ठाणे रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफार्म क्रमांक पाच आणि सहाची रुंदी वाढवण्यात येणार आहे. यासाठी मध्य रेल्वेने ६३ तासांच्या मेगाब्लॉकची घोषणा बुधवारी केली. या विशेष ब्लॉक दरम्यान प्लॅटफॉर्मच रुंदीकरण तसेच फलाटाची लांबी वाढवली जाणार आहे. या दोन्ही मेगाब्लॉकमुळे मध्य रेल्वे मार्गावरील ९५६ लोकल फेऱ्या आणि ७२ मेल गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. याची प्रवाशांनी नोंद घ्यावी. ठाणे रेल्वे स्थानकावर डाऊन फास्ट मार्गावर ६३ तासांचा विशेष मेगाब्लॉक असेल. ३०/३१ मेच्या मध्यरात्री १२.३० पासून २ जून दुपारी ३.३० पर्यंत हा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. तसेच सीएसएमटी स्थानकात २४ डब्यांचा रेल्वे गाड्यांसाठी प्लॅटफॉर्म क्रमांक १० -११ च्या विस्तारीकरासंदर्भात प्री नॉन- इंटरलॉकिंग काम पूर्ण करण्यासाठी आधीच ३६ तासांचा मेगाब्लॉकची घोषणा करण्यात आली होती. त्याच तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकातील ३६ तासांचा ब्लॉक ३१/१ मेच्या मध्यरात्री १२.३० वाजता सुरू होणार आहे. जो २ जुन दुपारी १२.३० वाजेपर्यंत असणार आहे. या मेगाब्लॉक दरम्यान ९३० लोकल सेवा रद्द करण्यात आल्या आहेत.
मेगाब्लॉक कालावधीमध्ये म्हणजे, शुक्रवारी १६१ लोकलसेवा, शनिवारी ५३४ लोकलसेवा आणि रविवारी २३५ लोकलसेवा रद्द करण्यात आल्या आहेत. तर ४४४ लोकल गाड्या शॉर्ट टर्मिनेट केल्या जाणार तर ४४६ गाड्या शॉर्ट ओरिजिनेट केल्या जाणार आहेत. ठाणे रेल्वे स्थानकावर ६३ तासांचा मेगाब्लॉक तर सीएसएमटी रेल्वे स्थानकावर ३६ तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या मेगाब्लॉक कालावधीमध्ये ९३० लोकल फेऱ्या आणि ७२ मेल गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. या विशेष मेगाब्लॉक दरम्यान कर्मचाऱ्यांना वर्कफ्रॉम होमची सुविधा उपलब्ध करून देण्याचे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे. विशेष मेगाब्लॉक दरम्यान रेल्वे प्रवाशांनी प्रवास करणे टाळणे. तसंच अत्यावश्यक असल्यास प्रवास करावे असे आवाहन प्रवाशांना केले आहे.
0 टिप्पण्या