Top Post Ad

वरळीतील हीट अँड रन प्रकरणातील आरोपीला तत्काळ अटक करा- खा.वर्षा गायकवाड

 


वरळीतील ऍट्रिया मॉलजवळ बीएमडब्ल्यू कारनं दुचाकीला धडक दिली. या दुचाकीवरुन नाखवा दाम्पत्य प्रवास करत होतं. अपघातात कावेरी नाखवा यांचा मृत्यू झाला, तर त्यांचे पती थोडक्यात बचावले. दुचाकीला धडक देणारी कार शिवसेना उपनेते राजेश शहांची आहे. अपघात झाला त्यावेळी त्यांचा मुलगा मिहीर कार चालवत होता, अशी माहिती कावेरी यांच्या पतीनं जबाबात दिली आहे. राजेश शहा यांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. अपघातावेळी कार चालवत असलेला राजेश यांचा मुलगा मिहीर त्यांच्या बोरिवलीतील घरात राहतो. त्याला पालघरमध्ये फारसं कोणी ओळखत नाही. 'मिहीर कधीकधी पालघरमध्ये येतो. कुटुंबाच्या व्यवसायासाठी तो पालघरला येतो. अन्य राजकीय नेत्यांच्या मुलांप्रमाणे तो राजकारणात फारसा सक्रिय नाही. पण तो वडिलांसोबत असतो.

महाराष्ट्रात मद्यधुंद अवस्थेत बेदरकारपणे वाहन चालवणाऱ्या धनदांडग्यांच्या गाड्यांखाली निष्पाप लोक बळी पडत असून अशा घटनांत वाढ होत आहे. पुणे, नागपूर, जळगाव आणि आता मुंबईत घडलेली घटना चिंताजनक आहे. वरळीतील ४५ वर्षीय महिला कावेरी नाकवा यांना गाडीखाली चिरडून मारणा-या नराधमाला तत्काळ अटक करून कडक शिक्षा करावी,अशी मागणी मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खासदार प्रा. वर्षा गायकवाड यांनी केली आहे. वरळीतील अपघात प्रकरणी तीव्र संताप व्यक्त करत वर्षा गायकवाड म्हणाल्या की, भरधाव वेगात गाडी चालवून सामान्य लोकांना नाहक जीव गमवावा लागत आहे.  आरोपी दारूच्या नशेत गाडी चालवत होता आणि त्याहूनही धक्कादायक बाब म्हणजे अपघात झाल्यानंतर गुन्हेगाराने गाडी थांबवली नाही. कावेरी नाखवा यांना सुमारे १०० मीटरपर्यंत फरफटत नेले ही बाब मन पिळवटून टाकणारी आहे. या अपघातानंतर तो नराधम घटनास्थळावरून पळून गेला.आम्ही या प्रकरणाचे राजकारण करू इच्छित नाही, परंतु सरकारने या प्रकरणात जातीने लक्ष घालून पीडित कुटुंबाला त्वरित न्याय मिळवून द्यावा. दोषीला तत्काळ अटक झाली पाहिजे  तसेच वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करण्यात दोषीला मदत करणाऱ्या सर्व संबंधितांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे. असे खा.गायकवाड यांनी स्पष्ट केले.

गेल्या दोन तीन महिन्यांत महाराष्ट्रात अशा चार घटना घडल्या आहेत. बेशिस्तपणे वाहन चालवणे, अतिवेगाने वाहन चालवणे आणि रस्ते अपघातांच्या घटनांमध्येही वाढ हे चिंताजनक आहे. बेभान होऊन सुसाट वाहन चालवण्याची जी वाढती प्रवृत्ती आहे, त्याला वेळीच लगाम घालणे अत्यावश्यक आहे. अशा घटनांमध्ये निष्पाप जीव गमावणे हे कोणत्याही परिस्थितीत परवडणारे नाही. दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांविरुद्धची मोहीम सरकारने अधिक मजबूत केली पाहिजे आणि वाहतूक नियम अधिक कठोर करून त्यांची काटेकोरपणे अंमलबजावणी केली पाहिजे. हिट अँड रन , ड्रिंग अँड ड्राईव्ह प्रकरणे कठोरपणे हाताळली पाहिजेत. कायद्यातील पळवाटांचा फायदा घेऊन गुन्हेगार मुक्त होता कामा नये. कठोर कायदा करून अशा प्रवृत्तींना जरब बसवली पाहिजे अन्यथा धनदांडगे असेच बेदरकारपणे गाडीखाली लोकांना चिरडून मारतील व मोकट वावरतील अशी भितीही वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केली. 

 पालघरमधील एमआयडीसी आणि औद्योगिक क्षेत्रात असलेल्या भंगार व्यवसायावर शहाचं वर्चस्व आहे. याशिवाय ते बांधकाम साहित्यदेखील पुरवतात. व्यवस्थापन, संपर्क आणि वाटाघाटी करण्यात त्यांचा हातखंडा आहे. . पालघर आणि आसपासच्या भागात त्यांचा चांगला संपर्क आहे. एप्रिल २०२३ मध्ये शिंदेंनी शहांची उपनेतेपदी नियुक्ती केली. त्याआधी ते पालघर जिल्हाप्रमुख होते. शहा २००० सालाच्या आधीपासून राजकारणात सक्रिय होते. ठाणे आणि आसपासच्या भागात ते काम करत होते. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी शिंदेंकडे ठाणे आणि पालघरची जबाबदारी सोपवली. त्यानंतर शहा आणि शिंदे एकमेकांच्या अधिक जवळ आले. पालघरमधला शिंदेंचा उजवा हात अशी शहांची ओळख आहे.  पालघरमधील सगळ्याच समुदायांसोबत त्यांचे उत्तम संबंध आहेत. परिसरातील सर्व कार्यक्रमांना त्यांची उपस्थिती असते. स्थानिक आयोजक मंडळांना कार्यक्रमासाठी भरपूर देणगी देतात. 'एप्रिल २०२३ मध्ये मुख्यमंत्री शिंदेंनी कुंदन संखे यांची जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती केली. त्यामागे संघटनात्मक कारणं होती. पण त्यांनी शहांची नियुक्ती पालघरच्या उपनेतेपदी केली. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com