Top Post Ad

ठाणे महानगर पालिकेत आणखी एक घोटाळा....बोगस कुष्ठरोगी दाखवून कोट्यवधीची लूट

 

स्मार्ट सिटीच्या नावाखाली अनेक पुरस्कार घेणाऱ्या ठाणे महानगर पालिकेमध्ये "कुष्ठरूग्ण" घोटाळा झाला असल्याचे उघडकीस आले आहे. ठाणे पूर्वेकडे असलेल्या कोपरी विभागात फक्त 100 ते 150 कुष्ठरूग्ण असताना सुमारे 710 जणांना ठाणे महानगर पालिकेकडून प्रत्येकी 24 हजार रूपयांचा निधी वाटप केला आहे. या अतिरिक्त लाभार्थ्यांमध्ये सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या कुटुंबियांची नावे असल्याचा प्रकार सामाजिक कार्यकर्ते तथा माहिती अधिकार कार्यकर्ता अजय जेया यांनी उघडकीस आणला आहे. 

ठाणे पूर्वेकडील कोपरी येथील गांधीनगर ही वसाहत आहे. या वसाहतीमध्ये राहणाऱ्या कुष्ठरुग्णांना दरवर्षी ठाणे महानगरपालिका प्रशासनाकडून, प्रत्येकी 24 हजार रुपयांची मदत केली जाते. मात्र, धक्कादायक बाब म्हणजे, या भागात शंभर ते सव्वाशे कुष्ठरूग्ण असताना ७१० कुष्ठरुग्णांची नावे लाभार्थी म्हणून यादीत समाविष्ट केली आहेत. साधारणपणे 350 जणांचे बोगस प्रमाणपत्रे बनवून, त्यांच्या नावाखाली लाखो रुपये लाटल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या कुष्ठरोग निधीच्या नावाखाली, गेल्या अनेक वर्षांपासून ही लूट सुरु आहे.

नौपाडा कोपरी प्रभाग समितीत काम करणारे अधिकारी अकबर शेख , नरेश म्हस्के यांच्या सूचनेनुसार, कुष्ठरोग निधी मिळण्याबाबतचे अर्ज लाभार्थ्यांना वितरित करतो, त्यानंतर याच परिसरात वास्तव्यास असणारा आणि जिल्हा शासकीय रुग्णालयात (सिव्हील हॉस्पिटल) कर्मचारी असणारी ॲलेक्स फर्नांडिस ही व्यक्ती यादीतील सर्व लाभार्थ्यांचे बोगस प्रमाणपत्र बनवते. त्याबाबतचा मोबदला तो रोख पैशाच्या स्वरुपात घेतो. त्यानंतर सर्व कागदपत्रांची पूर्तता झाल्यावर, ७१० लाभार्थ्यांपैकी अवघ्या १०० ते १५० कुष्ठरुग्णांना 24हजार रुपये दिले जात असल्याचे माहिती अधिकार कार्यकर्ता अजेय जेया यांनी स्पष्ट केले. 

यामागील खरे सूत्रधार ठाणे शहराचे माजी महापौर आणि ठाणे लोकसभेचे विद्यमान उमेदवार नरेश म्हस्के हेच असल्याचा थेट आरोप असून या कामी शिंदे गटाचे शाखाप्रमुख, उप-शाखाप्रमुख व महिला कार्यकर्त्यांचाही सहभाग आहे. याप्रकरणी शासनाचे कुष्ठरोग विभाग, ठाणे महानगरपालिका प्रशासन आणि ठाणे पोलीस आयुक्तांकडे लेखी तक्रार करण्यात आली असून, या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करुन, कुष्ठरोग निधी घोटाळ्यामागील मुख्य सूत्रधारांवर  कठोर, कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे, अशी आग्रही मागणी आपण केली आहे. - अजेय जेया (माहिती अधिकार कार्यकर्ता)

https://www.facebook.com/share/v/8TNECpE36ctrqw5B/?mibextid=xfxF2i

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com