Top Post Ad

कल्याण वालधुनी नदीपात्रातील पुरग्रस्तांना दिलासा


 सामाजिक व राजकीय कार्यकर्त्यांनी रेटून धरल्याने अखेर पालिकेने यंदाचा पावसाळा संपेपर्यंत  विठ्ठलवाडी रेल्वे स्टेशन समोर वालधुनी नदी पाञात बीओटी तत्वावर सुरु असलेल्या प्रकल्पाच्या नदीलगतच्या बांधकामास तात्पुरती स्थगिती दिली आहे .त्यामुळे या परिसरातील पूरग्रस्त रहिवाशांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे .       विठ्ठलवाडी स्टेशन समोर वालधुनी नदीपाञात माधव कंन्स्ट्रक्शनद्वारे बीओटी तत्वावर प्रकल्प सुरू आहे. या प्रकल्पामुळे भविष्यात प्रभाग क्र.९५, ९६,१०२, १०३ व १०४ या परिसरातील हजारो कुटुंबाना कृञिम पुराचा संभाव्य धोका निर्माण झाला असता. मात्र जेष्ठ समाजसेवक विशाल राजाराम जाधव व भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कल्याण डोंबिवली महानगर महापालिका आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांची १५ मार्च रोजी प्रत्यक्ष भेट घेऊन संबंधित महापालिकेच्या अधिकार्‍यांना पावसाळ्यापुर्वी दोन्ही ब्रीजची रुंदी व उंची वाढविण्या संदर्भात आवश्यक त्या सर्व शासकीय प्रक्रिया तातडीने पुर्ण करण्याच्या सुचना केल्या होत्या. तसेच विभागातील पुरग्रस्त नागरिकांच्या अन्य समस्याही आयुक्तांनी ऐकुन घेवुन त्यावर तातडीने उपाय योजना करण्याचे आश्वासन दिले.तरी या प्रकल्पाचे काम जोरात सुरू असल्याने जनतेमध्ये पालिका प्रशासनाबाबत रोष होता.

बुधवारी विभागातील समाजसेवक विशाल राजाराम जाधव , माजी नगरसेवक निलेश शिंदे, विशाल पावशे, राजाराम पावशे, उदय रसाळ, सतीश जाधव, विजय भोसले यांनी विठ्ठलवाडी रेल्वे स्टेशन समोर वालधुनी नदी पाञात बीओटी तत्वावर सुरु असलेल्या प्रकल्पाला भेट दिली.यावेळी संबधित महापालिका अधिकाऱ्यांशी चर्चा केली. महापालिका अधिकाऱ्यानी यंदाचा पावसाळा संपेपर्यंत सदर प्रकल्पाच्या नदीलगतच्या बांधकामास तात्पुरती स्थगिती देण्याचे आश्वासन दिले. तसेच नदी पाञाच्या भागात मातीचे जे उंच ढिगारे आहेत, ती माती उचलुन घेवुन जाण्याचे काम सुरु करण्यात येणार आहे . जेणेकरुन नदीचे पाञ पाणी विस्तारण्यासाठी पुर्वीप्रमाणेचं मोकळे राहील. नदीमधील गाळ पुर्णपणे काढण्याचे कामही लवकरचं सुरु करण्यात येणार आहे . पावसाळ्यात सदर ब्रीज जवळ कचरा अडकुन पाण्याचा प्रवाह थांबु नये म्हणुन कर्मचारी व जेसीबी मशिन तैनात ठेवण्यात येणार आहेत . अतिवृष्टी वेळी या भागात पुर स्थिती उद्भवु नये म्हणुन मोठ्या पंपाद्वारे नदीतील पाणी रेल्वे ब्रीज पूढे सोडण्याबाबतही अधिकार्‍यांना विनंती करण्यात आली असुन त्यांनीही याबाबत सकारात्मकता दर्शवलेली आहे.पावसाळा संपल्यानंतर तत्काळ वालधुनी नदीवरील जुन्या पुलाच्या ठिकाणी नवीन पुलाचे काम सुरु करण्यात येणार आहे.असे आश्वासन संबधित महापालिका अधिकार्‍यांकडुन देण्यात आलेले आहे.त्यामुळे पूरग्रस्त रहिवाशांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com