Top Post Ad

छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येत ज्या हिंदुचा सहभाग होता....

 

छत्रपती संभाजी महाराज यांच्या हत्येच्या कटात हिंदू भटजींचाही समावेश होता त्यांचा निषेध केला पाहीजे असे प्रतिपादन प्रकाश आंबेडकर यांनी केले. औरंगजेबाच्या समाधीवर फुले चढवल्यानंतर राज्यभरात चर्चेत आलेले वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी हे खळबळजनक वक्तव्य केले.  
देशात सध्या जुन्या राजांचं उदाहरण देऊन समाजात दुफळी निर्माण केली जात आहे. पण तशी वस्तुस्थिती नाही. संभाजी महाराजांच्या हत्येच्या कटात मुघल बादशहाबरोबर भारतातील हिंदू भटजीही होते. यावर इतिहासकारांनी सविस्तर लिहायला हवं. जेणेकरून देशात पुन्हा कुणी जयचंद कुणी येणार नाही, देशाचं स्वातंत्र्य जाणार नाही. 

 संभाजी महाराज संगमेश्वर येथे गुप्त मोहिमेवर होते. या मोहिमेची माहिती औरंगाजेबपर्यंत कशी पोहोचली? हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. या देशात ज्या राजांचे स्वातंत्र राज्ये होती, ती जयचंदांमुळे अस्ताला गेली. औरंगजेबाने संभाजी महाराजांना ज्याप्रकारे देहदंड दिला, तो निंदनीय आहे. त्याची आम्ही निंदा करतो.     भारतात जेव्हा मुस्लीम राजे आले. त्यांनी कत्तली निश्चितपणे केल्या. पण संभाजी महाराजांची हत्या ज्याप्रकारे करण्यात आली, ती पद्धत सुफी किंवा मुस्लीम धर्माला मान्य नाही.

    गणोजीराव शिर्के आणि त्यांचे वडील पिलाजीराव शिर्के यांचा शिवाजी महाराजांबरोबर एक करारनामा झाला होता. पिलाजीराव शिर्के हे योद्धे होते. महाराजांनी त्यांना कोकणात हरवलं होतं. त्यांच्या नियमाप्रमाणे महाराजांनी त्यांची सर्व जमीन आणि मालमत्ता काढून घेतली. त्यानंतर ते सैनिकांमध्ये सामील झाल्यानंतर त्यांना पगार देण्यात आला. तसेच तुमच्या मुलाला (गणोजी शिर्के) मुलगा झाला तर तुमची जमीन परत दिली जाईल, असा शब्द शिवाजी महाराजांनी पिलाजीराव शिर्केना दिला होता. पण दरम्यानच्या काळात शिवाजी महाराजांचं निधन झालं आणि संभाजी महाराज सत्तेवर आले. संभाजीमहाराज हा करारनामा पाळतील, असा विश्वास गणोजी शिर्के यांना वाटला नाही. इतिहासकार म्हणातात, " संभाजी महाराज ५०० सैनिकांबरोबर संगमेश्वर येथे आहेत. ही बातमी रंगनाथ स्वामी यांनी औरंगजेबापर्यंत पोहोचवली. त्यानंतर औरंगजेबाने आपल्या फौजा पाठवून संभाजी महाराजांना कैद केलं."

    नाशिकमध्ये जेमिनी कडू नावाचे लेखक आणि प्राध्यापक आहेत. ते कुणबी समाजातील असून बहुजनवादी इतिहासकार आहेत. त्यांचं औरंगजेबा संदर्भात एक पुस्तक आहे. त्यामध्ये त्यांनी उल्लेख केला आहे की, औरंगजेबाच्या सल्लागार समिती मध्ये हिंदू कायद्याच्या संदर्भात सल्ला देणारे आबा भटजी होते. त्यांनीच संभाजी महाराजांना शिक्षा कशी द्यावी हे सुचवलं होतं, असा इतिहासात उल्लेख आहे. मनुस्मृतीप्रमाणे संभाजी महाराजाना शिक्षा देण्यात यावी, असा सल्ला भटजींनी दिला होता व संभाजीराजांना शिक्षा देताना भटजींचा सल्ला अमलात आणला.  

    भारताच्या इतिहासात जे-जे लोक स्वतंत्र राज्य निर्माण करायला निघाले होते. अशा राजांच्या राज्यात जयचंद निर्माण झाले. या जयचंदानी स्वतंत्र राज्यं संपवली. त्यामुळे आपण औरंगाजेबाचा जेवढा निषेध करतो, तेवढा निषेध या जयचंदांचाही करायला हवा. संभाजीराजे संगमेश्वरला का गेले? यावर मोठा वाद आहे. ते तिथे गेले ही माहिती औरंगजेबपर्यंत कशी पोचली? जयचंदमुळे गेले, असे इतिहासात आहे. संभाजीमहाराजांना पकडण्यात गणोजी शिर्के यांचा हात होता, हे सरळ दिसतंय. संभाजी महाराजांना मनुस्मृतीप्रमाणे शिक्षा झाली पाहिजे, हा सल्ला आबा भटजी यांनी दिला. या दोघांचा निषेध न करता थेट औरंगजेबाचा निषेध करतो, हा वस्तुस्थितीचा विपर्यास आहे. भारताच्या इतिहासात असे जयचंद अनेकदा निर्माण झाले. येथून पुढे असे जयचंद निर्माण होणार नाहीत, याची दक्षता आपण घ्यायला हवी. या जयचंदाचाही निषेध केला पाहिजे. 

औरंगजेबाच्या कबरीवर फुलं वाहण्यामागील कारण सांगताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, देशात चुकीचं नरेटिव्ह चालवलं जात आहे, औरंगजेबावरून हिंदू-मुस्लिमांमध्ये दंगली घडवण्याचा जो बेत होता, तो मला बाहेर काढायचा होता, तो थांबवायचा होता, दंगली थांबवायच्या होत्या. मी असं म्हणतो की, माझ्या त्या सगळ्या प्रयत्नांना यश आलं आणि औरंगजेबाच्या निमित्ताने जी दंगल होणार होती ती थांबली.

 संभाजी महाराजांना जनमानसात जिवंत ठेवण्याचे महान कार्य करणारे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com