Top Post Ad

संभाजी महाराजांना जनमानसात जिवंत ठेवण्याचे महान कार्य


 छत्रपती संभाजी महाराज यांचे शेवटचे संस्कार करणारे  गोविंद महार हीच व्यक्ती आहे. इतिहासकारांच्या म्हणण्यानुसार औरंगजेबाने संभाजी महाराजांना तुरूंगात टाकले व त्याला ठार मारले. यानंतर त्यांच्या शरीराचे तुकडे करण्यात आले. मात्र  त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यास  नकार देण्यात आल्यानंतर  गोविंद महार  पुढे आला आणि संभाजी राजे यांचे अंतिम संस्कार केले. त्यांनी छत्रपती संभाजी राजेंसाठी स्वत: च्या हातांनी समाधी बनविली. आजही ही समाधी महारवाड्यात आहे. गोविंद महार यांच्या निधनानंतर त्यांची समाधी देखील संभाजीराजे यांच्या समाधीजवळ बांधली गेली.  मात्र गोविंद महार यांचे नाव संभाजी राजे यांच्याशी जोडण्याचा राग काही गावगुंड प्रवृत्तीच्या लोकांमध्ये अद्याप आहे. मागील अनेक वर्षापासून हा वाद कायम स्वरूपी चिघळत ठेवला. ज्याप्रमाणे दादोजी कोंडदेव हे शिवरायांचे गुरु नसताना त्यांना गुरुस्थानी बसवले त्याचप्रमाणे जाणीवपूर्वक गोविंद महार यांचे मोठेपण नाकारण्याकरिता हा सारा खटाटोप काही नतभ्रष्ट मंडळी करीत आहेत. 

वढू बुदूरक येथे स्थित गोविंद महारच्या पुतळ्याची हानी केल्याप्रकरणी ४९ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र त्याबाबत अद्यापही कोणती कारवाई करण्यात आलेली नाही.  भीमा कोरेगावच्या दंगलीनंतर हळू हळू येथील गावगुंडांनी गोविंद महाराचा इतिहास पुसण्यास गमिनीकाव्याने सुरुवात केली आहे.   छत्रपती संभाजी महाराज यांचा अंतिम संस्कार गोविंद महार यांनी केलेला असल्याचे जगजाहिर असतानाही काही जातीवादी गावगुंडांनी  संभाजी महाराजांच्या समाधीजवळ शिवले पाटील नावाचा एक बोर्ड लावला आहे की संभाजी महाराजांचा अंतिम संस्कार यांने केलाय. अशा तऱ्हेने खरा  इतिहास ही जातीवादी गावगुंड पुसण्याचा प्रयत्न करीत आहेत. समाधीच्या रुपाने छत्रपती संभाजी महाराजांना जनमानसात जिवंत ठेवण्याचे महान कार्य करणाऱ्या गोविंद  महारांचा इतिहास संपविण्यासाठीच  प्रयत्न होत असल्याने याबाबत खरे तर शासनाने लक्ष घालून खऱ्या इतिहासाचे जतन करणे गरजेचे आहे.  मात्र प्रशासनाची भूमिकाही याबाबत संदेहास्पद आहे. शेवटी शासन काय किंवा प्रशासन काय एकाच मानसिकतेचे गुलाम. 

कोरेगाव-भीमा प्रकरणी चौकशी आयोगासमोर आजपर्यंत अनेक साक्षीदारांची उलट तपासणी झाली. ज्यामध्ये संभाजी शिवले याची ऍड.राहुल मखरे यांनी घेतलेली उलट तपासणी संभाजी महाराजांच्या समाधीबाबत खूप काही सांगून जाते.  वढू बु. येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळावर मिलींद एकबोटे यांच्या धर्मवीर संभाजी महाराज स्मारक समितीचा बेेकादेशीर कब्जा आहे अशी कबुली शिवले यांनी दिली. 

तुम्ही मिलींद एकबोटेच्या समितीचे सदस्य आहात? आणि ते कोणत्या साली झाला आहात ? 
या प्रश्‍नावर शिवले म्हणाले, मार्च २०१७ पासून मी या समितीचा सदस्य आहे. 
किसन भंडारे अध्यक्ष व मिलींद एकबोटे सदस्य असलेल्या या समितीत जाण्यासाठी तुम्ही स्वत:हून अर्ज केला होता का ? की समितीने तुम्हांला सदस्य होण्यासाठी स्वत: निमंत्रण दिले? 
यावर ते म्हणाले, किसन भंडारे यांनी मला सदस्य होण्यासाठी निमंत्रण दिले. 
छत्रपती संभाजी महाराजांचा अंत्यविधी भंडारे यांनी केला असे भंडारे कुटुंबियांचे म्हणणे आहे ते खरे आहे का ? 
या प्रश्‍नाला उत्तर देताना शिवले यांनी सांगितले की, ‘हे मला माहित नाही’ असे मोघम उत्तर दिले. 
छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधी स्थळाची देखभाल करण्याचा अधिकार नसताना समिती देखभाल कशी काय करते ? 
या प्रश्‍नावर शिवले यांनी समितीला देखभाल करण्याचा अधिकार आहे असे सांगितले.

 १७ ऑक्टोबर १९७५ ला हे राज्य संरक्षित स्मारक घोषित करण्यात आले आहे, त्याचे अधिकार पुरातत्व खात्याकडे आहेत ,  माहिती अधिकार अंतर्गत २२ डिसेंबर २०२० रोजी सहाय्यक संचालक, पुरातत्व विभाग, पुणे यांनी लिहून दिले आहे हे बरोबर आहे का ? 
या प्रश्‍नावर शिवले म्हणाले, बरोबर आहे.  
वढू बु. येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळावर धर्मवीर संभाजी महाराज स्मारक समितीचा कब्जा आहे, या समितीला कुठलाही अधिकार नाही, हे सारे बेकायदेशीर आहे असे म्हटले तर बरोबर आहे का ? 
या प्रश्‍नावर ‘हो’ बरोेबर आहे असे शिवले यांनी उत्तर देत एकप्रकारे समितीचा बेकायदेशीर कब्जा असल्याची कबुली दिली. 
२८ डिसेंबर २०१७ ला वढू बु.येथे लावण्यात आलेल्या बोर्डमुळे दंगल पेटली असे जे तुम्ही तुमच्या संशोधनातून निष्कर्ष काढला आहे व तो प्रतिज्ञापत्रात नमूद केला आहे त्या निष्कर्षाप्रत तुम्ही ठाम आहात का ? 
यावर शिवले यांनी ‘हो’ त्या बोर्डमुळेच दंगल पेटली असल्याची कबुली दिली. 

ऍड.चन्ने यांनी अलेक्झांडर रॉबर्टसन लिखीत THE MAHAR FOLK या पुस्तकांचा संदर्भ देत सारे पुरावे दिले. १०५१ ची सनद आहे. त्यामध्ये या महार वतनाच्या जमीनी असल्याचे नमूद करण्यात आले आहे. बिदरच्या सुलतानापासून हक्क व अधिकार देण्यात आले आहेत. त्यामध्ये एकूण ५२ अधिकार देण्यात आले होते. या पुस्तकाचा आधार घेत वढू बु. येथील सर्व्हे नंबर २१६ ते २४६ हे परंपरागत महार वतनाचे असल्याचे ऍड. चन्ने यांनी आयोगाच्या निदर्शनास आणून दिले. त्या जमीनीचे वतनदार हे प्रथमदर्शनी महारच असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

शिवले यांनी सर्व्हे नंबर २४४ वर छत्रपती संभाजी महाराजांची समाधी असल्याचे ठासून सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु सर्व्हे नंबर २१६ ते २४६ या जमीनी महार वतनाच्या असल्याचे रेकॉर्ड निदर्शनास आणून देताच शिवले यांची बोबडीच वळली. 

शिवले यांनी दाखवलेल्या सर्व्हे नंबर २४४ वर आता गायरान म्हणून नोंद करण्यात आली आहे.  त्याचबरोबर धर्मवीर संभाजी महाराज स्मारक समिती पुणे हे नंतर लावण्यात आल्याचे ऍड.चन्ने यांनी निदर्शनास आणून दिले. त्यामुळे छत्रपती संभाजी महाराज समाधी स्थळाची जागा ही गोविंद गोपाळ महार वतनाचीच असल्याचे पुरावे सादर करण्यात आल्याने शिवले यांची बोलतीच बंद झाली.  

सुरूवातीला शिवले यांनी उडवाउडवीची उत्तरे देण्याचा प्रयत्न केला, मात्र ऍड. मखरे व ऍड. चन्ने यांनी केलेल्या प्रश्‍नांच्या सरबत्तीसमोर शिवले यांचा टिकाव लागला नाही. अखेर छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळावर धर्मवीर संभाजी महाराज स्मारक समितीने बेकायदेशीर कब्जा केल्याचे त्यांना कबूल करावे लागले. 

ऍड. मखरे यांनी सांगितले की, महाराष्ट्र सरकारने तात्काळ छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळावरील बेकायदेशीर कब्जा हटवून हे स्थळ सरंक्षित करावे, पुरातत्व खात्याच्या समिती बरोबर संगनमत केलेल्या बेजबाबदार अधिकार्‍यांच्यावर कारवाई होणे गरजेचे आहे. 

----------------------------------------------------

 छत्रपती संभाजी महाराज यांचा अंतिम संस्कार हे गणपत महारांनी केलेला आहे पण काही जातीवादी गावगुंडांनी  संभाजी महाराजांच्या समाधीजवळ एक शिवले पाटील याच्या नावाचा एक बोर्ड लावला आहे की संभाजी महाराजांचा अंतिम संस्कार त्या शिवले पाटलांनी केलाय. यामुळे आंबेडकरी समाजात तीव्र संताप व्यक्त होत आहे. खरा  इतिहास काही जातीवादी गावगुंड पुसत आहेत. एवढा महान काम करून गणपत महारांचा इतिहास संपविण्याचा प्रयत्न होत असल्याने या विरोधात परिसरातील नागरिकांनी आंदोलनाची हाक दिली आहे. 

छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुत्र संभाजी राजे यांचे शेवटचे संस्कार करणारे  गणपत महार हेच व्यक्ती आहेत. इतिहासकारांच्या म्हणण्यानुसार औरंगजेबाने संभाजीला तुरूंगात टाकले व त्याला ठार मारले. यानंतर त्यांच्या शरीराचे तुकडे करण्यात आले. मात्र औरंगजेबाच्या भीतीने त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यास नकार देण्यात आल्यानंतर  गणपत महार  पुढे आला आणि संभाजी राजे यांचे अंतिम संस्कार केले. त्यांनी छत्रपती संभाजी राजेंसाठी स्वत: च्या हातांनी समाधी बनविली. आजही ही समाधी महारवाड्यात आहे. गणपतच्या निधनानंतर त्यांची समाधी देखील संभाजीराजे यांच्या समाधीजवळ बांधली गेली. 

मात्र गणपत महार यांचे नाव संभाजी राजे यांच्याशी जोडण्याचा राग काही गावगुंड प्रवृत्तीच्या लोकांमध्ये अद्याप आहे. मागील अनेक वर्षापासून हा वाद कायम स्वरूपी चिघळत ठेवला. ज्याप्रमाणे दादोजी कोंडदेव हे शिवरायांचे गुरु नसताना त्यांना गुरुस्थानी बसवले त्याचप्रमाणे जाणीवपूर्वक गणपत महार यांचे मोठेपण नाकारण्याकरिता हा सारा खटाटोप काही नतभ्रष्ट मंडळी करीत आहेत. वढू बुदूरक येथे स्थित गणपत महारच्या पुतळ्याची हानी केल्याप्रकरणी ४९ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र त्याबाबत अद्यापही कोणती कारवाई करण्यात आलेली नाही.  भीमा कोरेगावच्या दंगलीनंतर हळू हळू येथील गावगुंडांनी गणपत महाराचा इतिहास पुसण्यास गमिनीकाव्याने सुरुवात केली आहे. त्याचा प्रत्यय आता दिसून येत आहे. याबाबत तात्काळ शासनाने लक्ष घालून खऱ्या इतिहासाचे जतन करावे असे आवाहन आंबेडकरी जनतेकडून करण्यात आले आहे. 

खरा इतिहास जाणून घ्या
https://mr.wikipedia.org/wiki/चर्चा:गोविंद_गोपाळ_गायकवाड

गोविंद महार यांची समाधीस्थळ

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com