रेस आणि देशाची पण किती दुर्दशा करून गेला ते दिसतंचं आहे.म्हणून देर आये दुरुस्त आये म्हणण्याची पाळी आली  असल्याचे मत ईव्हीएम विरोधी राष्ट्रीय जन आंदोलनाचे निमंत्रक रवि भिलाणे यांनी व्यक्त केले.

            २०१४ च्या निवडणुकीनंतर देशात भाजपचं ईव्हीएम सरकार स्थापन झालं होतं.त्यावेळी ईव्हीएम विरोधात देशपातळीवर बोलल जात होतं. मात्र तो आवाज क्षीण होता.सामाजिक कार्यकर्ते,संस्था, संघटना आपापल्या पातळीवर ईव्हीएम विरोधात आपला राग प्रकट करत होते.  २०१८ नंतर लोकांचे दोस्त संघटनेतर्फे सर्वप्रथम ईव्हीएम विरोधात संघटित आंदोलन सुरू झालं.२९ ऑगस्ट २०१८ रोजी दोस्तांनी काँग्रेसचे तत्कालीन महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांना भेटून ईव्हीएम विरोधात काँग्रेसने स्पष्ट भूमिका घ्यावी असं निवेदन दिलं. काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी ही भेट घडवून आणली होती.त्यानंतरच्या ईव्हीएम विरोधी राष्ट्रीय जन आंदोलनांमध्ये अशोक चव्हाण, नसीम खान,भाई जगताप ,नाना पटोले,बाळासाहेब थोरात इत्यादी काँग्रेस नेते अनेकदा सोबत उभे राहिले.याच दरम्यान दोस्तांनी बाळासाहेब आंबेडकर,राज ठाकरे आदी नेत्यांच्याही भेटीगाठी घेतल्या.दोस्तांच्या वतीने २ ऑक्टोबर २०१८ रोजी महात्मा गांधी जयंतीनिमित्त जुहू येथील महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर ईव्हीएम विरोधात सामूहिक उपोषण आंदोलन केले गेले. तोपर्यंत तरी कोणाही राजकीय पक्ष संघटनेनं ईव्हीएम विरोधात ठोस पाउल उचललं नव्हतं.

         २०१८ च्या लोकसभा निवडणुकीनंतर देशात पुन्हा एकदा ईव्हीएम सरकार स्थापन झालं आणि ईव्हीएम विरोधी आंदोलनाला जोर आला.पत्रकार निरंजन टकले यांनी जनता दल सेक्युलर पक्षाच्या चर्चगेट येथील प्रदेश कार्यालयात ईव्हीएम द्वारे केल्या गेलेल्या मतांच्या घोटाळ्याची आकडेवारीनिशी चिरफाड केली.माजी न्यायमूर्ती कोळसे पाटील यांनी ही बैठक बोलावली होती.याच बैठकीत ईव्हीएम विरोधी राष्ट्रीय जन आंदोलनाचा जन्म झाला. रवि भिलाणे,फिरोज मिठीबोरवाला,ज्योती बडेकर,धनंजय शिंदे हे राष्ट्रीय निमंत्रक म्हणून काम करू लागले..या आंदोलनाला सामाजिक कार्यकर्ते,संस्था,संघटना यांनी जोरदार प्रतिसाद दिला.गल्ली ते दिल्ली पर्यंत बैठका परिषदा झाल्या.9 ऑगस्ट क्रांती दिनी ऑगस्ट क्रांती मैदान ते चैत्यभूमी अशी ईव्हीएम विरोधी रॅली झाली.महाराष्ट्राच्या तेवीस जिल्ह्यात ईव्हीएम विरोधी महायात्रा काढली.इतर पक्ष संघटना आणि कार्यकर्तेही आपापल्या परीने ईव्हीएम विरोधी जन जागरण करत होते.त्यानंतर राजकीय पक्ष हळूहळू जागे झाले.राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्याताई चव्हाण कायम ईव्हीएम विरोधी आंदोलनाच्या सोबत राहिल्या आहेत.जनता दल ( सेक्युलर ),डावे पक्ष,आप,विविध रिपब्लिकन गटही कायम सोबत होते.पुढेही राहतील असं दिसतंय.मात्र काँगेस सारख्या सर्वात मोठया विरोधी पक्षाचं राष्ट्रीय धोरण काही स्पष्ट होत नव्हतं.

              दिल्लीतील ईव्हीएम विरोधी राष्ट्रीय परिषदेच्या आधी आम्ही भाजप वगळता सर्वच पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या भेटी घेतल्या.तशीच राहुल गांधींबरोबरही भेट ठरली.संध्याकाळी सहाची वेळ ठरली होती.मात्र दर अर्ध्या एक तासाने आम्हाला निरोप मिळायचा...राहुल गांधी यांचं विमान लेट झालंय ! रात्री दहा पर्यंत हाच प्रकार चालला होता. दुसऱ्या दिवशी एका काँगेस नेत्याने सांगितलं...काँगेस अध्यक्षपदाच्या अंतर्गत वादामुळे सध्या काही खरं नाही.आमचा अध्यक्ष पदाचा निर्णय झाला की तुमची भेट करून देऊ.याच काळात मुंबईत सर्व विरोधी पक्षाच्या संयुक्त पत्रकार परिषदा झाल्या.आता ईव्हीएम विरोधी निर्णायक लढा उभा राहील असं वाटत असतानाच राजकीय पक्षांनी कच खाल्ली.आणि सगळंच बारगळलं.

            आता काँग्रेस अध्यक्ष पदी  मल्लिकार्जुन खरगे विराजमान झालेत. काँग्रेसने ईव्हीएम विरोधात थेट जाहीर भूमिका घेतली आहे.इंडिया आघाडीनेही लढ्याचा ठोस पवित्रा घेतला आहे.बाकी अनेक छोटे मोठे पक्ष,संघटना,कार्यकर्ते ईव्हीएम विरोधात आहेतच.लोकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.    सर्व विरोधी पक्षांनी ईव्हीएम विरोधात थेट भुमिका घेतली तरच भाजपला सत्तेवरून दूर करता येईल.२०२४ चं घोडा मैदान जवळच आहे.निवडणुकीच्या आधी ईव्हीएम विरोधी लढाई लढावी लागणार आहे.ईव्हीएम हटवलं तरच भाजप हटेल. मात्र ऐनवेळी विरोधी पक्षांनी पुन्हा मागे हटू नये असा टोला ईव्हीएम विरोधी राष्ट्रीय जन आंदोलनचे निमंत्रक रवि भिलाणे यांनी लगावला आहे.

हे पण वाचा....


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com