मुंबईत मराठी माणसाला घर नाकारणे, दुकानावर मराठी पाट्या न लावणे, मराठी न बोलणे हे प्रकार असताना आता मुंबईतच मराठी माणसाला नोकरी नाकारण्याचे धाडस कंपन्या करु लागल्या आहेत.ITCODE Infotech या कंपनीने चक्क मराठी लोकांनी अर्ज करु नयेत अशी जाहिरात करण्याचे धाडस केले. भाजपाचे सरकार आल्यापासून असा मराठीद्वेष उफाळून आला आहे, अशा मुजोर कंपन्यांवर कठोर कारवाई करण्याची हिम्मत भाजपा-शिंदे सरकारने दाखवावी अन्यथा रस्त्यावर उतरून जाब विचारा लागेल, असा इशारा मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष प्रा. वर्षा गायकवाड यांनी दिला.
यासंदर्भात प्रतिक्रिया देताना प्रा. वर्षा गायकवाड म्हणाल्या की, ITCODE Infotech ही कंपनी सुरतची आहे. गिरगावातील कार्यालयासाठी या कंपनीने ग्राफिक डिझायनर पदासाठी जाहिरात दिली पण मराठी उमेदवारांनी अर्ज करू नये, असे त्यात स्पष्ट म्हटले. मराठीबहुल वस्ती असलेल्या गिरगावातच मराठी माणसाला नोकरी देणार नाही, असा उद्दामपणा ही कंपनी करु शकली कारण राज्यातील सत्ताधारी भाजपा व शिंदे सरकार गुजरातचे हस्तक आहेत. मोदी-शाह व गुजरात विरोधात ठाम भूमिका घेण्याची धमक त्यांच्यात नाही. परंतु हा मुजोरपणा व मराठी स्वाभिमानाला कोणी ठेच पोहचवत असेल तर ते सहन केले जाणार नाही.
महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला गेले, या प्रश्नावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘गुजरात राज्य काही पाकिस्तान नाही’, असे बेजबाबदार व निर्लज्ज उत्तर दिले होते. अशा या बोटचेप्या व गुजराती धार्जिण नेत्यांमुळेच माज वाढत चालला आहे. गुजरात पाकिस्तान नाही हे जसे समजते तसे मुंबईसुद्धा पाकिस्तान नाही याचे भान फडणवीसांना असायला हवे. आणि महाराष्ट्राचे नेतृत्व करणाऱ्यांना गुजरातचा एवढा पुळका का यावा? अशा गुजरातप्रेमी लोकांना त्यांची जागा दाखवून देण्याची हिच योग्य वेळ आहे, असे आवाहनही वर्षा गायकवाड यांनी केले.
काँग्रेस इंडिया आघाडीच्या उत्तर मध्य मुंबई मतदार संघातील उमेदवार प्रा. वर्षा गायकवाड यांच्या प्रचाराने वेग घेतला आहे. दररोज मॉर्निंग वॉकसह स्थानिक जनतेशी संवाद साधत त्या जनतेच्या समस्या जाणून घेत आहेत. सोसायटीमध्ये जाऊन रहिवाशांशी थेट संवाद साधण्यावर त्यांचा भर आहे. विविध प्रार्थना स्थळांनाही भेट देत आहेत. आज वांद्रे पश्चिम येथील माऊंट मेरी चर्च व अंधेरी पूर्व येथील चर्चमध्ये जाऊन ख्रिश्चन धर्मगुरुंची भेट घेतली.
“वांद्रे येथील ब्रह्मकुमारी केंद्राला भेट दिली. यावेळी शोबा बेन आणि स्मिता बेन या भगिनींसोबत संवाद साधण्याची संधी मिळाली. प्रचाराच्या व्यस्त वेळापत्रकात त्यांनी शिकवलेले ध्यान तंत्र ऐकणे आणि सराव करणे खूप आनंददायक होते. ध्यान संपल्यानंतर या भगिनींनी प्रसाद देऊन आशीर्वाद दिले. यावेळी माझे सहकारी आसिफ झकारिया, कॅरेन डीमेलो, कविता रॉड्रिक्स आदी उपस्थित होते”.
सांताक्रूज पूर्व भागातील गोळीबार मैदान येथील सिटी प्राईड बिल्डिंगमधील रहिवाशी व पॅरामाऊंट एसआरए बिल्डिंगमधील रहिवाशांशी संवाद साधला. वांद्रे पूर्व भागातील हिल रोड जंक्शन,जैन मंदिर रोड वांद्रे पश्चिम येथे कार्यालयाचे उद्घाटन केले व दुपारनंतर वांद्रे पश्चिम भागातील हिल रोड शाखा ते नर्गिस नगर पदयात्रा काढण्यात आली. वर्षा गायकवाड यांच्या पदयात्रेत इंडिया आघाडीतील घटक पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या पदयात्रेला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. इंडिया आघाडीचे कार्यकर्ते घरोघरी जाऊन काँग्रेस पक्षाच्या ‘५ गॅरंटी, २५ न्याय’ ही न्यायपत्रे देऊन लोकांमध्ये जनजागृती करत आहेत.
0 टिप्पण्या