Top Post Ad

यासाठी महाराष्ट्राचे खच्चीकरन


 2014 साली मोदी भाजपा सरकार सत्तेत आले.. महाराष्ट्राच्या जनतेने मोदींना भरघोस मताने निवडून दिले.. परंतु, गुजराती मोदी शहानी सत्तेत आल्या वर हळू हळू महाराष्ट्राची लचके तोड करायला सुरूवात केली.. मोदी सरकारच्या काळात महाराष्ट्रातील तब्बल १६ पेक्षा जास्त प्रकल्प गुजरातमध्ये नेण्यात आले आहेत.

१. आंतराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र (IFSC). मोदी सरकार सत्तेत आल्यावर महाराष्ट्रावर सगळ्यात पहिला घाला घालण्यात आला तो म्हणजे, आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र म्हणजेच IFSC हा केंद्र सरकारचा मुंबईत प्रस्तावित असलेला प्रकल्प गुजरात ला नेण्यात आला.. एक लाख पंचवीस हजार कोटीचा हा अतिभव्य प्रकल्प ज्या मुळे महाराष्ट्रात साधारण पाच लाख रोजगार निर्माण होणार होता..मुंबई हे एक आंतरराष्ट्रीय बंदर आहे.. आपल्या देशाची आर्थिक राजधानी असल्यानं काँग्रेस सरकारच्या काळात हे आंतरराष्ट्रिय वित्त केंद्र मुंबईत होणार असं ठरलं होतं. महाराष्ट्र सरकारनं यासाठी बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये एक भूखंड राखून ठेवला होता. पण मोदी सरकारने हे केंद्र गुजरातला नेल.. आणि महाराष्ट्राच्या तरुणांच्या तोंडातील घास काढून घेतला.. इतकच नाही तर जखमेवर मीठ चोळत महाराष्ट्रात ज्या बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स मध्ये हे केंद्र होणार होतं तिथे त्या हजारो कोटींच्या बहुमूल्य जागेवर बुलेट ट्रेन च स्टेशन करण्यात आले.. म्हणजे महाराष्ट्राचे आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र तर गेलंच आणि वर हजारो कोटींची जागा सुद्धा गेली.. (या बुलेट ट्रेन चा महाराष्ट्राला काहीही फायदा नाही.. मुंबईतून माणसं गुजरातला नेण्यासाठी ही तोट्यातील बुलेट ट्रेन आणली असून त्याचा बहुतांश बोजा हा महाराष्ट्र सरकारवर टाकण्यात आलेला आहे.)

२. वेदांता फॅाक्सकॅान - महाराष्ट्रात येऊ घातलेला वेदांत-फॉक्सकॉन हा १ लाख ५४ हजार कोटींचा अतिभव्य प्रकल्प गुजरातला नेण्यात आला आहे. या प्रकल्पातून १ लाख पेक्षा जास्त नोकऱ्या उपलब्ध होणार होत्या. सेमीकंडक्टर निर्मितीचा(vedanta semiconductor) हा प्रकल्प उभा करण्यासाठी पुणे जिल्ह्यातील तळेगाव इथली जागाही कंपनीने निश्चित केली होती. परंतु वेदांत समूहाचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांची मोदींनी भेट घेतली आणि मोदींनी स्वतःच हा प्रकल्प गुजरात मध्ये आल्याचे ट्विट करून जाहीर केले.. अशा प्रकारे मोदी स्वतः गुजरात साठी वरतून केंद्रातून फिल्डींग लावतात..   गुजराती मोदी पंतप्रधान असल्याचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसलेला आहे..महाराष्ट्रात या बाबत आरडा ओरडा झाल्यावर मोदींनी वेदांता फॉक्सकॉन' प्रकल्पापेक्षाही मोठा प्रकल्प महाराष्ट्राला देऊ अशी बोळवण केली होती.. प्रत्यक्षात मात्र काहीही दिले नाही..

३. टाटा एअरबस-  भारतीय हवाई दलासाठी सी - 295 जातीची मालवाहू विमाने उत्पादित करणारा 22 हजार कोटींचा  टाटा एअरबस हा भव्य प्रकल्प नागपूरमधील मिहान परिसरात होणार होता, परंतु आता तो  गुजरात बडोदा येथे नेण्यात आला आहे..

४. बल्क ड्रग पार्क औषधनिर्मिती कंपन्यांची गुंतवणूक आणण्यासाठी 'बल्क ड्रग पार्क' योजना साठी रायगड जिल्ह्यातली जागा प्रस्तावित करण्यात आली होती. परंतु, हे ड्रग पार्क्स आता गुजरात ला देण्यात आले आहे. ड्रग्स पार्क साठी केंद्र सरकार राज्याला 1हजार कोटी रूपयांचे अनुदान देणार होते.

५. नॅशनल मरीन पोलिस अकॅडेमी आणि नॅशनल सिक्युरिटी गार्ड्स (NSG)-   NSG आणि नॅशनल मरीन पोलिस अकॅडेमी हा प्रकल्प मुंबईजवळ पालघर इथं प्रस्तावित केला गेला होता. सरकारनं तिथं त्यासाठी 305 एकर जागा अधिग्रहितही केली होती. पण केंद्रात सत्तांतर झाल्यानंतर या दोन्ही संस्था गुजरातला नेण्याचा निर्णय घेतला गेला.

६. मुंबई चा हिरे बाजार मुंबईच्या वांद्रे कुर्ला कॉम्पेक्समधील भारत डायमंड बोर्स हे जागतिक दर्जाचं मोठं डायमंड कॉम्प्लेक्स आहे. यामध्ये 2,500 कार्यालये आहेत. 2 लाख स्क्वेअर फूट इतकी जागा आहे. त्याचबरोबर एकावेळी या इमारतीत 40 हजार लोक येऊ शकतात. परंतु, हा हिरे बाजार गुजरातला हलविण्याचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत .

७. टेस्ला प्रकल्प. जगातील सर्वात मोठी इलेक्ट्रिक वाहन उत्पादन कंपनी टेस्ला हिने भारतात आपले ऑफिस पुण्यात  स्थापन केले होते.. ते भारतात आपला उत्पादन प्रकल्प उभारणार आहेत. परंतु हा प्रकल्प सुद्धा आता गजरात ला नेण्यात आला आहे..

८. सिंधुदुर्गमधील पाणबुडी प्रकल्प, आशिया खंडातील पहिला पाणबुडी प्रकल्प सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्लेमधील निवती रॉक या ठिकाणी अरबी समुद्रात प्रस्तावित होता. सिंधुदुर्ग किनाऱ्यावर होणारा पाणबुडी प्रकल्प (Submarine Project) गुजरातला नेण्यात आला आहे..

९. मोदी सरकारने पेटंट, डिझाईन आणि ट्रेडमार्कचं ऑफिस दिल्लीला हलवलं आहे.

१०. मुंबईच्या पोर्ट ट्रस्टमध्ये होत असलेलं शिप रेकिंगचं काम गुजरातमधल्या अलंगला नेण्यात आलं आहे.

११. महाराष्ट्रात केंद्र सरकार द्वारे एक आशिया खंडातील सर्वात मोठा ऑईल रिफायनरी प्रकल्प प्रस्तावित होता.. परंतु मोदी  सरकार द्वारे आता तो रद्द करण्यात आला असून.. त्या प्रकल्पाचे तुकडे करुन तो प्रकल्प महाराष्ट्र बाहेर नेण्याची योजना आहे..

या शिवाय,...वैद्यकीय उपकरण पार्क (Medical Device Park) आणि सौर ऊर्जा उपकरणे पार्क (Solar Energy Equipment Park) हे दोन प्रकल्प, रेल्वेचा प्रकल्प, संरक्षण खात्याचेही दोन प्रकल्प, दीपक फर्टिलायझर, दीपक नायट्रेट, गॅलक्सी, केलॉग्ज, नूर फूड्स, व्हीव्हीएफ, उल्का सीफूड्स यासारख्या खाजगी कंपन्यांचे नवीन विस्तार प्रकल्प गुजरातला नेण्यात आले आहेत..असे १६ पेक्षा जास्त प्रकल्प मोदी भाजपा सरकारच्या काळात गुजरातमध्ये नेले गेले आहेत. हे सगळे प्रकल्प साम दाम दंड भेद वापरून जबरदस्तीने खेचून नेण्यात आले आहेत, गुजरातसाठी मोदी भाजपा केंद्र सरकारची ही वाटमारी सुरू आहे. 

केवळ प्रकल्पच नाही तर, मुंबई मध्ये होणारा क्रिकेट वर्ल्ड कप चा अंतिम सामना सुद्धा गुजरात ला नेण्यात आला.. २०१४ पूर्वी महाराष्ट्र हे भारतातील सर्व क्षेत्रात नंबर एक वर असलेले राज्य होते.. शेती, सहकार, उद्योग, पायाभूत विकास, परकीय गुंतवणूक या सर्वच क्षेत्रात महाराष्ट्र देशात अग्रेसर राज्य होते..परदेशी गुंतवणुकीचं अग्रेसर डेस्टिनेशन अशी महाराष्ट्राची ओळख कायम राहिली आहे, मग तसं असूनही मोदी भाजपा सरकारच्या काळात महाराष्ट्रापेक्षा गुजरातला झुकतं माप दिलं गेलं आहे..  मुंबई आणि महाराष्ट्र बद्दलचा गुजराती लोकांचा आकस अगदी या दोन राज्यांच्या निर्मितीपासून आहे..  देशातून मुंबईचं आणि महाराष्ट्राचं महत्त्व कमी करण्याच्या योजना गुजराती नेत्यांकडून नेहमीच आखल्या जात असतात..दुर्दैवाने या वेळी गुजराती मोदींच्या द्वारे त्या यशस्वी करण्यात आल्या आहेत.. 

या सर्वाचा वाईट परिणाम महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेवर दिसून येत आहे.. बेरोजगारी वाढत आहे..महाराष्ट्रात अर्थव्यवस्थेमध्ये उद्योगक्षेत्राचं जे कॉन्ट्रिब्यूशन आहे ते कमी कमी होतांना दिसतं आहे.  2016 मध्ये ते 30 टक्क्यांपर्यंत होतं. ते आता घटून 26 टक्के, म्हणजे 4 टक्के कमी झालं आहे. त्याच्या उलट गुजरातमध्ये औद्योगिक क्षेत्राचं योगदान वाढत आहे.. आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईचं आणि महाराष्ट्राचं महत्त्व कमी करण्यासाठी इथले प्रकल्प गुजरातला नेले जातात,  मोदी पंतप्रधान झाल्यावर हे असे वारंवार होऊ लागले आहे. केंद्र सरकारकडून महाराष्ट्रापेक्षा मोदींच्या गुजरातला झुकतं माप दिलं जातं आहे.. गुजराती मोदी पंतप्रधान झाल्याचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसला आहे..

या बाबत, देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आले तेव्हा ते म्हणाले की, "गुजरात राज्य काही पाकिस्तान मध्ये नाही.." मग प्रश्न असा उपस्थित होतो की, महाराष्ट्र पाकिस्तानात आहे का?महाराष्ट्र काय भारतात नाही का?  आपण महाराष्ट्राचे हित जपले पाहिजे की, गुजरातचे हित जपले पाहिजे?? महाराष्ट्रातील आमचे नेते देवेंद्र फडणवीस 80 तासांसाठी मुख्यमंत्री झाले होते, त्यानंतर त्यांनी राजीनामा दिला. त्यांनी हा ड्रामा कशासाठी केला, माहिती आहे का? कारण केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला 40 हजार कोटी रुपये मिळाले होते. त्यामुळे हा ड्रामा करण्याचं ठरलं होतं. त्यामुळे फडणवीस मुख्यमंत्री झाले आणि अवघ्या 15 तासांत त्यांनी महाराष्ट्राचे 40 हजार कोटी केंद्र सरकारकडे परत पाठवले," असं भाजपा चे मंत्री अनंत हेगडे यांनी सांगितलं आहे.

आज मोदी भाजपा द्वारे राजकीय व्यभिचार करून महाराष्ट्र राजकीयदृष्ट्या अस्थिर करण्यात आलेला आहे..आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उप मुख्य मंत्री हे दिल्लीत हुजरेगिरी करायला जात असतात.. महाराष्ट्राचा स्वाभिमान ठेचला जात आहे.., मोदी भाजपा द्वारे महाराष्ट्राची सुसंस्कृत असलेली राजकीय संस्कृती जाणीवपूर्वक खराब करण्यात आली आहे.. अंध भक्तांना मोदी शहा घाण पा_ले तरी सुगंध दरवळत आहे असे वाटते.. कारण, आयटी सेल ने त्यांचा मेंदू सडवलेला आहे.. त्यामुळं त्यांची बुध्दीचा वापर करण्याची आणि विचार करण्याची क्षमता संपलेली आहे..तेव्हा त्यांच्याकडून काहीही अपेक्षा नाही.. पण, सामान्य मराठी माणसाची बुध्दी अजूनहि शाबूत आहे.. त्यांनी महाराष्ट्राच्या लचके तोडिला विरोध दर्शवणे आवश्यक आहे.. गुजराती मोदी शहा हे पुन्हा सत्तेत आले तर महाराष्ट्राच्या या लचके तोडिला मान्यता दिल्या सारखे होईल.. गुजराती मोदी शहा द्वारे महाराष्ट्राच्या करण्यात येत असलेल्या लचके तोडीला विरोध करण्याची संधी सध्या आपल्याला निवडणुकीच्या, मतदानाच्या माध्यमातून आलेली आहे.. पुन्हा गुजराती मोदी सत्तेत आले तर महाराष्ट्राची वाताहत कोणीही रोखू शकणार नाही.. आज आपल्या मराठी मुलांच्या तोंडाचा घास काढून घेतला जात आहे.. महाराष्ट्राची लचके तोड होत असताना तुम्ही काय करत होता? असा प्रश्न जेव्हा आपली मुल..बाळ विचारतील तेव्हा  आपण त्यांना काय उत्तर देणार आहोत?

  • चंद्रभान आझाद,  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com