Top Post Ad

चंद्रशेखर आझाद, डॉ.थोल थीरुवलवलन, रविकुमार.डी

 


भीम आर्मी संस्थापक व आझाद समाज पार्टी चे चंद्रशेखर आझाद हे उत्तरप्रदेश, नागीना मतदारसंघातून 5 लाखांच्यावर (51.2 टक्के) एव्हढे भरघोस मतदान घेवून निवडून आलेत. चंद्रशेखर अवघ्या 37 वर्षांचे आहेत. तर दक्षिण भारतातील तमिलनाडु येथून 'लिबरेशन पँथर्स ऑफ इंडिया' या पक्षाचे दोन खासदार भरघोस मतांनी निवडून आले आहेत. चिदम्बरम मतदारसंघातून डॉ. थोल थीरुवलवलन (पक्षाचे अध्यक्ष-संस्थापक) व विलीपुरम मतदारसंघातून रविकुमार. डी हे स्वतंत्रपणे निवडुन आले आहेत. अब्राह्मण चळवळीचा गड समजल्या जाणार्‍या दक्षिण भारत अन विशेषकरून तमिळनाडूत दलितांची अवस्था मात्र काही वेगळी नाही. येथील अब्राह्मणी OBC पक्षांकडून दलितांच्या होत असलेल्या छळवणूकी विरोधात 'दलित पँथर' नावाने डॉ.थोल थीरुवलवलन यांनी सुरू केलेले संघटन 'लिबरेशन पँथर्स ऑफ इंडिया' या राजकीय पक्षाच्या नावाने स्थिरस्थावर झाले आहे. 'जातिअंत' याला आपले उद्दिष्ट मानून कार्यरत या पक्षाचे अनेक आमदार देखील आहेत.

 एकीकडे महाराष्ट्रातील दलित पुढारी अन खासकरून 'आंबेडकर' घराणे अन त्यांचे नव-गुलाम भक्त बाबासाहेबांच्या नावाला काळिमा फासण्याचे काम इमाने इतबारे करत आहेत तर दुसरीकडे 'बाबासाहेब आंबेडकर' हे नाव व या नावाच्या मागील 'विचार' जपण्याचा प्रयत्न महाराष्ट्राबाहेरील तरुण जोमाने अन प्राणपणाने करत आहेत. अर्थात, 'आझाद समाज पार्टी' अन 'लिबरेशन पँथर्स' यांनी मारलेली बाजी यामागे त्यांचे कित्येक वर्षांचे समाजकारण, पक्ष बांधणी, मतदारसंघ बांधणी यासाठी घेतलेली मेहनत, सवर्णांशी केलेला जीवघेणा संघर्ष आहे हे वेगळं सांगण्याची गरज नाही... आंबेडकरी विचारांचे पाईक असण्यासाठी व बाबासाहेबांची चळवळ पुढे नेण्यासाठी आडनावात 'आंबेडकर' असण्याची गरज नाही...तसंच हे आडनाव जर बाबासाहेबांच्या नावाला खड्यात घालत असेल..काळिमा फासत असेल तर त्याविरोधात भूमिका घेण्यापासून मागे सरण्याची देखील बिल्कुल गरज नाही.. हाच खरा आंबेडकरी बाणा..  विशेष म्हणजे निव्वळ 'आंबेडकर' या शब्दाने चिरकाल असे काही हासिल होत नाही. त्या साठी या नावामागे असलेली जीवतोड मेहनत, त्याग व समाजाप्रति समर्पण समजून घेणं व त्याप्रमाणे मार्गक्रमण करणं गरजेचं...

 अकोला मतदारसंघ- या मतदारसंघातून निवडून येण्यासाठी उमेदवाराला सरासरी 40 टक्के च्या जवळपास मतदान लागतं.  1998 साली एकीकृत 'RPI + काँग्रेस' युती मधून उभं राहिलेल्या प्रकाश आंबेडकर यांना तब्बल 50.6 टक्के एव्हढं भरघोस मतदान लाभले व *प्रकाश आंबेडकर विजयी झाले. 1999 साली 'भारिप बहुजन महासंघ + सोनिया काँग्रेस' या युतीतून उभं राहिलेल्या प्रकाश आंबेडकर यांना 40.5 टक्के मतदान झाले व ते विजयी ठरले. त्यानंतरच्या निवडणुकीत त्यांना मिळालेल्या मतांची टक्केवारी 25 टक्क्यांच्या आत राहीली आहे. अपवाद एकदा ती 30 टक्क्यांपर्यंत गेली होती. याचा अर्थ प्रकाश आंबेडकर अकोला मतदारसंघातून स्वबळावर निवडून येवू शकत नाहीत..मतदारसंघात त्यांचे तेव्हढे कार्य नाही. स्वतःच्या हेकेखोर स्वभावाला मुरड घालून या निवडणुकीत जर त्यांनी RSS/भाजपा विरोधातील आघाडीत सामील होण्याचा निर्णय घेतला असता तर आज दलित वस्त्यांमध्ये वेगळाच जल्लोष असता कारण दलितांची त्यांना पडलेली मतं RSS/भाजपा च्या उमेदवाराच्या 'कामी' आली नसती.वंचित भक्तांनी, बाबासाहेबांच्या विचारांना जागून, जर प्रकाश आंबेडकरांना योग्य निर्णय घेण्यास बाध्य केले असते तर निश्चितपणे आज वेगळा दिवस असता.

 अमरावती मतदारसंघ: जेमतेम 19 हजार मतं (1.6 टक्के) मिळवून आनंदराज आंबेडकर यांनी आपलं 'डिपॉजिट जप्त' करवून घेण्याची किमया साधलीय. डिपॉझिटचे व निवडणूक लढविण्याचा खर्च आनंदराज यांनी 'रिपब्लिकन सेना' या आपल्या राजकीय पक्षाच्या खात्यातून नव्हे तर 'बौद्धजन पंचायत समिती' कडून उकळलाय हे विशेष. मतदारसंघात आपलं कवडीचंही काम नाही. मुंबईतील 'इंदु मिल' लढा या नावाने जे काही आहे..नाहिये, त्याच्या जीवावर अमरावती मतदारसंघात पोहोचणे हा मोठा विनोदच म्हणावं लागेल. अमरावती मधिल दलित-बौद्धांनी आनंदराज यांना झिडकारलं नाहीतर प्रकाश आंबेडकर प्रमाणे त्यांनीही भाजपा उमेदवाराला निवडून आणलं असतं.

होशियारपुर मतदारसंघ: या महाशयांनी सर्वात जास्त कहर केला. हे पार पंजाबला होशियारपुर येथे पोहोचले. या मतदारसंघातून तब्बल 62 वर्ष आधी (1962) भिमराव आंबेडकरांचे वडील यशवंतराव हे 37.1 टक्के मतदान घेत केवळ 10 हजार मतांच्या फरकाने पराजित झाले होते. एव्हढीच काय ती शिदोरी घेवून डॉ. भिमराव यशवंतराव आंबेडकर होशियारपुर मतदारसंघातून 'ग्लोबल रिपब्लिकन पार्टी' या आपल्या नवीन पक्षातून उभे राहिले, सपाटून आपटले व 'इज्जत' घालवून घेतली. त्यांना लाभलेली 1041 मतं ही टक्केवारीत बसत नाहीत. 17 उमेदवारांमध्ये ते 14 व्या स्थानावर आले. NOTA मध्ये देखील डॉ. भिमराव यशवंतराव आंबेडकर यांना लाभलेल्या मतांपेक्षा अधिक मतं पडलीत. याहून अधिक शरमेची बाब ती कोणती. यांनी  देखील आपल्या पंजाब मधिल निवडणुकीचा खर्च महाराष्ट्रातील 'भारतीय बौद्ध महासंघ' याच्या खात्यातून काढलाय.

बाबासाहेबांचे रक्त..बाबासाहेबांचे घराणे..म्हणून या तिघांना आंबेडकरी समाजाने डोक्यावर घेतलंय.. 'आंबेडकर' हा शब्द म्हणजेच बाबासाहेब मानत या शब्दाभोवती फिरणारे या तिघांचेही 'आपआपले' व काही 'कॉमन' असे 'अंधभक्त' आहेत जे यांचे असे 'नव-गुलाम' झालेत की हे तिघे आपल्या सोबत बाबासाहेबांचे नाव देखील खड्यात घालत आहेत तरी या नव-गुलामांना त्याचे काही सोयरसुतक नाही. अध्यात्मातील भक्तिमार्ग उपयोगाचा असेलही मात्र, समाजकारण, राजकारणातील भक्त आपल्या 'हीरो' ची तर वाट लावतातच मात्र समाजाचे देखील हमखास नुकसान करतात. म्हणून, राजकारणातून 'भक्ति संप्रदाय' संपवून टाकला पाहिजे अशी बाबासाहेबांची सुस्पष्ट भूमिका या तिघा नेत्यांनीच अजून वाचलेली दिसत नाही तर त्यांच्या नव-गुलाम भक्तांचं काय घेवून बसलाय.आम्हाला मात्र आमच्या उद्धारकर्त्या बाबासाहेबांच्या नावाला फासली जात असलेली ही काळिमा सहन होत नाही/कदापि होणार नाही.  महाराष्ट्रात एकीकडे असे बाबासाहेबांच्या नावाला काळिमा फासण्याचा प्रकार (यात जोगिंदर बाबा अन राम-डास इत्यादी ही आलेच) चालू असतांनाच उत्तरप्रदेश व तमिळनाडूतून दिलासा देणार्‍या बातम्या आल्या. या दोन्हीही ठिकाणी  बाबासाहेबांच्या नावाने स्वतंत्रपणे लढून खासदार निवडून आलेत (उत्तरप्रदेशात एक तर तमिळनाडूत दोन). 

  • मिलिंद भवार _पँथर्स_ 
  • 9833830029
  • .............,....................
बाबासाहेबांचा सर्वव्यापी विचार आणि सर्व भारतीय नागरिकांना समान अधिकार देणारे संविधान वाचवून भारतीयत्व मजबूत राहावे यासाठी मतदारांनी प्राथमिकता दाखविली. केवळ 
 बाबासाहेबांच्या नावाचा जयघोष करणाऱ्या नेत्यांना नाकारले गेले. त्यांची संकुचित मनोवृत्ती आणि barganing techniques संपुष्टात आली असली तरी कुत्र्याचे शेपूट वाकडेच या म्हणी प्रमाणे पुढील विधानसभा निवडणुकीत हे आपले रंग दाखवतीलच यात शंका नाही. एका जात समूहाचे राजकारण आजच्या घडीला अशक्य असताना नको तो अट्टाहास कशासाठी नेते धरतात ?याचा प्रबुद्ध आंबेडकरी जनतेने पुढे देखील विचार करवा. तूर्त एव्हढेच. प्रा चंद्रभान आझाद. शिवसेना प्रवक्ते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com