दरवर्षीप्रमाणे यंदाही ठाणे महानगरपालिकेच्यावतीने शहरात दीड दिवस, पाच दिवस, सात दिवस आणि दहा दिवसाच्या सार्वजनिक विसर्जनासाठी पर्यायी विसर्जन व्यवस्था तयार करण्यात आली होती. या व्यवस्थेतंर्गत रायलादेवी येथे दोन, आंबेघोसाळे, उपवन पालायदेवी, निळकंठ वुड़्स टिकुजीनी वाड़ी-बाळकुम रेवाळे, खारेगाव आदी ठिकाणी एकूण १३ कृत्रीम तलावांची व्यवस्था महापालिकेने उपलब्ध करण्यात आली होती. तर पारसिक रेतीबंदर विसर्जन महाघाट अणि कोलशेत महाघाट याबरोबरच मिठबंदर, कळवा, गायमुख येथे विसर्जन महाघाट निर्माण करण्यात आली होते. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या मासुंदा तलाव येथील दत्तघाट येथेही पर्यायी विसर्जन व्यवस्था करण्यात आली होती. त्याशिवाय मासुंदा तलावाच्या अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्यालगत असलेल्या घाटावर ही मुर्ती स्वीकारण्याची व्यवस्था करण्यात आली होती
यावर्षी दहाव्या दिवशी ४१४७ घरगुती मुर्ती, २१४ सार्वजनिक मुर्ती, १७० स्विकृत मुर्ती तसेच ५ गौरींचे असे एकूण ४५३६ मुर्त्यांचे विसर्जन करण्यात आले. शहरातील मासुंदा व आहिल्यादेवी होळकर येथील कृत्रीम तलावामध्ये यावर्षी ४६० घरगुती व ०६ सार्वजनिक मुर्तींचे विसर्जन करण्यात आले. खारेगाव कृत्रीम तलावात १८७ घरगुती मुर्तीं, आंबेघोसाळे येथील कृत्रीम तलावामध्ये १०६ मुर्तीं, रेवाळे कृत्रिम तलाव येथे १३५ घरगुती मुर्ती ०६ सार्वजनिक मुर्तीं, मुल्लाबाग येथे २३३ घरगुती मुर्ती, खिड़काळी तलाव येथे ७४ घरगुती मुर्ती, ०३ सार्वजनिक मुर्ती व ०५ गौरींचे, शंकर मंदीर तलाव येथे ९२ घरगुती मुर्ती व १६ सार्वजनिक मुर्ती, उपवन तलाव येथे ५७१ घरगुती मुर्ती व ३६ सार्वजनिक मुर्तींचे विसर्जन करण्यात आले. पारसिक तलाव येथे बांधण्यात आलेल्या विसर्जन महाघाट येथे ४०३ घरगुती मुर्ती, ६२ सार्वजनिक मुर्ती व १७० स्वीकृत मुर्तींचे विसर्जन करण्यात आले. गायमुख घाट १ येथे १७५ घरगुती मूर्ती, तसेच गायमुख घाट २ येथे ५८ घरगुती मुर्तींचे विसर्जन करण्यात आले. मिठबंदर घाट येथे १३९ घरगुती मुर्ती व १७ सार्वजनिक मुर्तींचे विसर्जन करण्यात आले. तर रायलादेवी घाट १ येथे ४३५ घरगुती मुर्ती, रायलादेवी घाट २ येथे २४१ घरगुती मुर्ती, कोलशेत घाट १ व २ येथे ३७८ घरगुती मुर्ती, २२ सार्वजनिक मुर्ती, आत्माराम घाट येथे २४ घरगुती मूर्ती व ०४ सार्वजनिक मुर्ती, बालाजी घाट येथे ४८ घरगुती मूर्ती व ०६ सार्वजनिक मुर्ती तसेच दिवा विसर्जन घाट येथे ३८८ घरगुती मुर्ती व ३६ सार्वजनिक मुर्तींचे विसर्जन करण्यात आले.
सातव्या दिवशी १४,२६ घरगुती मुर्ती, ६७ सार्वजनिक मुर्ती तसेच २५ स्विकृत असे एकूण १५१८ मुर्त्यांचे विसर्जन करण्यात आले. शहरातील मासुंदा व आहिल्यादेवी होळकर येथील कृत्रीम तलावामध्ये यावर्षी ५८ घरगुती मुर्तींचे विसर्जन करण्यात आले. खारेगाव कृत्रीम तलावात ४९ घरगुती मुर्तीं, आंबेघोसाळे यथील कृत्रीम तलावामध्ये ११ मुर्तीं, रेवाळे कृत्रिम तलाव येथे ६१ घरगुती मुर्ती, मुल्लाबाग येथे ५१ घरगुती मुर्ती, खिड़काळी तलाव येथे १२ घरगुती मुर्ती व ०९ सार्वजनिक मुर्ती, शंकर मंदीर तलाव येथे २२ घरगुती मुर्ती व ०४ सार्वजनिक मुर्ती, उपवन तलाव येथे २०८ घरगुती मुर्ती व १५ सार्वजनिक मुर्तींचे विसर्जन करण्यात आले. पारसिक तलाव येथे बांधण्यात आलेल्या विसर्जन महाघाट येथे ५९ घरगुती मुर्ती, १० सार्वजनिक मुर्ती व २५ स्वीकृत मुर्तींचे विसर्जन करण्यात आले. गायमुख घाट १ येथे ४४ घरगुती मूर्ती, २ सार्वजनिक मुर्ती तसेच गायमुख घाट २ येथे ०४ घरगुती मुर्तींचे विसर्जन करण्यात आले. मिठबंदर घाट येथे ३१ घरगुती मुर्ती व ०९ सार्वजनिक मुर्तींचे विसर्जन करण्यात आले. तर रायलादेवी घाट १ येथे २६६ घरगुती मुर्ती, रायलादेवी घाट २ येथे १४४ घरगुती मुर्ती, कोलशेत घाट १ व २ येथे ११८ घरगुती मुर्ती, १३ सार्वजनिक मुर्ती, आत्माराम बालाजी घाट येथे ०३ घरगुती मूर्ती तसेच दिवा विसर्जन घाट येथे २६४ घरगुती मुर्ती व ०५ सार्वजनिक मुर्तींचे विसर्जन करण्यात आले.
पाचव्या दिवशी १४,१२३ घरगुती मुर्ती, ९६४ गौरी, ८७ सार्वजनिक मुर्ती तसेच ६०० स्विकृत मुर्त्यांचे विसर्जन करण्यात आले. शहरातील मासुंदा व आहिल्यादेवी होळकर येथील कृत्रीम तलावामध्ये यावर्षी १९३६ घरगुती मुर्तींचे व २६५ गौरींचे विसर्जन करण्यात आले. खारेगाव कृत्रीम तलावात ७१३ घरगुती मुर्तींचे, १७ गौरींचे व २ सार्वजनिक मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. आंबेघोसाळे यथील कृत्रीम तलावामध्ये ४९० मुर्तींचे व ५३ गौरी, रेवाळे कृत्रिम तलाव येथे ५८० घरगुती मुर्ती, ३ सार्वजिनक मुर्ती व ३७ गौरी, मुल्लाबाग येथे ६५५ घरगुती मुर्ती, ३ सार्वजनिक मुर्ती व ३२ गौरी, खिड़काळी तलाव येथे ११३ घरगुती मुर्ती व ३ गौरी, शंकर मंदीर तलाव येथे २१६ घरगुती मुर्ती, ७ सार्वजिनक मुर्ती व १७ गौरी, उपवन तलाव येथे १८०१ घरगुती मुर्ती, ७ सार्वजिनक मुर्ती व १७ गौरींचे विसर्जन करण्यात आले. पारसिक तलाव येथे बांधण्यात आलेल्या विसर्जन महाघाट येथे ७११ घरगुती मुर्ती, ३० सार्वजनिक मुर्ती , ६६ गौरीं व ६०० स्वीकृत मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. गायमुख घाट १ येथे ३४२ घरगुती मूर्ती, २ सार्वजनिक मुर्ती व १४ गौरी तसेच गायमुख घाट २ येथे ८३ घरगुती मूर्ती व ५ गौरींचे विसर्जन करण्यात आले. मिठबंदर घाट येथे ५२४ घरगुती मुर्ती, २ सार्वजिनक मुर्ती व ९२ गौरींचे विसर्जन करण्यात आले. तर रायलादेवी घाट १ येथे १५४० घरगुती मुर्ती व १०४ गौरी, रायलादेवी घाट २ येथे ७६९ घरगुती मुर्ती व ४० गौरी, कोलशेत घाट १ व २ येथे ११२० घरगुती मुर्ती, १३ सार्वजनिक मुर्ती व १०५ गौरी, आत्माराम बालाजी घाट येथे ९६ घरगुती मूर्ती व २ गौरी तसेच दिवा विसर्जन घाट येथे ७८३ घरगुती मुर्ती, १३ सार्वजनिक मुर्ती व २८ गौरींचे विसर्जन करण्यात आले.
शहरातील दीड़ दिवसांच्या तब्बल ८,९७९ मुर्तींचे विसर्जन झाले. मुर्ती स्वीकृत केंद्रामध्ये प्राप्त झालेल्या एकूण २१ मुर्तींचे तसेच १९ सार्वजनिक मुर्तींचे महापालिकेच्यावतीने विधीवत विसर्जन करण्यात आले. मूर्ती विसर्जनासाठी डिजीठाणे प्रणाली मार्फत तयार करण्यात आलेल्या ऑनलाईन टाइमस्लॉट बुकिंग सुविधेंतर्गत २९५२ नागरिकांनी बुकिंग करून प्रत्यक्षस्थळी विसर्जन केले. खारेगाव तलाव येथे ५५२ घरगुती मुर्ती, मासुंदा तलाव तसेच अहिल्यादेवी तलाव येथे मिळून १०२५ घरगुती मुर्ती, आंबेघोसाळे तलाव येथे ४०० घरगुती मुर्ती, रेवाळे तलाव येथे ६१२ घरगुती मुर्ती व ५ सार्वजनिक मुर्ती, मुल्लाबाग येथे ४६६ घरगुती मुर्ती, खिड़काळी तलाव येथे ८६ घरगुती मुर्ती, शंकर मंदिर तलाव येथे ६२ घरगुती मुर्ती, उपवन तलाव येथे १३३८ घरगुती मुर्ती, तसेच मुर्तीचे स्वीकृती केंद्रावरील मूर्तींचे महापालिकेच्या पर्यावरणपूरक व्यवस्थेअंतर्गत विधीवत विसर्जन करण्यात आले. तर मीठबंदर घाट येथे ४६१ घरगुती मूर्ती, रायलादेवी तलाव घाट-१ येथे ३४०घरगुती तर ६ सार्वजनिक मूर्तींंचे, रायलादेवी तलाव घाट-२ येथे ९१७ घरगुती मूर्ती, कोलशेत घाट-१ व २ येथे ६७९ घरगुती मुर्ती व ४ सार्वजनिक मुर्ती, दिवा विसर्जन घाट येथे ५१४ घरगुती मुर्ती, पारसिक घाट येथे ४०५ घरगुती मुर्ती, ५ सार्वजनिक मुर्ती, गायमुख घाट १ व २ मिळून ४३५ मुर्तीचे विसर्जन करण्यात आले.
अशा तऱ्हेने ठाणे महापालिकेच्या वतीने कोरोना महामारीच्या तिसऱ्या लाटेची शक्यता असतानाही गणपती उत्सव नागरिकांचे हित लक्षात घेऊन सर्व सुखसोयी देऊन संपन्न झाला. निर्विघ्नम कुरुमेदेवं....
--- सुबोध शाक्यरत्न (ठाणे)
हे पण वाचा------------- गणपति मौर्या
https://www.prajasattakjanata.page/2021/09/blog-post_14.html
0 टिप्पण्या