Top Post Ad

महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी गद्दारांना गाडण्याचे काम या निवडणुकीतून करायचे आहे


 

लोकसभा निवडणूक ही केवळ भाजपा विरुद्ध काँग्रेस अशी नसून यावेळची लढाई संविधानासाठी, लोकशाहीसाठी, देशाची एकता, अखंडता जपण्यासाठी आहे. महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी गद्दारांना गाडण्याचे आणि देशाला वाचवण्याचे काम लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून करायचे आहे. इंडिया आघाडी देशभरात भक्कम असून १० वर्षांच्या तानाशाही सरकारचे शेवटचे ३० दिवस राहिले आहेत. लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीचाच विजय होणार असा विश्वास उत्तर मध्य मुंबईच्या उमेदवार व मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष प्रा. वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केला आहे.

भाजपाचा ‘अब की बार ४०० पार’चा नारा हा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान बदलण्यासाठी आहे हे विरोधी पक्ष सातत्याने सांगत असताना काँग्रेसच संविधान बदलणार असा उलटा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपा नेते करत आहेत. पण भाजपाच्या जे पोटात आहे ते पुन्हा एकदा ओठावर आले आहे. भाजपाचे सरचिटणीस दुष्यंत गौतम यांनीच संविधानाच्या प्रस्तावनेतील धर्मनिरपेक्ष शब्द काढणार असल्याचे सांगून भाजपाचा कुटील डाव उघड केला. नरेंद्र मोदी व अमित शाह यांनी आतातरी खोटे आरोप करणे बंद करावे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला हात घालण्याचा भाजपाचा मनसुबा जनताच हाणून पाडणार आहे असेही गायकवाड म्हणाल्या.

प्रा. वर्षा गायकवाड यांनी प्रचारात आघाडी घेतली असून घरोघरी जाऊन लोकांशी संपर्क साधण्यावर त्यांनी भर दिला आहे. इंडिया आघाडीच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधत प्रचाराने वेग घेतला आहे. आज कुर्ला विधानसभा मतदार संघातील शिवाजी मैदान नेहरुनगर येथे मार्निंग वॉक व स्थानिकांशी चर्चा केली. संध्याकाळी कुर्ला पूर्व भागातील श्रमजीवी नगर ते जागृती नगर पदयात्रा काढली. या पत्रयात्रेला जनतेचा चांगला प्रतिसाद मिळाला. कलिना विधानसभा मतदार संघातील विद्यानगरी सांताक्रुज पूर्व येथे महिला व सामाजिक संस्था यांच्या बरोबर बैठक घेतली. या बैठकीला अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या प्रवक्त्या सुप्रीया श्रीनेत यांची प्रमुख उपस्थिती होती. चांदिवली विधानसभा मतदारसंघातील शिवसेना शाखांनाही भेटी दिल्या. कलीना येथे इंडिया- महाविकास आघाडीचे मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदार संघाच्या मध्यवर्ती निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी माजी मंत्री अस्लम शेख, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार मिलिंद कांबळे, शिवसेना विभाग प्रमुख महेश पेडणेकर आदी नेते उपस्थित होते. अशी माहिती मुंबई काँग्रेसप्रवक्ते आणि मिडिया समन्वयक, सुरेशचंद्र राजहंस यांनी दिली 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com