Top Post Ad

या वृत्तीला परंपरावाद प्रिय आहे, परिवर्तनवाद नको आहे

 


पंढरपूरची वारी आता कालबाह्य झाली आहे, असे अलीकडे माझे मत बनले आहे. ज्या काळात घराच्या आणि गावाच्या बाहेर पडण्यासाठी दुसरे पर्याय उपलब्ध नव्हते त्याकाळी तिचे प्रयोजन रास्त होते. आज ते राहिलेले नाही. आज घरा-गावाबाहेर पडण्यासाठी विविध प्रकारची असंख्य कारणे, निमित्ते आणि पर्याय उपलब्ध झालेले आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे, वारीतले आयुष्य हे समग्र, वास्तव आणि स्थायी स्वरुपाचे पुरोगामी आयुष्य नाही. तो केवळ समतेचा/मानवतेचा आभास निर्माण करणारा अस्थायी उपक्रम आहे. वारीत भाग घेतल्यामुळे दैनंदिन जीवनाच्या कष्टमय-कंटाळवाण्या रहाटगाडग्यातून सुटका होऊन विरंगुळा आणि चेंज मिळतो, एवढीच आज वारीची उपलब्धी उरलेली आहे. गावाच्या बाहेर पडून, वारीत सहभागी होऊन तनामनाची रिफ्रेशमेंट झाली की नव्या उमेदीने गावात येऊन गावातली पारंपरिक जातिव्यवस्था जोपासायला नवा हुरूप येतो, हाही वारीचा आणखी एक फायदा म्हणता येईल. समता आणि मानवता या गोष्टी 15 दिवसांच्या वारीत प्रत्ययास येत असल्या तरी उर्वरीत 350 दिवस ज्या गावात वारकरी राहतात तिथे त्या अस्तित्वात नसतात किंवा असल्याच तर क्षीण अवस्थेत जीव मुठीत घेऊन वावरतात. एसटीत किंवा ट्रेनमध्ये ज्या प्रकारची टेंपररी समता असते तेवढीच समता वारीत असते. तिला आभासी किंवा भ्रामक समता म्हणता येईल. आज वारीच्या माध्यमातून पुरोगामी मंडळींना एक असा कार्यक्रम गवसलेला आहे, ज्यातून आपण काहीतरी करतो आहोत हा त्यांचा भ्रम व्यवस्थित जोपासला जाईल, पण क्रांतिकारी स्वरुपाचे काहीही ठोस आऊटपुट मिळणार नाही.  हिंदू नावाच्या जन्मप्राप्त संस्कृतीचौकटीत रेंगाळत रेंगाळत दिवस ढकलण्याच्या मानसिकतेची ही स्वाभाविक परिणती आहे. या वृत्तीला परंपरावाद प्रिय आहे, परिवर्तनवाद नको आहे. त्यांची भाषा पुरोगामी आहे, पण त्यांना स्थितिवाद हवा आहे आणि गतिवाद नको आहे. आज परिवर्तनाच्या चळवळीतले लोक चक्क अपरिवर्तनीय मोडमध्ये गेलेले आहेत. हे चित्र अत्यंत खेदजनक आहे. अलीकडच्या काही वर्षांत वारकऱ्यांमध्ये प्रतिगामी धारकरी गनिमी काव्याने घुसलेले असले (आणि त्यांचा जोरदार निषेध करण्याची, त्यांना हुसकावून लावण्याची आवश्यकता असली) तरी मुळात वारकरी तरी कुठे मोठे प्रागतिक बाण्याचे लागून गेले आहेत, असा प्रश्न पडावा अशी आज सार्वत्रिक स्थिती आहे. वारी हा मध्ययुगीन काळातला प्रबोधनाचा "फॉर्म" जरूर होता. आज त्यातला आशयही हरवला आहे आणि त्याचा सांगाडाही आऊटडेटेड झाला आहे.

तात्पर्य, वारी ही आजची गरज नाही ! आजची खरी गरज सांस्कृतिक निष्ठा बदलण्याची, नव्या निष्ठा निर्माण करून त्या मनःपूर्वक स्वीकारण्याची आहे. आजची खरी गरज वारीत अडकून पडण्याची नाही, तर वारीचे ओरिजिनल शोधून तिथपर्यंत जाण्याची, ओरिजिनलला जीवननिष्ठा अर्पण करण्याची आहे. आजची खरी गरज सांस्कृतिकदृष्ट्या प्रामाणिक असण्याची/होण्याची आहे. यासाठीचा एक जबरदस्त प्रयोग आणि यशस्वी आदर्श महाराष्ट्रात आहे. मात्र त्याकडे कुणाचेच लक्ष नाही ! कारण...  वारीची भलामण करणारे आणि स्वतःला प्रागतिक- पुरोगामी म्हणविणारे बहुतांश लोक अंतर्मनाने जातीयवादी आहेत !!! कोणता आदर्श मनोमन मानायचा आणि कोणता आदर्श हळूच डावलायचा याची त्यांच्या अंतर्मनातली गणितं पक्की आहेत !!! कुणाला शंकाही येणार नाही इतकी ती अदृश्य आहेत !!!

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com