Top Post Ad

कामगार दिनानिमित्त सार्वजनिक सुट्टी....


 सतराव्या शतकाच्या मध्यात सुरु झालेल्या औद्योदिक क्रांतीने युरोपमध्ये एका नव्या युगाची सुरुवात केली होती. मात्र या नवीन युगाबरोबरच नव्या समस्याही उदयास आल्या. त्यातील एक समस्या होती कामगरांची. युरोपात औद्योगिक क्रांतीला सुरुवात तर झाली मात्र कामगार वर्गाचे शोषण वाढीस लागले. त्यावेळी कामाचे तास हे आठ दहा नव्हते. तर कामगारांना तब्बल १५ तास काम करावे लागे. त्यातल्या त्यात जनावरासारखं काम करून मोबदलाही मिळत नव्हता. मात्र मजुरांनी याविरोधात आंदोलन पुकारलं. कामगारांच्या या पाऊलाने जगाच्या पाठीवर कामगारांचा नवा इतिहास कोरला गेला. मात्र आजही उद्योगहीन गडचिरोलीसारख्या जिल्ह्यात नव्याने सुरू झालेल्या कंपन्या, उद्योगमालक कामगारांना मनमर्जीने खूप राबवून- शोषण करून घेत रग्गड मुनाफा कमवत आहेत. दररोज १० ते १२ तास कष्टवून घेत आहेत. रविवार जागतिक- सार्वजनिक सुट्टीचा वार असूनही सुट्टी मिळत नाही. कोणीही याबद्दल आवाजही उठवत नाही. कारण कामावरून काढून टाकण्याची धमकी पेरली जात आहे. याचेच मोठे नवल वाटते! विश्वरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर आणि शिक्षणसम्राट महात्मा जोतीबा फुले यांच्या प्रयत्नांना व विचारांना बेमूर्वत पायदळी कुस्करले जात आहे. 

          आजच्या दिवशी अमेरिकेत कामगारांनी ७ तासांचे काम असावे अशी मागणी केली होती. ऑस्ट्रेलियात ही चळवळ पुढे आठ तासांचा दिवस म्हणून ओळखली जाऊ लागली. २१ एप्रिल हा दिवस तेव्हापासून ऑस्ट्रेलियात कामगार दिन म्हणून साजरा केला जातो. मात्र १ मे रोजी ऑस्ट्रेलियात थरारक घटना घडली. युनायटेड स्ट्रेट्समधील कामगारांनी आठ तास काम करण्याचे आवाहन पुकारले. मागण्यांसाठी संप आणि मोर्चे निघाले. मात्र त्यावेळी झालेल्या आंदोलकांना पोलिसांनी ट्रकने हुसकावून लावले. या घटनेने कामगारांतील संताप आणखी वाढला. प्रत्युत्तर म्हणून पोलिसांवर बॉम्बस्फोट करण्यात आले. यात ७ पोलिस आणि ४ नागरिकांचा मृत्यू झाला. याप्रकरणी आठ जणांना अटक होऊन फाशीची शिक्षा सुणावण्यात आली. या घटनेने जगभर संताप व्यक्त झाला. कारण या ८ जणांपैकी कोणीही बॉम्ब फेकले नसल्याचे सांगण्यात येत होते. अशा प्रकारे या रक्तरंजित आंदोलनानंतर १ मे १९८० रोजी कामगार चळवळ यशस्वी झाली. न्याय्य वेतन, चांगली वागणूक, पगारी रजा आणि ८ तास काम या मागण्या मान्य करण्यात आल्या. तेव्हापासून हा दिवस अमेरिकेत कामगार दिन म्हणून साजरा केला जातो. सन १९०४मध्ये एमस्टरडॅम येथे झालेल्या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय संघ परिषदेने जगभरातील कामगार संघटनांना १ मे हा दिवस ८ तासांचा दिवस म्हणून पाळण्याचे आवाहन केले. भारतीय मजदूर किसान पक्षाने दि.१ मे १९२३ रोजी सर्वप्रथम कामगार दिन साजरा केला. त्याच वेळी भारतात प्रथमच कामगार दिनाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी लाल ध्वज वापरण्यात आला.

          १ मे या दिवसाला महाराष्ट्रात खूप महत्त्व आहे, कारण या दिवशी महराष्ट्र राज्याची स्थापना झाली. मात्र एवढंच नाही १ मेला आंतरराष्ट्रीय महत्त्वदेखील आहे. कारण जगभरात हा दिवस आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणून साजरा केला जातो. अठराव्या शतकात झालेल्या एका कामगार चळवळीच्या गौरवासाठी आजही जगभरात साजरा करण्यात येणारा हा एक खास दिवस आहे. भारतात कामगार दिनानिमित्त सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात येते. विशेष म्हणजे जगभरात अनेक देशांमध्ये हा दिन निरनिराळ्या पद्धतीने साजरा केला जातो. कामगार दिन साजरा करण्याची सुरुवात कामगारांच्या हितानिमित्त झालेल्या एका चळवळीतून झाली. १९व्या शतकाच्या मध्यावर कामगारांच्या एका तीव्र चळवळीला सुरूवात झाली. ज्यात कामगारांच्या  हितासाठी काही मागण्या करण्यात आल्या होत्या. पहिली मागणी २१ एप्रिल १८५६ रोजी ऑस्ट्रेलियातील कामगारांनी केली होती. दिवसाचे कामाचे तास ठराविक असावेत यासंदर्भात ही मागणी होती. ऑस्ट्रेलिया पाठोपाठ पुढे मग अमेरिका, कॅनडामधील कामगार संघटनांनी पुढाकार घेत १९८६मध्ये कामगारांच्या  हितासाठी मोर्चे काढण्यास सुरुवात केली. अशाच एका मोर्च्यामध्ये शिकागो मधील सहा आंदोलकांचा मृत्यू झाला. ज्याबद्दल कामगारांनी तीव्र निषेध व्यक्त केला. पोलिसांवर राग व्यक्त करण्यासाठी एका अज्ञात व्यक्तीने  बॉंम्ब टाकला आणि त्यात आठ पोलिसांचा मृत्यू आणि पन्नास पोलीस जखमी झाले होते. याची शिक्षा म्हणून आठ आंदोलन कर्त्यांना फाशी देण्यात आली होती. मात्र त्यामुळे जगभरात संतापाची लाट पसरली, कारण त्या आठ जणांपैकी एकानेही बॉंम्ब फेकलेला नव्हता. या रक्तरंजित इतिहासानंतर या आंदोलनाला एक भव्य दिव्य स्वरूप प्राप्त झाले. सन १९९०ला कामगारांची ही चळवळ यशस्वी झाली. शिकागोमधील या घटनेचे स्मरण करण्यासाठी रेमंड लेविन यांनी आंतरराष्ट्रीय आंदोलनाचे आयोजन करण्याची मागणी केली. त्यांनी ही मागणी १९८९ साली आयोजित दुसऱ्या आंतरराष्ट्रीय पॅरीस परिषदेत केली होती. त्या परिषदेमध्ये १ मे १८९० हा दिवस जागतिक एकता दिवस म्हणून साजरा करण्याचे निश्चित करण्यात आले. पुढे १८९१च्या दुसऱ्या परिषदेत या कार्यक्रमाला औपचारिक मान्यता देण्यात आली. ज्यामुळे आज जगभरात १ मे हा दिवस आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस कामगारांच्या हितानिमित्त केल्या गेलेल्या त्या चळवळीचे प्रतिक आहे. ज्यामध्ये कामगारांनी दिवसाचे कामाचे तास आठ असावेत, अशी प्रमुख मागणी केली होती. कारण त्यापूर्वी कामगारांना दिवसभरात पंधरापेक्षा जास्त तास काम करावे लागत असे. पुढे लोक या चळवळीला आठ तासांची चळवळ म्हणूनही ओळखू लागले. या चळवळीत कामगारांच्या कामाच्या तासांसोबतच त्यांना कामाच्या बदल्यात मिळण्याऱ्या वागणूक आणि मोबदल्या विषयीही प्रमुख मागण्या करण्यात आलेल्या होत्या. शिकागो आंदोलनानंतर कामगारांना आठ तासांचे काम, योग्य मोबदला, चांगली वागणूक, पगारी सुट्टी मिळू लागली. 

निरनिराळ्या समाजवादी, साम्यवादी आणि अराजकवादी गटांनी केलेल्या निर्दशनासाठी १ मे हा दिवस ओळखला जातो. युरोपमध्ये पूर्वीपासून १ मे हा दिवस वसंतउत्सव म्हणूनही साजरा केला जात असे. पुढे या आंदोलनामुळे युरोपमध्ये ही हा दिवस कामगार दिन म्हणून साजरा होऊ लागला. सन १९०४ साली एमस्टरडॅम येथे झालेल्या दुसऱ्या जागतिक परिषदेत संपूर्ण जगभरातील कामगार संघटनांना १ मे हा दिवस कामगार दिन म्हणून साजरा करावा असं आवाहन करण्यात आलं होतं. आजही अनेक प्रमुख देशांमध्ये १ मे निमित्त सार्वजनिक सुट्टी जाहीर केली जाते. त्याचप्रमाणे या दिवसानिमित्त अनेक देशांमध्ये खास कार्यक्रम आणि सैन्याचे संचलन आयोजित केले जाते. भारतात लेबर किसान पार्टीने १ मे १९२३ साली पहिल्यांदा कामगार दिन साजरा केला होता. त्यावेळी भारतात कामगारांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी लाल रंगाचा झेंडा वापरण्यात आला होता. भारतात १ मे हा दिवस आंतरराष्ट्रीय कामगार दिन आणि महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली म्हणून महाराष्ट्र दिन म्हणूनही साजरा केला जातो. 
          ज्या लोकांकडे पुरेसे शिक्षण नाही किंवा ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली नाही, अशा लोकांना आयुष्यात भरपूर कष्टाची कामे करावी लागतात. जगण्यासाठी पुरेसा पैसा कमवणे याची चिंता करण्यात त्यांचे आयुष्य जाते. कामगार चळवळीनंतर कामगाराच्या हितासाठी प्रत्येक देशात काही कायदे करण्यात आले आहे. भारतीय कामगार कायदा म्हणजे भारतातील कामगारांचे नियम करणारा कायदा. भारतात कामगारांना योग्य संरक्षण मिळावे यासाठी काही कायदे करण्यात आलेले आहेत. यात २०० राष्ट्रीय आणि ५० केंद्रिय कायद्यांचा समावेश आहे. भारतातील कामगार कायद्यांची व्याख्या एकसंध नाही. कारण सरकार स्थापना आणि भारतीय घटनेच्या समवर्ती यादीत कामगार हा एक विषय असल्यामुळे ते प्रत्येक राज्यात भिन्न आहेत. मात्र भारतात यासंदर्भात एक महत्त्वाचा कायदा नक्कीच करण्यात आला आहे. जो आहे “दी चाईल्ड लेबर एक्ट ऑफ १९८६” थोडक्यात बालकामगार कायदा. लहान मुलांच्या हितासाठी करण्यात आलेला हा कायदा आहे. बऱ्याचदा लहान वयातच कष्टाची कामे करावी लागल्यामुळे अनेक लहान मुलांना शिक्षणापासून वंचित राहावे लागते. या कायद्यानुसार भारतात चौदा वर्षांखालील बालकांना मजूरी अथवा काम करण्यास मनाई आहे. कामगारांच्या कामाची गुणवत्ता वाढवणे तसेच लहान मुलांचा मजूरीसाठी गैरवापर आणि छळवणूक टाळणे यासाठी हा कायदा करण्यात आलेला आहे. १ मे या दिवसाला महाराष्ट्रात खूप महत्त्व आहे, कारण या दिवशी महराष्ट्र राज्याची स्थापना झाली. मात्र एवढंच नाही १ मेला आंतरराष्ट्रीय महत्त्वदेखील आहे.

 कारण जगभरात हा दिवस आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणून साजरा केला जातो. अठराव्या शतकात झालेल्या एका कामगार चळवळीच्या गौरवासाठी आजही जगभरात साजरा करण्यात येणारा हा एक खास दिवस आहे. भारतात कामगार दिनानिमित्त सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात येते. विशेष म्हणजे जगभरात अनेक देशांमध्ये हा दिन निरनिराळ्या पद्धतीने साजरा केला जातो. म्हणून कंपनीमालक आणि उद्योजकांनी मनमानी न करता कामगारांना त्यांच्या हक्काची सार्वजनिक- सरकारी रविवारची सुट्टी देणे अत्यंत रास्त आहे. 
!! कामगार दिनानिमित्त सर्व कामगारांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा !!
  •  कृष्णकुमार आनंदी-गोविंदा निकोडे गुरूजी.
  • रामनगर वॉर्ड, गडचिरोली.            .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com