निवडणुका आणि कुंभ मेळा देशात वाढत असलेल्या कोरोना महामारीला जबाबदार- W.H.O.

   देशात मोठ्या प्रमाणात वाढत असलेल्या कोरोनामागे मागच्या महिन्यात झालेल्या निवडणुका आणि कुंभ मेळा आहे. हे जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) रिपोर्टमधून सिद्ध झाले आहे. कोरोनाबाबत WHO कडून बुधवारी जारी अपडेटमध्ये सांगण्यात आले की, भारतात कोरोना पसरण्यामागे अनेक कारणे आहेत. WHO ने ठराविक एखाद्या धार्मिक किंवा राजकीय आयोजनाचे नाव घेतले नाही. 

  पण, म्हटले की, अनेक धार्मिक आणि राजकीय आयोजनांमध्ये जमा झालेली गर्दी संक्रमण वाढवण्याचा कारणांपैकी एक आहे. त्या आयोजनांमध्ये नियमांचे पालन करण्यात आले नाही. WHOने हेदेखील म्हटले की, संक्रमण वाढण्यामागे या आयोजनांची किती टक्के भूमिका आहे, हे अद्याप सांगू शकत नाही. पण, या कारणांना नाकारता येत नाही.  WHO चे म्हणणे आहे की, भारतात कोरोनाचा B.1.617 व्हेरिएंट पहिल्यांदा ऑक्टोबर 2020 मध्ये समोर आला होता. दरम्यान, भारतात पुन्हा वाढत असलेल्या कोरोना संसर्ग आणि मृत्यूमागे कोरोनाचे B.1.617 आणि B.1.1.7 सारखे नवे व्हेरिएंट असण्याची शक्यता आहे.

जागतिक आरोग्य संगटनेच्या वीकली अपडेटमध्ये म्हटले आहे की, कोरोना व्हेरिएंटची माहिती जाणून घेण्यासाठी भारतातील कोरोना पॉझिटिव्ह सँपलपैकी 0.1% सँपलला ग्लोबल इनिशिएटिव्ह ऑन शेअरिंग ऑल इन्फ्लूएन्जा डेटा (GISAID) वर सीक्वेंस केले होते. यात समजले की, B.1.1.7 आणि B.1.612 सारख्या व्हेरिएंटमुळे कोरोना पसरला. WHO ने सांगितल्यानुसार, एप्रिलच्या अखेरपर्यंत भारतात कोरोनाच्या 21% रुग्णांमध्ये B.1.617.1 आणि 7% रुग्णांमध्ये B.1.617.2 व्हेरिएंट आढळला. इतर व्हेरिएंटच्या तुलनेत या दोन व्हेरिएंटचा संसर्ग जास्त आहे. 

 देशात  कोरोनाचं संकट असतानाच काही दिवसांपूर्वी कुंभमेळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. कुंभमेळ्यामुळे कोरोना संसर्ग झाल्याच्या अनेक घटना या समोर आल्या आहेत. अशीच एक धक्कादायक घटना आता समोर आलीं आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात कुंभमेळ्याला भेट दिलेल्या एका कोरोनाग्रस्त महिलेमुळे बंगळुरुमध्ये आणखी 33 जणांना कोरोनाची लागण झाल्याची घटना समोर आली आहे. 

टाईम्स ऑफ इंडियाने या संदर्भात दिलेल्या वृत्तानुसार, ६७ वर्षीय महिलेने उत्तराखंड येथे पार पडलेल्या कुंभमेळ्यामध्ये सहभाग घेतला होता. त्यानंत तिने अनेकांना संक्रमित केलं आहे. पश्चिम बंगळुरुमधील स्पंदना हेल्थकेअर आणि रिहॅबिलिटेशन सेंटरमधील 13 जणांचाही यामध्ये समावेश आहे. उपचारानंतर सर्व जण बरे झाल्याची माहिती स्थानिक अधिकाऱ्यांनी दिली आहे. कुंभमेळ्यावरुन परतल्यानंतर महिलेने कोविड चाचणी केली होती. ती पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर तिच्या पतीची आणि सुनेची चाचणी देखील पॉझिटिव्ह आली होती. स्पंदना हेल्थकेअरमध्ये मानसोपचार तज्ज्ञ असणाऱ्या वृद्ध महिलेच्या सूनेला देखील कोरोनाची लागण झाली होती. सूनेची चाचणी पौझिटिव्ह आली असली तरी कोणतीही लक्षणे नसल्याचे तिने सांगितले. याची माहिती मिळताच बीबीएमपी येथील अधिकाऱ्यांनी हे प्रकरण आपल्या हातात घेतले आणि कॉन्टॅक्ट टेसींग करण्यास सुरुवात कैली. स्पंदना रुगणालयातील त्या महिलेच्या संपर्कात आलेल्या सर्वांची तपासणी करण्यात आली.

अधिक वाचा 👇👇
https://www.prajasattakjanata.page/2021/05/blog-post_8.html

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA