Top Post Ad

अवघ्या दोन महिन्यातच कोस्टल रोडच्या बोगद्याला गळती...श्रेयासाठी धडपड

 कोस्टल रोड हा मुंबई महापालिकेचाअतिमहत्वकांशी प्रकल्प आहे.  मुंबई महापालिकेने तब्बल 14 हजार कोटी रूपये खर्चून कोस्टल रोड बांधला. मात्र दोन दिवसांपूर्वी कोस्टल रोडला कनेक्ट असलेल्या भुयारी मार्गात अर्थात अंडरपासमध्ये लाटांचे पाणी शिरले होते. यामुळे हा भुयारी मार्ग बंद ठेवण्यात आला होता. यानंतर आता  कोस्टल रोडला  मरिन ड्राईव्हच्या एक्झिट रॅम्पवर या भेगा पडल्या आहेत. यामुळे कोस्टल रोडच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. तसेच पावसाळ्यात कोस्टल रोडची स्थिती काय होईल असा प्रश्न वाहनचालकांनी उपस्थित केला आहे.  

कोस्टल रोडला गळती लागल्याचा हा व्हिडीओ सध्या समोर आला असून तो व्हायरल होत आहे. कोस्टल रोडचा मरीन ड्राईव्ह ते वरळी हा मार्ग मुंबईकरांच्या सेवेत आला खरा. पण अवघ्या काही दिवसांमध्येच त्याची दुरावस्था झाली आहे. मुंबईत पावसाळ्याला अद्याप सुरूवात नाही. तरी कोस्टल रोडच्या टनेलमध्ये गळती होत असल्याने यांच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. हा रस्ता वाहतुकीसाठी सुरक्षित आहे का? असाही सवाल उपस्थित केला जात आहे. उद्या मान्सून पूर्व आढावा बैठक होणार आहे. या बैठकीत हा सवाल उपस्थित होणार असल्याची माहीती आहे.

  11 मार्च 2024ला प्रचंड गाजावाजा करत कोस्टल रोड सुरू करण्यात आला. श्रेयवादाकरिता अनेकांमध्ये जुंपलेली लढाई अवघ्या महाराष्ट्राने बघितली. उद्घाटनानंतर 2 महिन्यांच्या आत याची दुर्दशा झाल्याने शिवसेनेने सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. लोकसभा निवडणूकीच्या तोंडावर मताच्या जोगव्यासाठी घाईघाईने या रोडचं उद्घाटन कऱण्यात आले. मात्र त्याची कुठलीच प्री मान्सून चाचणी झाली नसल्याची माहीती समोर येतेय. एवढच नाही तर  या प्रकल्पाला ना कंम्प्लायन्स सर्टीफिकेट मिळालय, ना सीसी. फक्त निवडणूका डोळ्यासमोर ठेवूण लोकांच्या जीवाशी खेळ केल्याचा आरोप आमदार सचिन अहिर यांनी केलाय.

पावसाळा अजून सुरू ही झाला नाही आणि कोस्टल रोडच्या बोगद्यात गळती लागली असून मोठ्या प्रमाणात पाणी झिरपू लागले आहे. पावसात काय होईल कुणास ठाऊक?  आधी अतिशय मंद गतीनं कामं करायची, कामाचा खर्च वाढवायचा आणि नंतर निवडणुका तोंडावर आल्या की कामांचं श्रेय लाटण्यासाठी घाईगडबडीनं अर्धवट झालेल्या प्रकल्पाचे उद्घाटन करायचं - जनतेशी केलेल्या या चेष्टेचं उत्तर शिंदे-फडणवीस सरकारला द्यावंच लागेल. आज मुख्यमंत्र्यांना या गळतीबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला असता, ते तांत्रिक कारणं पुढे करू लागले. मुख्यमंत्री महोदय, आपली ही सारवासारव, सबबी आम्ही चालू देणार नाही. अवघ्या दोन महिन्यांपूर्वी उद्घाटन झालेल्या करोडो रुपयांच्या कोस्टल रोडची इतक्या लवकर दुरावस्था कशी काय झाली? हे कसलं कमी दर्जाचं हे काम आहे की, पहिला पावसाळा झेलण्याआधीच ही समस्या येऊन पुढे उभी ठाकली? याचं स्पष्टीकरण शिंदे सरकारला द्यावं लागेलच.  आपल्या सरकारनंच या प्रकल्पाच्या कामात दिरंगाई केली, त्यामुळे प्रकल्पाचा खर्चही वाढला हे खरं नाही का? जनतेचा एवढा पैसा अक्षरशः पाण्यात वाहून गेल्यासारखा आहे. याची जबाबदारी कधी घेणार  खरंतर जनतेच्या पैशानं एखादा प्रकल्प उभारला जात असेल तर, सुरक्षेच्या अनुषंगानं सर्वच बाबींची खबरदारी घेऊन दर्जेदार काम झालं पाहिजे. अशा पद्धतीच्या हलगर्जीपणामुळे जनतेचं जीव धोक्यात येऊ शकते. हे माहीत असूनही काँग्रेसच्या संकल्पनेतून निर्मित कोस्टल रोडचं श्रेय लाटण्यासाठीच अर्धवट अवस्थेतील रस्त्याचं उद्घाटन करण्यात आलं. मुख्यमंत्री महोदय सांगा मग आता.. पुढील टप्पा कधी सुरू होणार? की त्यासाठी सुद्धा निवडणुकीची वाट पाहावी लागेल? बोगद्यात लागलेल्या गळतीसाठी जबाबदारी निश्चित करणार की नाही? जर का प्रकल्पांचा श्रेय लाटण्याची हौस आहे तर, त्या प्रकल्पांत त्रुटी आढळल्यास त्याची सर्वस्व जबाबदारी देखील घ्यायला शिका मुख्यमंत्री महोदय..! - आमदार वर्षाताई गायकवाड

मुंबईच्या सागर किनाऱ्याने दक्षिण-उत्तर दिशेला जोडणारा कोस्टल रोड हा मुंबई महापालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. तब्बल चौदा हजार कोटींचा कोस्टल रोड म्हणजे सागरी महामार्ग हा मुंबईच्या वाहतुक कोंड़ीवर उपाय असल्याचं सांगितलं जातं. मुंबईच्या समुद्रात किनाऱ्यालगत काही ठिकाणी भरावावर, कुठे बोगद्यातून तर कुठे ब्रिजवरून हा रस्ता जाणार आहे. जिथे रस्त्यांची अदलाबदल होते अशा ठिकाणी कनेक्टर जंक्शन उभी केली जाणार आहेत. या प्रकल्पाअंतर्गत 8 मार्गिकांच्या रस्त्याला लागूनच लोकांना चालता येईल असा मार्ग, पार्किंग आणि बागेसाठीही जागा तयार केली जाणार आहे.   वरळी ते मरीन ड्राईव्ह असा 9 किलोमीटरच्या या रोडमुळे मरीन ड्राइव्ह ते वरळी हे अंतर केवळ आठ मिनिटात पार करता येत आहे. या चारपदरी मार्गावर ताशी 80 ते 100 किमी असा स्पीड लिमीट ठेण्यात आला आहे. कोस्टल रोडवर प्रवाशांच्या सुरक्षेसाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. रोडवर एन्ट्री, एक्झीट, बोगद्यासह 24 सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. भुयारी मार्गावर प्रत्येक 100 मीटरवर पब्लिक अॅड्रेस स्पिकर बसवण्यात आलेत. 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com