राज्य शासकीय कर्मचा-यांप्रमाणे एस.टी. कामगारांना वेतन देण्यात यावे, माहे जुलै, २०१८ ते फेब्रु. २०२४ या कालावधीच्या वाढीव महागाई भत्याची थकबाकी देण्यात यावी, घरभाडे भत्ता व वार्षिक वेतनवाढ, सन २०१६-२०२० या कालावधीसाठी जाहिर केलेल्या रू.४८४९ कोटीमधील शिल्लक रक्कम, रु.५०००/-, रु.४०००/- व रु.२५००/- मूळ वेतनात देताना झालेल्या विसंगती दुर कराव्यात, सध्या एस.टी. कमगारांना लागू असलेल्या वैद्यकिय खर्चाची प्रतिपुर्ती योजनेऐवजी कॅशलेस योजना (इनडोर/आऊटडोर) लागू करण्यात यावी. इत्यादी मागण्यांकरिता एस.टी.कामगार संघटनांची संयुक्त कृती समितीच्या वतीने महाराष्ट्र राज्याची विधानसभेची आचार संहिता लागू होण्यापुर्वी सोडवणूक होण्यासाठी दि.९ व १० जुलै, २०२४ रोजी आझाद मैदान, मुंबई येथे धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचीही शासनाने दखल न घेतल्यास दि.९ ऑगस्ट क्रांतीदिनापासून राज्यभर बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा निर्णय सर्व एस.टी.कामगार संघटनांनी घेतला आहे.
कामगारांच्या आर्थिक व महत्वाच्या प्रश्नांची सोडवणूक होत नसल्यामुळे कामगारांमध्ये निर्माण झालेली नाराजी विचारात घेऊन म.रा.मा.प. महामंडळातील महाराष्ट्र एस. टी. कामगार संघटना, महाराष्ट्र एस.टी. कामगार सेना, महाराष्ट्र एस.टी. कामगार कॉग्रेस, कास्ट्राईब रा.प. कर्मचारी संघटना, महाराष्ट्र एस.टी. कर्मचारी काँग्रेस महाराष्ट्र एस. टी. वर्कर्स काँग्रेस (इंटक), महाराष्ट्र मोटार कामगार फेडरेशन, महाराष्ट्र एस.टी. कामगार कॉग्रेस, राज्य परिवहन यांत्रिकी कामगार संघटना, महाराष्ट्र परिवहन मजदूर युनियन, रिपब्लिकन एस. टी. कर्मचारी संघटना, बहुजन राज्य परिवहन कर्मचारी संघटना इत्यादी बहुतांशी संघटनांची संयुक्त कृती समिती स्थापन करून सदरच्या कृती समितीची संयुक्त बैठक दि.१९ जून रोजी होऊन सदर बैठकीमध्ये रा.प. कामगारांचे खालील प्रलंबित आर्थिक व महत्वाच्या प्रश्नांची महाराष्ट्र राज्याची विधानसभेची आचार संहिता लागू होण्यापुर्वी सोडवणूक होण्यासाठी दि.९ व १० जुलै, २०२४ रोजी आझाद मैदान, मुंबई येथे धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
राज्य शासकीय कर्मचा-यांच्या वेतनाच्या तुलनेत एस.टी. कर्मचा-यांचे वेतन फारच कमी आहे. उदा. सन २०१%, मध्ये शासनामध्ये चालकाचे किमान मूळ वेतन रू.१९९००/- इतके असून एस.टी. कर्मचा-यांच किमान मूळ वेतन रु.१२०८०/- इतके आहे. शासकीय कर्मचा-यांना ७ व्या वेतन आयोगानुसार दि.३१.१२.२०१५ चे मूळ वेतन अधिक ४० टक्के रोड पे यांच्या बेरजेवर २.५७ चे गुणक लावून वेतन निश्चिती केलेल आहे. तर एस.टी. कर्मचा-यांचे दि.३१.३.२०१६ चे मूळ वेतनास फक्त २.५७ चे गुणक देऊनच वेतन निश्चित केलेली आहे. त्यामुळे शासकीय कर्मचा-यांच्या तुलनेत एस.टी. कर्मचा-यांचे मूळ वेतन कमी आहे. त्यामुळे शासकीय कर्मचा-यांप्रमाणे एस.टी. कर्मचा-यांना पदनिहाय वेतनश्रेणी लागू करण्यात यावी. त्यासाठी शासनाप्रमाणे १० वर्षाची मुदत मान्य करण्यास एस.टी.तील संघटना तयार आहेत.
कामगार कराराच्या तरतुदीनुसार शासकीय कर्मचा-यांना देय होणारा महागाई भत्याचा दर त्या तारखेपासून रा.प. कामगारांना लागू करण्याचे मान्य केलेले आहे. अशी तरतुद असतानाही शासकीय कर्मचा-यांना देय झालेला महागाई भत्ता रा.प. कामगारांना वेळेवर दिला जात नाही. त्यामुळे महागाई भत्याची माहे जुलै, २०१८ ते सप्टेंबर. २०१८ या कालावधीची ७ टक्क्यावरून ९ टक्के अशी २ टक्क्याची ३ महिन्यांची महागाई भत्याची थकबाकी, माहे जानेवारी, २०१९ ते सप्टेंबर, २०१९ या कालावधीची ९ टक्क्यावरून १२ टक्के अशी ३ टक्क्याची ९ महिन्यांची महागाई भत्याची थकबाकी, माहे जुलै, २०१९ ते जून, २०२१ या कालावधीची १२ टक्क्यावरून १७ टक्के अशी ५ टक्क्याची २४ महिन्यांची महागाई भत्याची थकबाकी, माहे जुलै, २०२१ ते सप्टेंबर, २०२१ या कालावधीची १७ टक्क्यावरून २० टक्के अशी ११ टक्क्याची ३ महिन्यांची महागाई भत्याची थकबाकी, माहे जुलै, २०२१ ते डिसेंबर, २०२१ या कालावधीची २८ टक्क्यावरून ३१ टक्के अशी ३ टक्क्याची ६ महिन्यांची महागाई भत्याची थकबाकी, माहे जानेवारी, २०२२ ते ऑक्टोबर, २०२२ या कालावधीची ३१ टक्क्यावरून ३४ टक्के अशी ३ टक्क्याची १० महिन्यांची महागाई भत्याची थकबाकी, माहे जुलै, २०२२ ते डिसेंबर, २०२२ या कालावधीची ३४ टक्क्यावरून ३८ टक्के अशी ४ टक्क्याची ६ महिन्यांची महागाई भत्याची थकबाकी, माहे जानेवारी, २०२३ ते सप्टेंबर, २०२३ या कालावधीची ३८ टक्क्यावरून ४२ टक्के अशी ४ टक्क्याची ९ महिन्यांची महागाई भत्याची थकबाकी, माहे जुलै, २०२३ ते जानेवारी, २०२४ या कालावधीची ४२ टक्क्यावरून ४६ टक्के अशी ४ टक्क्याची ७ महिन्यांची महागाई भत्याची थकबाकी अद्याप 21.प. कामगारांना मिळोलली नाही. सदरची सर्व थकबाकी कामगारांना त्वरीत मिळणे आवश्यक आहे.
शासकीय कर्मचा-यांप्रमाणे घरभाडे भत्ता व वार्षिक वेतनवाढीचा दर रा.प. कामगारांना लागू करण्याची कार करारात तरतुद असतानाही त्यामध्ये प्रशासनाने सन २०१६-२०२० ब्या कामगार करारापोटी रु.४८४९ कोटी एकतर्फी जाहिर करताना घरभाडे भत्याचा दर ८,१६,२४ टक्क्याएवजी ७.१४.२१ टक्के वार्षिक दीया दर टक्क्याऐवजी २ टक्के असा एकतर्फी कमी करून कामगार कराराच्या तरतुदीचा भंग केलेला आहे. याबाबत रा.प. प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा केल्यानंतर प्रशासनाने घरभाडे भत्याचा दर शासकीय दरानुसार ८,१६,२४ ८००० माहे ऑक्टोबर २०२१ पासून व वार्षिक वेतनवाढीचा दर ३ टक्के माहे नोव्हेंबर २०२१ पासून रा.प. कामगारांना लागू केला. परंतु माहे एप्रिल २०१६ ते सप्टेंबर २०२१ या ५७ महिन्यांच्या कालावधीची घरभाडे भत्त्याची थकबाकी व माहे एप्रिल २०१६ ते ऑक्टोबर २०२१ या ५८ महिन्यांच्या कालावधीची वार्षिक वेतनवाढीची थकबाकी रा.प. कामगारांना अद्याप मिळालेली नाही ती त्वरीत देण्यात यावी. वार्षिक वेतनवाढीची सकबाकी देताना माहे एप्रिल २०१६ पासून कर्मवा यांना देय होणा-या वार्षिक वेतनवाढीच्या महिन्यापासून वेतन निश्चिती करूनच थकबाकी अदा करण्यात यावी.
सन २०१६-२०२० या कालावधीसाठी वेतनवाढीपोटी रु.४८४९ कोटी जाहिर केले. सदर रू.४८४९ कोटीचे पुर्ण वाटपही झालेले नाही. तरी रु.४८४९ कोटीमधील शिल्लक रक्कमेचे कामगारांना वाटप करण्यात यावे. एस.टी. कामगारांचे वेतन इतर महामंडळाच्या तुलनेत कमी आहे ही बाब विचारात घेऊन शासनाने कामगारांच्या सेवा कालावधीनुसार त्यांच्या मूळ वेतनात माहे नोव्हेंबर २०२१ पासून अनुक्रमे रु.५०००/-, रु.४०००/- व रु.२५००/- वाढ करण्यात आली. परंतु अशी वाढ देताना रोवाजेष्ठ कामगारांच्या मूळ वेतनात मोठ्या प्रमाणात विसंगती निर्माण झालेल्या आहेत. सदाच्या विसंगती दूर करण्यासाठी सर्वच कामगारांना सरसकट रू.५०००/- लागू करण्यात रा.प. कामगारांच्या वरील प्रलंबित आर्थिक मागण्यांची सोडवणूक करण्याच्या दृष्टीने निर्णय होण्यासाठी सहकार्य करावे. या मागण्यांबाबत शासनाने सकारात्मक विचार करून त्याची सोडवणूक करावी अन्यथा ऑगस्ट क्रांतीदिनापासून बेमूदत धरणे आंदोलन करण्याशिवाय पर्याय राहणार नाही असा निर्धार एस.टी.कामगारांनी केला आहे.
0 टिप्पण्या