मुंबई ते नागपूर दरम्यान समृद्धी मार्गाची निर्मिती करण्यात येत आहे. या महामार्गाची लांबी 700 किलोमीटर आहे. त्यासाठी 55 हजार कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. या महामार्गाचा महत्त्वाचा टप्पा आहे इगतपुरीतील दुहेरी बोगदा . नांदगाव सदो ते शहापूर तालुक्यातील वाशाळापर्यंत या महाकाय दुहेरी बोगद्यांची लांबी तब्बल आठ किलोमीटर आहे, तर रूंदी 17.5 मीटर आहे. या बोगद्यांचा मुंबईला जाण्यासाठी व येण्यासाठी वापर होणार आहे. कसारा घाट भेदून हे बोगदे एफकॉन इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने तयार केले आहेत. नांदगाव सदो ते शहापूर तालुक्यातील वाशाळापर्यंत तयार करण्यात आलेला हा आठ किलोमीटर लांबीचा बोगदा फक्त 2 वर्षांत पूर्ण झाला आहे. अभियांत्रिकीच्या इतिहासातील भारतातील हा पहिला असा बोगदा आहे की, ज्याचे काम विक्रमी वेळेत पूर्ण झाले आहे दोन वर्षांत दुहेरी बोगद्याचे काम पूर्ण झाल्याने एफकॉन इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या अभियंत्यांनी आनंद व्यक्त केला.

दोन हजार ७४५ कोटी खर्च करून हा बोगदा खोदण्यासाठी ऑस्ट्रेलियन तंत्राचा वापर करण्यात आला होता. कसारा घाट पार करण्यासाठी वाहतूक कोंडी नसेल तर २० ते २५ मिनिटे लागतात. मात्र या बोगद्यातून कसारा घाट पार करण्यासाठी केवळ पाच मिनिटे लागणार आहेत. रस्ते विकास महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक व सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव अनिलकुमार गायकवाड आणि उपजिल्हाधिकारी तथा एमएसआरडीसीच्या प्रशासक रेवती गायकर यांनी गुरुवारी (१६ सप्टेंबर) अभियंत्यांसोबत समृद्धी महामार्गांवरील या बोगद्यांची चाचणी व पाहणी केली.
एफकॉन इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे प्रोजेक्ट व्यवस्थापक शेखर दास यांच्या मार्गदर्शनाखाली अभियंता शक्ती उपाध्याय, राजीव सिंह, एम. एन. राव, परीतकर, पारीख व त्यांच्या १५०० कामगार व १५० अभियंते अशा मोठ्या टीमने हे शिवधनुष्य पेलले. अवघ्या दोन वर्षांत हा दुहेरी बोगदा पूर्ण करून विक्रम नोंदवला आहे. अभियांत्रिकीच्या इतिहासात भारतात तरी अशी नोंद नाही, अशी माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव अनिलकुमार गायकवाड यांनी दिली. दरम्यान, शहापूर ते इगतपुरीदरम्यान सुरू असलेल्या नवयुगा कंपनीच्या कामांचीही पाहणी अधिकाऱ्यांनी केली. हे काम समाधानकारकरीत्या पूर्ण झाले असून, ठाणे ते नाशिक जिल्ह्यातील हा टप्पा वर्षभरात पूर्ण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
इगतपुरी जवळ बोगद्यासाठी 2745 कोटींचा खर्च आला. या कामाची सुरुवात 6 सप्टेंबर 2019 रोजी झाली होती. सप्टेंबर 2022 पर्यंत हे काम पूर्ण करायचे होते. त्यापूर्वीच 14 सप्टेंबरला हे काम पूर्ण करण्यात आले. त्यासाठी ऑस्ट्रियन तंत्रज्ञान वापर करण्यात आला. सध्या कसारा घाट पार करण्यासाठी 35 मिनिटे लागतात. आता या बोगद्यांमुळे अवघ्या पाच तासांत कसारा घाट पार करता येणार आहे. कसारा घाटातील खडक फोडणे हे या टीमसमोरचे सर्वात मोठे आव्हानात्मक काम होते. मात्र, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ आणि एफकॉन्स कंपनीच्या शिलेदारांनी ते विक्रमी वेळेत पूर्ण केले. हे काम पूर्ण होताच कामगार आणि अभियंत्यांनी एकच जल्लोश केला. आता या बोगद्यांमध्ये रस्ताबांधणी, व्हेंटीलेशन, विद्युत जोडणी आदी कामांना सुरुवात करण्यात येणार आहे.
अनिलकुमार गायकवाड हे सद्या संपूर्ण महाराष्टाचे बांधकाम सचिव असून पूढील महीन्यात ते सेवानिवृत्त होत असल्याची माहिती मिळत आहे.. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सम्रुध्दी महामार्गाचे काम केले जात आहे. त्यांनी केेलेल्या आजवरच्या कामाबाबत ते नेहमीच प्रशंसेत पात्र ठऱले आहेत. याबाबत गतवर्षी त्यांना १५सप्टेंबरला अभियंता दिनी ऊत्क्रूष्ट अभियंता पुरस्कार मिळाला. इतकेच नव्हे तर या आधीही त्यांना कार्यकारी अभियंता असतांना हा पुरस्कार मिळाला होता. भारतीय अभियांत्रिकी इतिहासात पहिल्यांदाच (Histrical Record ) महत्वाकाक्षी प्रकल्पाचे काम केल्याबद्दल सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव अनिलकुमार गायकवाड यांचे व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे बहुजन संग्राम संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष व वृत्तदर्शन मिडीयाचे संपादक भीमराव चिलगावकर, बहुजन संग्रामचे मुंबई प्रदेश अध्यक्ष पवनकुमार बोरुडे, बहुजन संग्राम महिला अध्यक्षा अनुराधा चौधरी, सचिव अमिता कदम यांनी अभिनंदन केले आहे.
हे पण वाचा......
अनिलकुमार गायकवाड यांच्याविषयी....👇
https://www.prajasattakjanata.page/2020/05/9yrykm.html
0 टिप्पण्या