Top Post Ad

धम्म आणि कम्म

धर्म अन् कर्म, किंवा धम्म अन् कम्म हे एकाच नाण्याच्या दोन बाजु आहेत. जसे धर्म या मराठी शब्दाला पाली भाषेत धम्म असे म्हणतात. त्याचप्रमाणे कर्म या मराठी शब्दाला पाली भाषेत्त कम्म असे म्हणतात. प्रत्येक धर्मात कर्म आहे, कर्माशिवाय धर्म होऊ शकत नाही. परंतु प्रत्येक धर्मांची कर्मे ही वेगवेगळी आहेत. तथागत गौतम बुद्ध यांनी सत्य, वास्तवता, विज्ञान, निसर्गनियमन आणि स्वयंम ज्ञानाच्या कसोटीस उतरलेल्या धर्माचे म्हणजेच धम्माचे समर्थन केले आहे. तसेच मानवी मनाचे सामर्थ्य ओळखुन मानवालाच केंद्र बिंदु केले आहे.

त्यानुसार त्यांनी कम्मसिद्धांत मांडला म्हणजेच मराठी भाषेत त्यालाच कर्म सिद्धांत असे म्हणतात. नेमके याच मराठी बोली भाषेचा फायदा घेऊन या सनातनी धर्ममार्तडांनी तथागतांच्या मुळ पालि भाषेतले काही कम्म सिद्धांत जसेच्या तसे ठेवुन आपल्या नावावर खपवले. उदा. तूच तुझ्या जिवनाचा शिल्पकार, मुळ पाली भाषेत या मराठी वाक्याला ‘‘अत्तही अत्तनो नाथो’’ असे संबोधतात. त्याला आपल्या अंगच्या असलेल्या अज्ञानाचा किंवा धम्माचा अभ्यास नसल्याने अथवा पाली भाषेचे ज्ञान नसल्याने त्यांनी गैरवापर करून अंधश्रद्धेला खतपाणी घातले व त्यांचे काही सिद्धांत बोलीभाषेचा फायदा घेऊन या कर्मसिद्धांतामध्ये घुसडविले. त्यामुळे हा तथागतांचा मुळ शुद्ध स्वरूपातला कर्मसिद्धांत समजत नाही किंवा आपण तो जाणुन घेण्याचा प्रयत्न करीत नाही.

त्यामुळेच त्यांनी बसविलेले आपल्या मानेवरचे हे जोखंड अजुन पर्यंत आपण उतरविले नाही. त्यामुळे आपण अजुनही आपल्या घरात देवदेवतांचे फोटो ठेवुन त्यांची पुजाअर्चा करतो.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दिधलेल्या बाविस प्रतिज्ञांचे पालन करीत नाही.त्याला कारणीभुत ते नव्हे आपणच आहोत परंतु सत्य हे सत्यच असते एकतरी दिवस ते आपला सत्याचा प्रकाश पाडणारच ! तेव्हा मुळ उद्येशापासुन फारकत घेऊन चालणार नाही.आपण भाग्यवान आहोत आपल्याला वास्तव्यात नसलेल्या कोणी देवदुताने,देवाच्या प्रेषिताने अथवा प्रत्यक्षःत कोणीही कधिही न पाहिलेल्या देवानेच हा धर्म दिलेला नसुन तुमच्या आमच्या सारख्याच दोन हाथ,दोन पाय अन् एक डोके असलेल्या,आपला जन्म ज्या नैसर्गिक पद्धतिने होतो

अगदी त्याच पद्धतीने राजा शुद्धोधन अन् माता महामाया यांच्या पोटी जन्म घेतलेल्या मानवानेच अविरत कष्ट सोसुन ज्ञानाच्या अविष्काराने सम्यक सम्बुद्ध होऊन हा धम्म दिला आहे. कर्म किंवा कम्म हा प्रत्येक धर्माचा आणि आपल्याही धम्माचे प्रमुख अंग आहे. धर्म अन् कर्म किंवा धम्म अन् कम्म हे एकाच नाण्याच्या दोन बाजु आहेत.कम्माशिवाय धर्म किंवा धम्माला महत्त्वच राहत नाही.म्हणुनच प्रत्येक बौद्ध बांधवांनी कम्मसिद्धांत समजावुन त्यानुसार आचरण करणे अगत्याचे आहे. किंबहुना आपल्या दैनंदिन जिवनमानातल्या आपल्या कार्यातुन चढउतारानेच आपण आपली प्रगती आपल्या हाताने,आपल्या कार्याने करू त्यासाठी हा कम्मसिद्धांत (कर्मसिद्धांत) समजणे महत्त्वाचे आहे.


 जेतवन येथे श्रामणेर शिबीर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com