Top Post Ad

समृद्धी मार्गावर भीषण अपघात! 7 जणांचा जागीच मृत्यू!! 4 गंभीर..


मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर दोन कारमध्ये झालेल्या भीषण अपघातात सात जणांचा जागीच मृत्यू झाला, तर चार जण गंभीर जखमी झाले. जखमींना तातडीने प्रथम जालन्याच्या जिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढे छत्रपती संभाजीनगरला हलवण्यात आले. सातही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी येथे आणण्यात आले आहेत.  ही दुर्घटना जालन्याजवळील कडवंची गावानजीकच्या चॅनल क्रमांक ३५१ वर मध्यरात्री घडली. मृतांची पूर्ण नावे पटवण्याचे काम सुरू आहे.स्विफ्ट डिझायर कार (क्र. एमएच.१२. एमएफ. १८५६) डिझेल भरल्यानंतर निघाली होती. तर ईर्टीका कार (क्र. एमएच. ४७. बीपी .५४७८) नागपूरहून मुंबईकडे निघाली होती. अपघाताची माहिती मिळताच समृद्धी महामार्ग पोलीस आणि तालुका जालना पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत क्रेनच्या साह्याने बचाव कार्य करत दोन्ही कार समृद्धी महामार्गाच्या बाजूला घेऊन रस्ता वाहतुकीसाठी खुला केला.

दोन्ही कारमधील १०/१२ प्रवासी जखमी झाले असून त्यापैकी ४ प्रवाशांना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.   त्यातील ३ रुग्णांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले आहे., तर एकावर जालना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेतील मृतदेह रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयातील वैद्यकीय डॉ. उमेश जाधव यांनी दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com