Top Post Ad

अब की बार...


  मुंबईतील सहा जागांपैकी पाच जागा महाविकास आघाडीने जिंकल्या असून त्यात उद्धव ठाकरे यांनी तीन जागांवर विजय मिळवला आहे तर काँग्रेसने एक जागा जिंकली आहे. एका जागेवरचा विजय निसटला आहे. मुंबई-उत्तर पश्चिम- अमोल किर्तीकर यांना विजयी घोषित करण्यात आले होते. मात्र पुन्हा फेरमोजणी करण्याची मागणी रविंद्र वायकर यांनी केली. यामध्ये केवळ ४८ मतांनी किर्तीकर यांचा पराभव झाला असल्याची माहिती मिळत आहे.   दक्षिण मुंबई- अरविंद सावंत, दक्षिण मध्य मुंबई- अनिल देसाई, उत्तर मध्य मुंबई- पियूष गोयल, , मुंबई ईशान्य- संजय दिना पाटील, मुंबई उत्तर मध्य- वर्षा गायकवाड,  मुंबई विभागीय काँग्रेसच्या अध्यक्ष प्रा. वर्षा गायकवाड यांनी उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून भाजपा उमेदवाराचा दणदणीत पराभव करून ऐतिहासिक विजय मिळवला आहे. याच मतदारसंघातून लोकनेते एकनाथराव गायकवाड यांनी २००४ च्या लोकसभा निवडणुकीत विजय संपादन केला होता. यावेळी त्यांच्या कन्या वर्षा गायकवाड यांनी विजय मिळवला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथराव गायकवाड यांनी २००४ च्या लोकसभा निवडणुकीत याच मतदारसंघातून विजय मिळवता होता व देशात डॉ. मनमोहनसिंह यांच्या नेतृत्वाखाली युपीएचे सरकार आले होते.  आजच्या विजयाने २००४ च्या निकालाची पुनरावृत्ती केली आहे. एकनाथराव गायकवाड यांच्याप्रमाणेच वर्षा गायकवाड यांचाही दांडगा जनसंपर्क असून सर्वसामान्य जनतेसाठी त्या काम करत असतात. धारावीच्या आमदार या नात्याने वर्षा गायकवाड यांनी स्थानिक प्रश्नांना नेहमीच न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. धारावीकरांना विस्थापित करण्याच्या षडयंत्रालाही त्यांनी कडाडून विरोध करत संघर्ष करत आहेत. शिक्षण मंत्री या नात्यानेही त्यांनी चांगले काम केले आहे. आता संसदेत मुंबईकरांच्या प्रश्नासाठी त्या आवाज उठवतील व न्याय देतील असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

 पालघर- हेमंत सावरा,  भिवंडी- सुरेश म्हात्रे, कल्याण- श्रीकांत शिंदे, ठाणे-नरेश म्हस्के याची विजय झाला आहे. नरेश म्हस्के यांच्या विजयाने सर्व ठाणेकरांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. निष्ठावान विरुद्ध गद्दार अशा प्रकारचे या लढाईचे स्वरुप ठाणेकरांसमोर उभे करण्यात आले होते. यात राजन विचारे यांचे पारडे जड होते. मात्र म्हस्के यांच्या विजयाने ठाण्यातील सर्व समिकरणे बदलली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. 

देशाची आर्थिक आणि राजकीय स्थिती पाहता अनेक राजकीय उलथापालथींनंतर आणि घडामोडींसह पक्षबदलनंतर अखेर देशात लोकसभेची निवडणूक पार पडली. सात टप्प्यांमध्ये घेण्यात आलेल्या या निवडणुक निकालांकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिले होते. देशात सत्तापरिवर्तन होणार ? महाराष्ट्रात काय घडणार याची उत्सुकता सर्वांनाच होती.  मा्त्र लोकसभा २०२४ निवडणुकीने भाजपाला पुन्हा एकदा २८ वर्षांपूर्वीच दिवंगत माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींसारख्या परिस्थितीवर नेऊन ठेवले आहे. १९९६ मध्ये वाजपेयींना बहुमत न मिळाल्याने मित्रपक्षांच्या आधारावर, त्यांच्याशी जुळते घेऊन सरकार चालवले होते. तीच परिस्थिती आता मोदींसमोर आली आहे. आतापर्यंत आलेल्या निकालांमध्ये भाजपाला २४१ जागांवर आघाडी मिळाली आहे. तर भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीए सुमारे २९५ जागांवर आघाडीवर आहे. दुसरीकडे या निवडणुकीत काँग्रेसच्या नेतृत्वाखालील  इंडिया आघाडीतील सर्व पक्षांनी मिळून २३० जागांवर आघाडी घेतली आहे. 

त्यामुळे मागच्या दोन निवडणुकांत स्वबळावर बहुमत मिळवून सरकार स्थापन करणाऱ्या भाजपाला यावेळी मित्रपक्षांच्या मदतीने सरकार चालवण्यासाठी मित्रपक्षांची मदत घेण्याशिवाय गत्यंतर उरले नाही. यासाठी एनडीएने घटक पक्षांची तातडीची बैठक उद्या दिल्लीत बोलावली आहे. तर इंडिया आघाडीनेही याच संदर्भात दिल्लीत बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकांना उपस्थित राहण्यासाठी महाराष्ट्रातून शरद पवार, संजय राऊत आणि उद्धव ठाकरे दिल्लीला जाणार असल्याचे समजते आहे. तर दुसरीकडे एनडीएच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी राज्यातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जाणार आहेत.  नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडूंकडे सत्तेची चावी आहे. पुढील रणनिती ठरविण्यासाठी भाजपा आणि काँग्रेसने ही बैठक बोलावली आहे. आता या बैठकीला कोण हजर राहते आणि कोण गैरहजर याकडे देशाचे लक्ष लागले आहे. एनडीएच्या बैठकीला नितीशकुमार, चंद्राबाबू नायडू हजर राहतात का याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. 

 देशभरात इंडिया आघाडीला मिळालेली सरशी पाहता ही जनतेची लढाई होती आणि जनतेनं संघर्ष करत राहुल गांधी यांना पाठिंबा दिला. देशात आता परिवर्तन सुरु झालं असून, जनतेनं हुकूमशाहीला उत्तर दिलं आहे. हा भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाच पराभव- काँग्रेस नेते नाना पटोले  
चंद्रशेखर, तुसी ग्रेट हो!
उत्तर प्रदेशात सुरुवातीला भीम आर्मी आणि नंतर आझाद समाज पार्टी स्थापन करणारे तरुण दलित नेते चंद्रशेखर आझाद यांनी लोकसभा निवडणुकीत स्वबळावर लोकसभेत मुसंडी मारली आहे. त्यांची ही नेत्रदीपक कामगिरी म्हणजे महाराष्ट्रातील आंबेडकरवादी नेतृत्वालाच नव्हे तर उत्तर प्रदेशात मायावती यांनाही सणसणीत चपराक ठरली आहे.  चंद्रशेखर यांनी नगिना लोकसभा मतदारसंघातून १ लाख ५२ हजारावर मतांची आघाडी घेऊन विजयश्री घेचून आणली आहे. त्यांनी एकूण ५ लाख ११ हजार ८१२ मते मिळवली आहेत. त्यांची एकूण मते, मतांची आघाडी आणि स्वबळावर मिळवलेल्या विजयाला सॅल्युट ठोकावाच लागेल! - दिवाकर शेजवळ (ज्येष्ठ पत्रकार)


 ठाणे-नरेश म्हस्के, पालघर- हेमंत सावरा,  भिवंडी- सुरेश म्हात्रे, कल्याण- श्रीकांत शिंदे, दक्षिण मुंबई- अरविंद सावंत, दक्षिण मध्य मुंबई- अनिल देसाई, उत्तर मध्य मुंबई- पियूष गोयल, मुंबई-उत्तर पश्चिम- अमोल किर्तीकर, मुंबई ईशान्य- संजय दिना पाटील, मुंबई उत्तर मध्य- वर्षा गायकवाड, रायगड- सुनील तटकरे, रत्नागिरी-सिंधुदुर्ग- नारायण राणे, जळगाव- स्मिता वाघ, शिर्डी- भाऊसाहेब वाकचौरे,   सांगली- विशाल पाटील, नागपूर- नितीन गडकरी, पुणे- मुरलीधर मोहोळ, बुलढाणा- प्रतापराव जाधव, नंदुरबार- गोवाल पाडवी, धुळे- शोभा बच्छाव, रावेर- रक्षा खडसे, अकोला- अतुल धोत्रे, अमरावती- बळवंत वानखेडे, वर्धा- अमर काळे, रामटेक- श्यामकुमार बर्वे, भंडारा-गोंदिया- प्रशांत पडोले, गडचिरोली-चिमूर- डॉ. नामदेव किरसान, चंद्रपूर- प्रतिभा धानोरकर, यवतमाळ- वाशिम, हिंगोली-गणेश पाटील आष्टीकर, नांदेड- वसंत चव्हाण, परभणी- संजय जाधव, जालना-  कल्याणराव काळे, औरंगाबाद-संदीपान भुमरे, दिंडोरी- भास्करराव भगरे, नाशिक- राजाभाई वाजे, मावळ-श्रीरंग बारणे (महायुती), बारामती- सुप्रिया सुळे, शिरुर- अमोल कोल्हे, सातारा- उदयनराजे भोसले, अहमदनगर- निलेश लंके, बीड-??????????, धाराशीव- ओमराजे निंबाळकर, लातूर- शिवाजी काळगे, सोलापूर- प्रणिती शिंदे, माढा- धैर्यशील मोहिते पाटील, कोल्हापूर- शाहू महाराज छत्रपती, हातकणंगले- धैर्यशील माने  


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com