कोणत्याही क्षेत्रात कायदेशीर अडचणींना तोंड देण्यासाठी वकीलाशिवाय पर्याय नाही! प्रत्येक क्षेत्रात केव्हा ना केव्हा वकिलाची आवश्यकता भासत असतेच, फक्त कंपन्या किंवा सरकारी कार्यालयेच नाही तर वैयक्तिक पातळीवरही कायदेशीर अडचणी सोडवण्यासाठी वकीलमंडळींची मदत घ्यावी लागते. म्हणूनच आज कायद्याचा अभ्यास केलेल्या पदवीधरांना करिअस्च्या अनेक संधी निर्माण झालेल्या पाहायला मिळतात, त्यामुळे विद्यार्थ्यांनी या क्षेत्राकडे वळावे, असे आवाहन एमआयटी आर्ट, डिजाईन आणि टेक्नालाजी विद्यापीठ स्कूल ऑफ लॉ चे सहाय्यक प्राध्यापक सुकृत देव यांनी केले. एमआयटी एडीटी विद्यापीठाच्या वतीने आयोजित प्रत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी प्रा. आदित्य केदारी, जनसंपर्क अधिकारी प्रा. चंद्रकांत बोरुडे आदी उपस्थित होते. मान्यवरांनी एमआयटी एडीटी विद्यापीठ स्कूल ऑफ ली'तर्फे विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असणाऱ्या पाच वर्षांचा बीबीए एलएलबी. तीन वर्षाचा एलएलबी, दोन वर्षांचा एलएलएम, एका वर्षांची लीगल जर्नालिझम पदविका आदी कोर्सेवी माहिती दिली. तसेच राज्यातील खासगी विद्यापीठांची संघटना असणाऱ्या पेश प्रवेश परिक्षेची दुसरी फेरी २८ व २९ जून रोजी होणार असून त्यामाध्यमातून विद्यापीठात प्रवेशाची अखेरची संधी विद्यार्थ्यांना मिळणार असल्याचेही सांगितले
यावेळी बोलताना प्रा केदारी म्हणाले की, एमआयटी एडीटी विद्यापीठ है प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड याच्या मार्गदर्शनाखाली व प्रा.डॉ. मंगेश कराड यांच्या दूस्टष्टीने साकारलेले व विद्यार्थ्यांना पारंपरिक शिक्षणाबरोबरच भविष्यातील नोकऱ्याची संधी ओळखून कौशल्यावर आधारित शिक्षण देणारे विद्यापीठ आहे हजारों विद्यार्थी विविध क्षेत्रांमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे काम करत आहेत. १२५ एकरमध्ये पसरलेला विद्यापीठाचा कॅम्पस जागतिक पातळीवरील विविध सोई-सुविधांनी असा सुसज्ज आहे. यासह, लॉ करण्यासाठी तसेच विधी अभ्यासक्रमाच्या प्रवेश पूर्व परीक्षेची तयारी कशी करावी या बाबत अधिक माहिती आणि मार्गदर्शन करण्यात येणार असल्याचे प्रा. केदारी म्हणाले.
विद्यार्थ्यांसाठी टीड लाखांपर्यंत शिष्यवृत्ती- एमआयटी एडीटी विद्यापीठ समाजाच्या सर्व घटकांतून येणाऱ्या विद्यार्थ्यांना कौशल्यपूर्ण शिक्षण देण्यासाठी कटीबद आहे त्याचसाठी स्कुल ऑफ लॉ तर्फे विद्यार्थ्यांना त्यांच्या मेरिटनुसार शैक्षणिक की मध्ये तब्बल दीड लाखांपर्यंत शिष्यवृती मिळविण्याची संधी प्राप्त होणार आहे. तरी लवकरात लवकर प्रवेश निश्चित करून संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहनही अधिष्ठाता डॉ. सपना देव यांच्याकडून करण्यात आले आहे
एमआयटी शिक्षण समुहाची ओळख ही पूर्वीपासून इंजिनिअरिंग आणि इतर शास्वांसाठी राहिलेली आहे. परतू आता एमआयटीने आपली व्याप्ती वाढवली असून विद्यार्थ्यांसाठी स्कुल ऑफ लॉ सारखी काळाजी गरज असणारी शाखा घेवून आलो आहोत. या शाखेतून विद्यार्थ्याला केवळ कायद्याचे शिक्षण मिळणार नाही तर त्याचा सर्वांगिन विकास होईल, अशा प्रकारचे शिक्षण देण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. - प्रा.डा. मंगेश तु. कराड, कुलगुरू तथा कार्याध्यक्ष, एमआयटी एडीटी विद्यापीठ, पुणे.
0 टिप्पण्या