मुंबई विभागीय काँग्रेस समिती सहकार सेलच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षातील धारावी तालुका वार्ड क्रमांक १८६ च्या वार्ड अध्यक्षा श्रीम. मनीषा सचिन चौधरी, दक्षिण मध्य मुंबई जिल्हा सचिव शबनम खान, अल्पसंख्यांक सेल पदाधिकारी फराज खान व कार्यकर्त्यांनी आज काँगेस पक्षात वर्षाताईंच्या नेतृत्वावर विश्वास ठेवुन पक्ष प्रवेश केला.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते सचिन सावंत यांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकारी यांना पद वाटप करण्यात आले. यावेळी मा.खासदार हुसेन दलवाई मुंबई काँग्रेस खजिनदार सन्मानीय संदीपजी शुक्ला , मुंबई काँग्रेस मुख्य प्रवक्ते युवराजजी मोहिते सहकार सेल चे आधारस्तंभ सन्मानीय यशवंत (भाई) सावंत , सेलचे कार्याध्यक्ष धनंजय कुवेसकर तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सेलचे सरचिटणीस (प्रशासन प्रमुख) श्रीनिवास देवरुखकर यांनी केले.
0 टिप्पण्या