सजीव-निर्जीव यांच्यामधील क्रिया-प्रतिक्रिया व आंतरक्रियांमधून साकार झालेली, सजीवाच्या सभोवतालची परिस्थिती म्हणजे पर्यावरण होय. पर्यावरणाची गुणवत्ता वाढवणे, समस्या व संवर्धनाविषयी जागरूकता निर्माण करणे, आणि पर्यावरणविषयक निर्णय घेण्याची क्षमता निर्माण होण्यास पोषक वातावरणाची निर्मिती करणे, या एकमेव हेतूने इको फ्रेन्डली लाईफच्या माध्यमातून संपूर्ण भारतभर मिशन 700 कोटी वृक्ष लागवड करण्याचा उपक्रम सुरु आहे. या उपक्रमाअंतर्गत ठाणे, मुंबई येथील सर्व वयोगटातील महिला-पुरुष यांच्या सहभागातून इ एफ एल सेन्टर, मुरबाड, म्हसा या गावात हजारो फळझाडे लावण्याचे काम सुरु केले. प्रत्येक व्हिलेज इको व्हिलेज करण्यासाठी हा कृती कार्यक्रम असाच सुरु राहणार आहे. इ एफ एल सेन्टर तर्फे शेतकऱ्यांना आंबा, चिक्कू, जांभूळ, चिंच, पेरू इत्यादी देशी फळझाडांचे वाटप करून लागवड करण्यात आली. 3× 3 फूट खड्डा घेऊन शेण खत टाकून झाड मोठे होई पर्यंतच्या प्लॅनसह लावण्यात आली. म्हसा गावातील जिल्हा परिषद शाळेच्या आवारात तसेच गावातील अनेक ठिकाणी यावेळी वृक्षारोपण करण्यात आले.
यामध्ये इको फ्रेंडली लाईफ प्रतिनिधी व ग्रामस्थांसह म्हसा गावच्या संरपंच देखील सहभागी झाल्या होत्या. इको फ्रेन्डली लाईफचे प्रमुख पर्यावरण तज्ञ सर अशोक एन.जे. संपूर्ण भारतभर वृक्षलागवड व्हावी याकरिता सातत्याने प्रयत्नशील आहेत. त्यांच्या या उपक्रमाला प्रतिसाद देत मुंबईतून प्रणाली सेवाभावी महिला असोसिएशन या संस्थेच्या अध्यक्षा गौतमी जाधव यांनी विशेष बस करून म्हसा या गावी महिलामंडळासह वृक्षारोपण कार्यक्रमात सहभाग घेतला. एक व्यक्ती, एक झाड, प्रत्येक वर्षी प्रत्येक ठिकाणी, एक गाव 1000 फळझाडे लाव. असा नारा देऊन, एक व्यक्ती एकच झाड नव्हे, तर एकच्या ऐवजी पाच झाडे, प्रत्येक व्यक्तीने लावून, त्यांना जगवायला हवं. त्यासाठी चार वर्षाच्या प्रत्यक्ष कृती कार्यक्रमात सहभागी होण्याचे जाहीर आवाहन सर अशोक एन.जे. यांनी केले आहे.
0 टिप्पण्या