महाराष्ट्र राज्यात आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वाधिक विक्रमी परदेशी गुंतवणूक आणणारा असा अधिकारी होणे नाही
# आपल्या हातात झाडू घेऊन विहार स्वच्छ करणारा असा अधिकारी होणे नाही
# गरजू व होतकरू मुलांतील काहिंना दत्तक घेऊन त्यांच्या शिक्षणाचा खर्च स्वत: उचलणारा तर काहिंना शिक्षणासाठी परदेशात पाठवणारा
असा अधिकारी होणे नाही
# भिक्खु संघासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण केंद्र असावं म्हणून आपल्या पत्नीच्या अर्थसहाय्याने ते बांधून ते समाजाला अर्पण करणारा असा अधिकारी होणे नाही
# आपल्या सोबत धम्माच्या चळवळीत काम करणाऱ्या मुलामुलींना घम्माचे चांगले ज्ञान मिळावे यासाठी १२ मुलामुलींना परदेशात पाठवणारा असा अधिकारी होणे नाही
#बाबासाहेबांची शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती (१२५ वी ) भव्यदिव्य झाली पाहिजे यासाठी वर्षभर संपुर्ण मुंबईतील गोरगरीब वस्त्यांमध्ये जाऊन २००० मुलामुलींना सोबत घेऊन बांद्रा येथे दिमाखदार सोहळ्यात लाखोंच्या उपस्थितीत जगभरातील सुप्रसिध्द मान्यवर व भारतातील १२५ पेक्षा अधिक आयएएस आयपीएस आयआरएस आयएफएस जेष्ठ सनदी अधिकाऱ्यांना एकत्र आणून धुमधडाक्यात जयंती साजरा करणारा असा अधिकारी होणे नाही
#बाबासाहेबांच्या प्रत्येक महापरिनिर्वाण दिनी ६ डिसेंबरला शास्रीय संगितातील सर्वोच्च दर्जाच्या जागतिक प्रतिभावंतांना एकत्र आणून भिमांजली सारखा दर्जेदार आदरांजलीचा कार्यक्रम देणारा असा अधिकारी होणे नाही
# कल्याणच्या बुद्धभुमी फाऊंडेशन येथिल २२ एकर जागेत ४ सत्रात दोन दिवस लाखोंच्या उपस्थितीत दहापेक्षा अधिक देशांतील १०० हुन अधिक भिक्खु संघाला सन्माने आमंत्रीत करून धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा मंगलमय सोहळा घेणारा असा अधिकारी होणे नाही
# कोरोनाच्या महाभयंकर साथीतही अविरत काम करून १०,००० कुटुबांना महिनाभराचा शिधा नम्रपणे दान करणारा असा अधिकारी होणे नाही
# कोरोनाच्या महाभयंकर साथीत शेकडो ॲाक्सिजन व्हेंटीलेटर दान करणारा व ५० ॲम्ब्युलन्स अर्पण करणारा असा अधिकारी होणे नाही
# कित्येक गरजू रूग्णांनांचे प्राण वाचवणारा , कित्येकांना जिवनावश्यक औषधे मोफत देणारा
असा अधिकारी होणे नाही
# विदर्भ मराठवाड्यात समतापर्वच्या माध्यमातून कित्येक जातीधर्माच्या अनुयांना एकत्र आणून फुले-शिवाजी महाराज शाहू महाराज -डॅा बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती करणारा असा अधिकारी होणे नाही
# औरंगाबादच्या मिलिंद कॅालेजच्या विस्तिर्ण प्रांगणात लाखोंच्या अनुयायींसाठी जागतिक धम्मगुरू दलाई लामांसह शेकडो भिक्खु संघासह महाप्रचंड धम्म मेळावा घेणारा असा अधिकारी होणे नाही
#टायकोटसुट अश्या आधुनिक पोषाखात राहुनही विहारात मात्र सर्व सामांन्यासारखा जमिनीवर बसणारा असा अधिकारी होणे नाही
# आपल्या आईवडीलांवर भाऊबहिणीवर जितके प्रेम करतात त्याच प्रेमाने आपल्या सोबतच्या सहकाऱ्यांची मुलामुलींची काळजी घेणारा असा अधिकारी होणे नाही
#सामाजिक तसेच धम्म क्षेत्रात व बाबासाहेबांच्या चळवळीत भरभरून योगदान करतांना आपल्या प्रशासकिय कामातही नेहेमीच अव्वल A + दर्जाचे काम करणारा व प्रशासनाचा गोरगरिब पिडीत कामगार व महिला यांना जास्तित जास्त कसा लाभ होईन हे पाहणारा , असा अधिकारी होणे नाही
# जवळपास दहा हजार तरूणतरूणींनी उद्योग क्षेत्रात यावे म्हणून त्यांच्यासाठी मोफत प्रशिक्षण शिबिर सरकारच्या पैशाने घेणारा व उद्योग धोरणात महिलांना व एसटी एससींना आरक्षण देणारे धोरण आणणारा असा अधिकारी होणे नाही.
#मुंबईत वरळी येथिल झांबोरी मैदानात बाबासाहेबांची भव्यदिव्य जयंतीची सुरूवात करणारा असा अधिकारी होणे नाही
#बुध्द पौर्णिमाही बाबाबसाहेबांच्या जयंती इतकीच भव्यदिव्य व्हावी म्हणून मेहनत घेणारा असा अधिकारी होणे नाही
खरंतर एखादा ग्रंथ होईन एवढे आभाळाइतके काम साहेब तुम्ही आजवर केले आहे. हे फक्त आम्हाला माहित झालेले हिमनगाचे टोक असावे ! इतकेच इथे जागेअभावी लिहीले आहे. अजूनही खूप काम तुमच्या हातून होणार आहे. आजच्या या तुमच्या वाढदिवसाच्या मंगल दिनी आपल्याला शुभेच्छा देतो व येथेच थांबतो
- डॅा विजय कदम.
0 टिप्पण्या