Top Post Ad

दिक्षाभूमी RSS च्या ताब्यात कशी .... दिक्षाभूमी आम्ही वाचवणारच !


 आरएसएसच्या ब्राम्हणांनी नागपूरवर कब्जा करुन नागांची जमीन आणि दीक्षाभूमी ताब्यात ठेवणे हा एक मोठ्या व्यापक षडयंत्राचा भाग आहे !  दिक्षाभूमी RSS च्या ब्राह्मणांच्या ताब्यात कशी ? हा प्रश्न प्रत्येक जागृत बौद्धाला पडायला हवा. रा.सू.गवईच्या काळापासून दिक्षाभूमी ब्राह्मणांच्या ताब्यात आहे.पंडित शर्मा नावाच्या ब्राम्हणाला गवईंनी दीक्षाभूमी येथे वसवण्याचे काम केले आणि तो ब्राम्हण मरेपर्यंत तिथेच राहिला. ही गोष्ट आम्ही उजेडात आणताच RSS ला वाटले की समाज जागरूक होत आहे आणि त्यामुळे प्रचंड क्रांती होऊ शकते त्यामूळे नागपुरात RSS च्या ब्राह्मणांना धोका वाटला म्हणून  पडद्यावर ब्राह्मणांची नावे येऊ नयेत मात्र दीक्षाभूमीचे नियंत्रण RSS कडेच असावे अशी योजना आखली त्यामुळे आशिष द्विवेदी, डॉ. निर्झर कुलकर्णी, डॉ.अरविंद पी.जोशी सारख्या ब्राह्मणांच्या हातात सुत्रे दिली गेली हे वर उल्लेख केलेले ब्राह्मण मोहन भागवत, देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी यांच्या जवळचे आहेत.

दिक्षाभूमीवर या ब्राह्मणांचे काय काम आहे ? डॉ. अरविंद जोशी हा दिक्षाभूमी येथे स्पोर्ट च्या 40 बॅचेस सकाळ सायंकाळ चालवतो त्याला ही परवानगी कोणी दिली ?
RSS आणि सरकारी कार्यक्रमांचे संपूर्ण नियंत्रण या तीन ब्राह्मणांच्या नियंत्रणाखाली आहे या ब्राह्मणांना दिक्षाभूमीवर आणण्याचे श्रेय मोदी, भागवत, गडकरी, फडणवीस यांना जाते विशेष बाब म्हणजे देवेंद्र फडणवीस हे भीमाकोरेगाव दंगलीचे सूत्रधार आहेत, तरीही ते RSS च्या कार्यालयात सकाळी RSS च्या ड्रेसमध्ये राहायचे आणि दीक्षाभूमीवर भाषण देण्यासाठी काळा कोट घालून आले. ज्यांनी भीमाकोरेगावच्या लढाईच्या द्विशताब्दी वर्षाला दंगल घडवली, त्यांना दिक्षाभूमीवर येऊच कसे दिले ?

दिक्षाभूमीचा AIM आणि OBJECT अद्याप सापडलेला नाही.लोकांना त्यांचे कार्यक्रम, योजना काय आहेत याची माहिती दिली जात नाही. महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी नागांचा देश असलेल्या नागपुरातील ब्राह्मणी धर्माला लाथ मारून बहुजन, बौद्ध धर्माचा मूळ धर्म पुनरुज्जीवित केला होता.सावरकर, गोळवलकर, दत्ता ठेंगडीपासून RSS च्या सर्व प्रमुखांना डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्म क्रांतीची भीती होती आणि आजही आहे.  RSS च्या ब्राह्मणांचे हे क्रांतिकारी केंद्र काबीज करण्याचे मोठे षड्यंत्र आहे. आम्ही प्रतिज्ञा करत आहोत की सदर दीक्षाभूमी विदेशी ब्राह्मणांच्या नियंत्रणातून मुक्त करण्यासाठी बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क मोहीम राबवेल कारण हा आपल्या पूर्वजांचा वारसा आहे, त्यावर RSS च्या ब्राह्मणांचे काम काय ?

पुष्यमित्र शुंगने मौर्य साम्राज्यात घुसखोरी केली ज्यामुळे त्याला महान सम्राट अशोक यांचा पणतू  सम्राट बृहद्रथ मौर्य याला मारण्याची संधी मिळाली. नागपूरातील बौद्ध या इतिहासापासून धडा घेणार की नाही ? RSS च्या ब्राह्मणांचे समर्थन करणाऱ्या काही देशद्रोही, समाजद्रोही यांच्या पासून दीक्षाभूमीला वाचवावेच लागेल.

  •  प्रा.डॉ.विलास खरात
  • राष्ट्रीय प्रभारी... बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क, नवी दिल्ली.
------------------------------------------------------

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीनंतर समस्त शोषितांसाठी ‘दीक्षाभूमी’ ही करुणेचा सागर बनली. ही दीक्षाभूमी बाबासाहेबांच्या तत्त्वज्ञानाची प्रयोगशाळा असताना ‘दीक्षाभूमी’ हा शब्द वगळून केवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती नागपूर असे नामविधान ठेवले आहे. यामुळे संतप्त झालेल्या आंबेडकरी समाजाने या वर्षाच्या मार्च महिन्यातील ३ तारखेला देखील दीक्षाभूमी बचाव आंदोलन सुरू केले होते. ज्या दीक्षाभूमीने समाजाला सार्वजनिक कल्याणाचा महामार्ग दिला. व्यवस्थेशी वैचारिक संघर्ष करण्याची शक्ती दिली, त्या दीक्षाभूमीला स्वतःच्या मालकीची जागा समजून धर्मदाय संस्थेत दिलेल्या नोंदणीत बदल करण्यात येत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला होता.  स्मारक समितीने ‘दीक्षाभूमी’ हा शब्द का कमी केला.  समिती स्थापनेपासून आजपर्यंत घटनेत बदल केलेल्या प्रति जाहीर कराव्यात. समितीचा ऑडिट रिपोर्ट समाजासमोर जाहीर करावा.  जनरल कौन्सिल, गव्हर्निंग, बोर्ड ऑफ ट्रस्टी, ॲडवायझरी कमिटी जाहीर करावी, एक्झिक्युटिव्ह कमिटी, सबस्क्रायबर, पॅट्रॉन यांची यादी  स्मारक समितीने जाहीर करावी अशा आग्रही मागण्या यावेळी करण्यात आल्या. मात्र यावर अद्यापही समितीने कोणतीही भूमिका स्पष्ट केली नाही. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या हयातीत कुठल्याही संस्थेत घरातील सदस्यांना विश्वस्त म्हणून घेतले नव्हते. किंबहुना ते या विरोधातच होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणानंतर त्याच्या सर्वच संस्थेत त्यांनी नियुक्त विश्वस्त होते. हळूहळू काळ लोटत गेल्यानंतर या संस्थांमधून पदावरून भांडणे सुरू झाली ती अद्यापही सुरू आहेत. नागपूरच्या दीक्षाभूमी समितीतही पदावरून भांडणे सुरू आहेत. रा.सु. गवई यांच्या निधनानंतर त्यांच्या रिक्त जागेवर सुपुत्र डॉ. राजेंद्र गवई यांना घेण्यात आले. सदानंद फुलझेले यांच्या जागेवर त्यांचे सुपुत्र सुधीर फुलझेले यांना घेतले. नंतर अंतर्गत वादानंतर त्यांनी राजीनामा दिल्याचं कळते. समिती ही सद्यस्थितीत दीक्षाभूमीवर कुठले प्रकल्प राबविते हे माहीत नाही. माध्यमांना त्यांनी यासंदर्भात कधीही माहिती दिलेली नाही. धम्मचक्र प्रवर्तन दिनापूर्वी समितीचे विश्वस्त माध्यमांना कार्यक्रमासंदर्भात माहिती सांगतात. त्याव्यतिरिक्त कुठलीही माहिती सांगितली जात नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं व्हिजन हे मोठं होत. त्यांना दैववाद मान्य नव्हता. त्यांच्या विचारांना अनुसरून समिती ही हल्ली कुठलेही कार्य करीत नाही. सद्यस्थितीत तिथे अंतर्गत वाद सुरू आहे. अध्यक्ष भदंत आर्य सुरई ससाई नागार्जुन आहेत. मात्र त्यांचं इतर कोणीही सदस्य ऐकत नाही. भन्तेजीच्या विरोधात हे सदस्य आहेत. समितीत घराणेशाही आणि अंतर्गतवाद यामुळे खरंच दीक्षाभूमीचं योग्य संचालन होते का? हा प्रश्न निर्माण होतो.  यापूर्वी समितीच्या विरोधातही आंदोलने झाली आहेत.  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com