Top Post Ad

अखेर दादलानी पार्क, बाळकूम येथील आरक्षित भूखंडावरील बांधकामावर कारवाई


 ठाणे महापालिकेच्या हद्दीत मोकळ्या जागा बळकावण्याचा प्रकार दिवसेंदिवस वाढतच आहे. ठामपा अधिकारी आणि भूमाफिया यांच्या अर्थपूर्ण मैत्रीमुळे ठाण्यात मोकळ्या जागा दिसेनास्या झाल्या आहेत. त्याचप्रकारे दादलानी पार्क, बाळकूम येथील आरक्षित भूखंड बळकावण्याचा प्रयत्न भूमाफियांनी केला होता. याबाबत प्रजासत्ताक जनता वर्तमानपत्राच्या माध्यमातून ठाणे महानगर पालिकेला सातत्याने कळवण्यात आले मात्र याकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष केले जात होते. अखेर  ठामपाचे माजिवडा प्रभाग समितीचे सहा.आयुक्त प्रितम पाटील यांनी या प्रकाराची दखल घेत सदर बांधकाम जमिनदोस्त केले. या भूखंडावर चाळीचे बांधकाम करण्यात आले होते. याबाबत प्रजासत्ताक जनताच्या माध्यमातून पत्राद्वारे महानगर पालिकेला कळवण्यात आले होते. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com