ठाण्यात एकलव्य विद्यार्थ्यांनी दहावीच्या परिक्षेत मिळालेले यश, राबोडीच्या अल्फिया शेखला ९३% मिळाले आणि ती शाळेत प्रथम आली आहे, श्रुती खवळे या किसन नगर मधल्या मुलीने ८९.४० % मार्क्स मिळवून किसन नगर महानगर पालिकेच्या शाळेत पाहिला नंबर मिळवला आहे. धर्मवीर नगरच्या जया इंगळे हिने ८२ % मार्क्स मिळवून ती महानगर पालिका शाळा क्रं. १८ मधे पहिली आली आहे. सावरकर नगर आदित्यकुमार ठाकूरला ८३% मार्क्स मिळाले आहेत आणि सावरकर नगर महानगर पालिकेच्या शाळेत तो प्रथम आला आहे.
राबोडीच्या हबीबा अन्सारी ला ८२%, अयान अकील शेखला ८०.२% मिळाले आहेत.
किसन नगरच्या सृष्टी दळवीला ७९.४%, वारली पाड्याच्या पूर्वा रहाटवळला ७८.६ %, मानपाड्याच्या प्रतीक्षा लोखंडेला ७७.६%, किसन नगरच्या मिनाक्षी कुऱ्हाडेला ७३.८०%, मानपाड्याच्या संदीप वाडू ला ७३.८ % आणि अनिकेत लोखंडेला ७२ %, कळव्याच्या आकाश कनोजियाला ७२.२%, सावरकर नगरच्या रक्षा कादळगावकरला ७३% आणि तब्बसूम नसीर खान पठाणला ७२% मार्क्स मिळाले आहेत. राबोडीच्या आलिया शेख ला ७९.८%, आशिया पठाणला ७८% मिळाले आहेत. ढोकाळीच्या नीता बिरादरला ७५% आणि भूमिका जाधवला ७६% मिळाले आहेत.
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीशी झगडत ठाणे शहरातील एकलव्य विद्यार्थ्यांनी दहावीच्या परिक्षेत चमकदार कामगिरी करुन हे दाखवून दिले आहे की जिद्दीला सीमा नसते, असे समता विचार प्रसारक संस्थेच्या अध्यक्ष हर्षलता कदम यांनी सांगितले. या विद्यार्थ्यांना संस्थेतर्फे परीक्षेसाठी मार्गदर्शन करण्यात आले होते. त्याचा मुलांना फायदा झाल्याचे शाळेतील शिक्षक, पालक आणि मुलांनी आवर्जून सांगितले. एकलव्यांमधील ३ मुली आणि १ मुलगा त्यांच्या शाळेत प्रथम आले आहेत.
वडील मजुरी, आई घरकाम, पत्राचे छोटेसे घर, दाटीवाटीची वस्ती, बाजुला नाला वाहतोय, घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट, कधी आई वडील गावाला व विद्यार्थी इथे दुसऱ्यांकडे राहून शाळेत जातो, घरचे काम करून शाळेत जाऊन अभ्यास करून असे घवघवीत यश प्राप्त करणाऱ्या एकलव्यांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. त्यांच्या साठी नुसते पास होणे सुद्धा बोर्डात येण्यासारखे कौतुकास्पद आहे. तरीही कितीतरी मुलांना फर्स्ट क्लास मिळाला आहे. आणि वरील विद्यार्थ्यांनी ७५ टक्क्यांपेक्षा जास्त मार्क मिळवले आहेत.
या सर्व एकलव्यांचं समता विचार प्रसारक संस्थेतर्फे जाहीर गौरव करण्यात येणार आहे. ठाणे शहरातील विविध वस्त्यांमधून राहणारे, अत्यंत बिकट आर्थिक परिस्थितीशी दोन हात करत जे विद्यार्थी दहावी पास होतात त्यांचा जाहीर गौरव करून त्यांना पुढच्या शिक्षणासाठी संस्थेकडून मदत केली जाते. अधिक माहितीसाठी संस्थेचे सचिव अजय भोसले, ८१०८९४९१०२ यांच्याशी संपर्क साधावा.
ठाण्यातील जिजाऊ अभ्यासिकेची मुलं हुशार
शहरातील जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेमार्फत सुरू असलेल्या 10 अभ्यासिकांमधील दहावीच्या विद्यार्थ्यांनीही उज्वल यश संपादन केले आहे. यामध्ये येऊरच्या अभ्यासिकेतील 10 विद्यार्थी 60 टक्क्यांवर गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये ठामपा शाळेतील 3 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. तर सावरकरनगर अभ्यासिकेतील 2 विद्यार्थ्यांनही 70 टक्क्यांहून अधिक गुण मिळविले आहेत.
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे अध्यक्ष निलेश सांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे शहरात चालणार्या 10 अभ्यासिकांतील येऊरच्या आदिवासी पट्टयातील विद्यार्थ्यांनी दहावीच्या परिक्षेत उज्वल यश संपादन केले. यामध्ये ठामपा शाळेतील आरती पाटील 69.60% प्रथम, जयश्री वळवी 69% द्वितीय, प्रेम भगत 63.40% तृतीय उत्तीर्ण झाले आहेत तर याच अभ्यासिकेतील राणी कापडी 52%, कल्पेश डागा 60%, वैशाली तुमडा 53%, वेदिका 47%, जागृती फुफाने 42%, आदर्श मोरया या इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्याने 69% गुण मिळविले आहेत तर सावरकर नगर अभ्यासिकेतील स्नेहल गाडे 72.80%, रक्षा कांदळगावकर 73% व सागर दळवी 62.80% गुण मिळवून यशस्वी झाले आहेत.
ठाण्यातील जिजाऊच्या अभ्यासिकेतील विद्यार्थ्यांच्या उज्वल यश संपादन केल्याने ठाणे शहरातील विविध स्तरातून जिजाऊच्या उपक्रमाचे कौतूक होत असून ठाण्यातील अभ्यासिका वाढवून अधिकाधिक गरिब, गरजू अशा सर्वच विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण व शैक्षणिक साहित्य वाटपाचा संकल्प असल्याचे जिजाऊचे संस्थापक अध्यक्ष निलेश सांबरे यांनी सांगितले. ठाण्यातील जिजाऊच्या कोपरी डंपिंग, येउर, सावरकरनगर, कळवा महात्मा फुले नगर, ओवळा या डोंगराळ आणि मागास भागातील अभ्यासिकांमध्ये बीएड दर्जाचे शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवत असून विद्यार्थ्यांच्या अभ्यासात होत असलेली प्रगती पुढील काळात विद्यार्थ्यांचं उज्वल भविष्य घडविण्याचं स्वप्न जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेने उराशी बाळगले असून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच पोलीस भरती, अग्निशमन, मिलिटरी, युपीएससी, एमपीएससी आदी विविध स्पर्धा परिक्षांसाठी जिजाऊच्या कार्यालयात संपर्क साधण्याचे आवाहनही निलेश सांबरे यांनी केले आहे.
ठाण्यातील डॉ.आंबेडकर रोड परिसरात राहणारे आमचे मित्र अश्विन दत्तात्रय कांबळी यांची कन्या अविष्का ही दहावीत ८४ टक्के गुणांनी उत्तीर्ण झाली. त्याबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.
0 टिप्पण्या