Top Post Ad

प्रकल्पाचे काम पूर्ण न झाल्यास जलसमाधी आंदोलनाचा ग्रामस्थांचा इशारा

 


 फणसवळे, किंजळे, देवोळे, कुळे, वाशी स्थित, तालुका संगमेश्वर, जिल्हाः रलागिरी मधील गडगडी धरण प्रकल्प  हा दशक्रोषीतील ५० वर्षे रखडलेला प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करून तो कार्यान्वित करावा  यासाठी विधिमंडळाच्या आगामी पावसाळी अधिवेशनात निधीची तरतूद करावी, तसेच त्याचे पाणी कालव्यांऐवजी बंदिस्त पाइपलाइने दशक्रोषीतील संबंधित सर्व लाभार्थी गावांच्या ग्रामस्थांपर्यंत पोहोचविण्याची व्यवस्था व्हावी,  या मागणीचे निवेदन 26 गावांच्या सहभागाने स्थापन झालेल्या गडगडी धरण प्रकल्प समितीच्या वतीने प्रशासनाला देण्यात आले आहे.  याबाबत अधिक माहिती देण्याकरिता समितीच्या वतीने आज मुंबई मराठी पत्रकार संघात प्रसार माध्यमांशी संवाद साधण्यात आला. यामध्ये समितीचे अध्यक्ष संतोष घाग, ज्येष्ठ उपाध्यक्ष नारायण सावंत, सरचिटणीस आनंद पुरोहित, उपाध्यक्ष दत्ताराम घागले, उपाध्यक्ष विष्णू सनगरे, सेक्रेटरी अरुण गोडे, सेक्रेटरी गिरीश माईन, कोषाध्यक्ष मनोहर घाग यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. अतिरिक्त खर्च, वेळ, मजबुती. सुरक्षितता, इत्यादींचा विचार करून जास्त पाणीसाठ्यासाठी या धरणाची उंची वाढविण्याऐवजी संबंधित क्षेत्रातील गाळ काढून धरणाची खोली वाढवावी, धरणबांधणीस अनेक वर्षे झालेली असल्याने फेर आढावा/नियोजन/प्रारुपाआधी धरणाचे सुधारित स्थापत्य परीक्षण व्हावे, अशी मागणी यावेळी आग्रहाने करण्यात आली. 

सदर प्रकल्प उभारणी काम चाळीस वर्षांपेक्षा जास्त काळापूर्वी पासून सुरू आहे. अर्थसंकल्पित खर्च कित्येक पटीने वाढला, तरीही प्रकल्प मात्र पूर्ण झालेला नाहीं विशेषतः आमच्या भागामध्ये पाण्याचे दुर्भिक्ष हे फार मोठे संकट आहे. अवर्षण व ग्लोबल वॉर्मिंगमुळे हे संकट वर्षागणिक भयानक, अक्राळविक्राळ रूप घेत आहे. ते आता कल्पनेबाहेर असहनीय होण्याची शक्यता असल्याने आणि हा विषय गंभीर आणि जिव्हाळ्याचाच नव्हे, तर जीवनमरणाचाच असल्यामुळे हा प्रकल्प युद्धस्तरीय तातडीने दखल घेत. तशा तत्परतेने पूर्ण करण्यासाठी पावले उचलली जावीत, तसेच सदर प्रकल्पग्रस्त ग्रामस्थांना संपूर्ण मोबदला व/वा योग्य पुनर्वसन अद्याप झाले नसल्यास ते त्वरित करावे,  हा प्रकल्प लवकर पूर्ण झाल्यास शेतकरी-कष्टकरी ग्रामस्थांच्या असहनीय हाल-अपेष्टा थांबतील, आमचा विभाग टँकरमुक्त होईल, बारमाही पिके घेता येतील, पिण्यासाठी, तसेच गुरेढोरे, शेतीवाडी, झाडेझुडपे, भाजीपाला, इत्यादींच्या सिंचनासाठी पुरेसे पाणी मिळेल, पाणीसाठ्यामुळे विहिरी, नद्या यांच्या दृष्टीने भूगर्भातील जलस्तर वाढेल, हिरवळ आणि हवेतील गारवा वाढून वातावरण आल्हाददायक होईल, लहान-मोठे उद्योगधंदे उभे राहतील, रोजगार-स्वयंरोजगार निर्मिती होईल, शेतकरी-कष्टकरी ग्रामस्थांचा आर्थिक स्तर आणि आर्थिक स्वावलंबन वाढेल, शहरांकडचा ओढा आणि परिणामी शहरांवरचा वाढता ताण कमी होईल, गावे बकाल आणि भकास होण्याऐवजी सुजलाम सुफलाम होतील आणि एकूणच ग्रामस्थाचे जीवनमान उंचावेल, आमच्या गावांचा विकास होईल अशी भूमिका यावेळी ग्रामस्थांनी स्पष्ट केली. 

गडगडी प्रकल्पाची सर्व अपूर्ण कामे युध्द पातळीवर, तातडीने पूर्ण करावीत, त्यासाठी लागणाऱ्या पुरेशा निधीची एक विशेष वाब म्हणून, महाराष्ट्र विधिमंडळाच्या आगामी पावसाळी अधिवेशनामध्ये केवळ गडगडी प्रकल्पासाठीच समर्पित म्हणून त्वरीत व्यवस्था करावी, याकरिता  निधीची पुरेशी तरतूद आगामी अधिवेशनात न केल्यास मंगळवार दिनांक २ जुलै, २०२४ रोजी सकाळी १०.०० वाजता देवरूख, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी येथे जलआक्रोश मोर्चा व स्वाक्षरी अभियान तर आयोजित करण्यात आले आहे. परंतु त्यानंतरही आमच्या मागण्या मान्य न झाल्यास जनहित याचिका, साखळी उपोषण, आमरण उपोषण, ठिय्या आंदोलन, जलसमाधी अशा परिस्थितीनुसार चढत्या क्रमाने विविध सनदशीर, कायदेशीर मार्गानी तीव्र आंदोलन करण्यात येईल 



  • गडगडी धरण कृती समितीच्या प्रमुख मागण्या :
  • रत्नागिरी जिल्ह्याच्या संगमेश्वर तालुक्यातील तब्बल पाच दशके रखडलेला गडगडी धरण प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करून धरणाचे पाणी कालव्यांऐवजी बंदिस्त पाइपलाइनने लाभार्थी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावे.
  • त्यासाठी विशेष बाब म्हणून केवळ गडगडी धरण प्रकल्पासाठी समर्पित पुरेसा निधी उपलब्ध करावा, व सदर निधीचा वापर अन्य कोणत्याही प्रकल्पासाठी न करता केवळ गडगडी धरणासाठीच व्हावा. 
  • सदर निधीची तरतूद महाराष्ट्र विधिमंडळाच्या आगामी पावसाळी अधिवेशनात करावी.
  • काटवली (निगाडी), (ता. संगमेश्वर, जिल्हा रत्नागिरी) येथील धरणाचे काम पाच वर्षांत सुरुही झालेले नाही, ते लवकरात लवकर सुरु करावे.
  • उमरे (ता. संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी) येथील धरणाला गळती लागलेली आहे त्याचे लवकरात लवकर स्थापत्य परीक्षण करून योग्य ती कार्यवाही करावी व सदर गळती थांबवावी व संभाव्य जीवितहानी टाळावी.
  • गडगडी धरणामुळे किंजळ्यातून विस्थापित झालेल्या आणि सध्या वाशी गावात वस्तीस असलेल्या नागरिकांसाठी स्वतंत्र ग्रामपंचायतीची स्थापना करावी;
  • माती उपशामुळे अनेक वर्षांपासून वाशी गावात पडलेले जीवघेणे खड्डे त्वरित बुजवावेत.
  • सदर प्रकल्प अद्याप पूर्ण झाला नसला, तरी धरण अनेक वर्षांपूर्वी पूर्ण झालेले असल्यामुळे संबंधित लाभार्थीच्या आणि धरणाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने जॅकवेलसह संपूर्ण प्रकल्पाचे त्वरित सखोल स्थापत्य परीक्षण (Structural Audit) करावे व त्यातील निरीक्षणाच्या आधारे आवश्यक ती कार्यवाही करावी.
  • प्रकल्पग्रस्त शेतकरी-ग्रामस्थांना संपूर्ण मोबदला दिला नसल्यास अथवा त्यांचे समाधानकारक पुनर्वसन झाले
  • नसल्यास ते त्वरित करावे. अतिवृष्टीच्या वेळी काही भागांमध्ये रहदारीच्या रस्त्यांसह सर्वत्र महापुरासारखे पाणी येते. त्यामुळे शेतीसह जीवितास धोका निर्माण होतो. याबाबतचा अभ्यास करून योग्य उपाययोजना त्वरित करावी. भरतीच्या वेळी धरणातील पाणी सोडणे टाळावे.
  • गडगडी धरणाची उंची न वाढवता धरणातील गाळ काढावा.
  • सर्व स्थानिक खासदार, आमदार व अन्य लोकप्रतिनिधींनी या विषयाचा गंभीरतेने सखोल अभ्यास करून या समस्यांना सर्व स्तरांवर वाचा फोडावी व समस्येचे निराकरण करावे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com