Top Post Ad

ठाणे महानगरपालिका तर्फे अनधिकृत हॉटेल आणि बार वर कारवाई की वसुली ?


  सलग दुसऱ्या दिवशीही ठाणे शहरातील पब्ज, बार व अंमली पदार्थ विक्री करणारी अवैध बांधकामे निष्कसित करण्याची कारवाई  ठाणे महापालिकेच्यावतीने शहरात करण्यात आली. महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या आदेशानुसार सदरची कारवाई शहरातील विविध प्रभागसमिती कार्यक्षेत्रात सुरू आहे. आज दिवसभर सुरू असलेल्या कारवाईत महापालिका कार्यक्षेत्रातील शाळा, महाविद्यालयापासून 100 मीटरच्या आत असलेल्या एकूण 40 पानटपऱ्या जप्त करण्यात आल्या तर हॉटेल, पब्ज, बार असे मिळून 9 ठिकाणी कारवाई करण्यात आली. 

            गुरूवारी (28/6/2024) ठाणे शहरात करण्यात आलेल्या कारवाईत एकूण 31 पानटपऱ्या जप्त करुन हॉटेल, पब्ज, बार असे मिळून 8 ठिकाणी तर 9 शेडवर कारवाई करण्यात आली होती. आज (29/6/2024) नौपाडा, उथळसर, मानपाडा प्रभागसमिती या परिसरात दिव्यांगाना देण्यात आलेले स्टॉल व अनधिकृतरित्या उभारण्यात आलेले स्टॉल यांची तपासणी करुन ज्या ठिकाणी धुम्रपान निषेध पदार्थ आढळून आले त्या ठिकाणची 8 दुकाने सीलबंद करण्याची कारवाई करण्यात आली. सदरची कारवाई ही स्थावर विभागाचे उपायुक्त मनिष जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

           नौपाडा कोपरी प्रभागसमिती अंतर्गत असलेल्या गोपालआश्रम व एंजल बार ॲण्ड रेस्टॉरंट या बारवर कारवाई करण्यात आली. तसेच नौपाडा परिसरातील शाळेपासून शंभर मीटरच्या आत असलेल्या पान टपरीवर तसेचअंजली बार रेस्टॉरंटवर कारवाई करण्यात आली            वागळे प्रभागसमिती कार्यक्षेत्रात शाळापरिसरात 100 मीटरच्या आत असलेल्या पानटपरी, अनधिकृत टपऱ्या, बार तसेच श्रीनगर येथील हवेली धमाल बार वर कारवाई करण्यात आली.            वर्तकनगर प्रभागसमिती अंतर्गत असलेल्या बॉम्बे डक, सूर संगीत बार ही अनधिकृत बांधकामे निष्कसित करण्यात आली.            कळवा प्रभाग समिती अंतर्गत शाळेजवळ असलेल्या अनधिकृत पानटपरी तसेच दुकानांवर कारवाई करण्यात आली. मुंब्रा प्रभागसमिती अंतर्गत शाळा परिसरात असलेल्या अनधिकृत पान टपरी तसेच अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या दुकानांवर कारवाई करण्यात आली.

            प्रभागसमितीनिहाय करण्यात आलेली कारवाई अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, अतिक्रमण नियंत्रण व निष्कासन विभागाचे उपायुक्त जी.जी. गोदेपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळ1 चे उपायुक्त मनिष जोशी, परिमंडळ 2 चे उपायुक्त शंकर पाटोळे, परिमंडळ 3 चे उपायुक्त दिनेश तायडे, सहायक आयुक्त महेश आहेर, अक्षय गुडदे, सचिन बोरसे, सोपान भाईक, लक्ष्मण गरुडकर, बाळू पिचड, प्रितम पाटील, भालचंद्र घुगे यांनी पोलीस बंदोस्तात करण्यात आली. सदरची कारवाई ही सातत्याने सुरू राहणार असल्याचेही अतिक्रमण नियंत्रण व निष्कासन विभागाचे उपायुक्त जी.जी गोदेपुरे यांनी नमूद केले. 

अनधिकृत पब, हुक्का पार्लर, बार व अंमली पदार्थ विक्री करणारी अवैध बांधकामे निष्कसित करण्याबाबत मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या निर्देशानुसार ठाणे महापालिका क्षेत्रात सलग तिसऱ्या दिवशी कारवाई सुरू होती. महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कारवाईत शनिवारी, शाळा, महाविद्यालयापासून १०० मीटरच्या आत असलेल्या एकूण १९ पानटपऱ्या जप्त तसेच सिल करण्यात आल्या. तर हॉटेल, पब, बार हुक्का पार्लर असे मिळून ११ ठिकाणी पोकलेनच्या सहाय्याने निष्कासन कारवाई करण्यात आली. सुमारे ९२ हजार चुरस फूट क्षेत्रात ही कारवाई झाली आहे.

सलग तिसऱ्या दिवशीही  ठाणे महापालिका क्षेत्रात एकूण ३१ पानटपऱ्या जप्त करुन हॉटेल, पब, बार असे मिळून ०८ ठिकाणी तर ०९ शेडवर कारवाई करण्यात आली होती. तर, शुक्रवारी धुम्रपान निषेध पदार्थ आढळून आले अशी ०८ दुकाने सीलबंद करण्याची कारवाई करण्यात आली. ४० पान टपऱ्या जप्त करण्यात आल्या. तर, ०९ बार, पब, हुक्का पार्लर काढण्यात आले होते. शनिवारी त्यात, १९ पान टपऱ्या आणि ११ हुक्का पार्लर, पब, बार यांची भर पडली.      

घोडबंदर रोड, नागला बंदर या भागातील अनधिकृत हुक्का पार्लर, रेस्ट्रो बार वर शनिवारी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने धडक कारवाई केली. त्यात, २१ प्लामस्, पिंक बाबा(सन शाईन) हुक्का पार्लर, फायर प्ले हा बार व हुक्का पार्लर यांच्यावर कारवाई करण्यात आली.  तसेच, वर्तक नगर येथील के नाईट या बारवरही पोकलेनच्या साहाय्याने कारवाई करण्यात आली. त्याचबरोबर, हिरानंदानी इस्टेट येथील रिकीज क्लाउड व माटो माटो या बार समोरील अनधिकृत शेडवर कारवाई करण्यात आली.       नौपाडा-कोपरी प्रभाग समिती अंतर्गत शाळा व महाविद्यालये यांच्या पासून १०० मीटरच्या आतील परिसरात असलेल्या गुटखा व तत्सम पदार्थ विक्री करणाऱ्या ०५ पान टपऱ्या सिल करण्यात आले.     दिवा प्रभाग समितीमधील दिवा-शिळ रोड व शिळ-महापे रोड येथील ०७ पान टपऱ्या जप्त करण्यात आल्या. तसेच ०५ पान टपऱ्या बंद करण्यात आल्या.     वागळे प्रभाग समितीअंतर्गत शाळेजवळ एक पान टपरी सीलबंद करण्यात आली. तसेच, एक पान टपरी जप्त करण्यात आली.

     प्रभाग समितीनिहाय करण्यात आलेली कारवाई अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, अतिक्रमण नियंत्रण व निष्कासन विभागाचे उपायुक्त जी. जी. गोदेपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळ एकचे उपायुक्त मनिष जोशी, परिमंडळ दोनचे उपायुक्त शंकर पाटोळे, परिमंडळ तीनचे उपायुक्त दिनेश तायडे, सहायक आयुक्त महेश आहेर, अक्षय गुडदे, प्रीतम पाटील, सोपान भाईक, लक्ष्मण गरुडकर यांच्या उपस्थिती पोलीस बंदोस्तात कारवाई  करण्यात आली. 

काल ठाणे महानगरपालिका तर्फे अनधिकृत हॉटेल आणि बार यांच्यावर कारवाई केली गेली. पण कारवाई बघून वाटत नाही की हे अनधिकृत बांधकाम निषकाशन करण्याकरिता कारवाई आहे. हॉटेल चे बाहेरून पत्रे तोडणे, भिंतीत चार छिद्र पाडणे याला कारवाई म्हणतात का ? हे फक्त माननीय मुख्यमंत्र्यांचा नावाखाली पैसे वसुली करण्याची खेळी आहे. सराविक हॉटेल आणि बार यांना टार्गेट करून भीती निर्माण करणे आणि बाकीच्या हॉटेल आणि बार कडून मोठे पैसे वसुली करण्याचा हा सर्व प्रकार आहे. तोडलेले बार आणि हॉटेल येत्या १ महिन्यात परत बांधण्यात येतील व त्यासाठी हे अधिकारी वेगळे पैसे गोळा करतील. जर खरच अनधिकृत बार वर कारवाई करायची आहे तर ठाणे महानगरपालिकेने अनधिकृत हॉटेल आणि बार ची यादी जाहीर करावी जेणेकरून ही वसुली थांबणार.- एक ठाणेकर योगेश मुंधरा टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com